-
स्त्री. १ ज्या ठिकाणी विद्वान , पंडित , गुणीजन , राजे लोक वगैरे जमतात , बसतात अशी जागा ; दरबार ; मंत्रगृह ; राजसभा , ब्रह्मसभा . सभे शिशुपाळ घेतला प्राणें । - मुसभा १२ . १४४ . २ संमाज ; मंडळी ; जमाव ; समुदाय ; बैठक ; आखाडा ; मेळा . ३ सभेसंबंधी गाणें . तेचि सभा गातों सभेमधि तेचि सभा गातो - पला २० . ४० . ४ शाळा ; धर्मशाळा ; दालन . एका सभेंत रात्रौ निजला ... । - मोवन ४ . १११ . सभा जिंकणें - वादविवादांत यश मिळविणें ; फड मारून नेणें ; आपलें म्हणणें खरे करणें . सभाकंप - पु . सभेमध्ये भरणारें कांपरें ; लाजाळूपणा ; संकोच . २ मन अपराधी असल्यामुळे वाटणारी भीती व त्यामुळे होणारा थरकांप गोंधळ . सभांगण - न . १ सभेची जागा . २ रंगण ; चौक ; मोकळी जागा सजूनि वर वल्लभी तव सभांगणी नाचतो - केका ११४ . सभांगना - स्त्री . वारांगना ; कलावंतीण ; नायकीण . तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदांत - ऐपो ११९ . सभागृह - न . कचेरी ; दिवाणखाना ; सभेची जागा ; दरबारची जागा . सभाचातुर्य , सभाकौशल्य , सभापाटव - न . शिष्टाचार ; सभ्यता ; रीतरिवाज ; चार मंडळीत वागण्याची योग्य पद्धति व त्यांत दिसून येणारी चांगली बुद्धि . सभाजन - पु . १ सभेतील सदस्य ; मंडळी ; समाज ; लोकसमुदाय . २ सभासद ; सभेत बसणारा गृहस्थ . सभादिप , सभादीपक , सभादिवा - वि . १ श्रावणीच्या दिवशी ब्राह्मणास अग्निसमक्ष सुवासिनी दान करतात तो दिवा . २ सभादिप दान करण्याचा विधि . ३ ( ल . ) सभाभूषण ; सभेचा अलंकार . सभाधिकारी - पु . सभेचा नेता ; अध्यक्ष . सभाधीट - वि . सभेमध्यें न भितां , न गोंधळतां भाषण करणारा . सभाधूर्त - वि . सभेमध्यें , दरबारांत वाद , मसलत , मध्यस्थी वगैरे कामांत प्रवीण , वाकबगार , हुशार ; सभाकुशल - चतुर - पटु हे पर्याय शब्द आहेत .
-
०धैर्य न. सभेतील धीटपणा ; आत्मविश्वास ; धिटाई .
-
०धौर्त्य न. सभेंतील धूर्तता , चातुर्य , कौशल्य . सभाध्यक्ष , सभानायक , सभापति - पु . सभेचा प्रमुख , मुख्य , नेता , पुढारी , अध्यक्ष , मुखार , उपदृष्टा .
-
०नियम पु. सभेसंबंधी कायदा , निर्बंध , काम चालविण्याविषयी पद्धति .
Site Search
Input language: