Dictionaries | References

वळघ

   
Script: Devanagari
See also:  वळग

वळघ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vaḷagha f A clasp, hug, close embrace. v मार, घाल.

वळघ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A clasp, hug.

वळघ     

 स्त्री. पकड ; घट्ट मिठी ; आलिंगन ; वेंघ . ( क्रि० मारणे ; घालणे ) [ सं . अव + लग ; म . ओळखणे ] वळगणे , वळघणे , वळंगणे , वळंघणे - उक्रि .
मिठी मारणे ; पकडणे ; झटून पडणे .
लोंबकळणे ; ओळंबणे . की वलघौनि झाडा । एरझारा करी माकोडा । - ऋ ३० .
चढणे ; आरुढ होणे . पवनारु वळघला । आणि गगनामाजी पै उडाला । - सिसं ४ . १२८ . - एरुस्व ८ . १२ . हा परम उंच सुवेळ गिरी । अवघे वळघोनिया वरी । - रावि २४ . १४१ .
( व्यापक ) आश्रय करणे , धरणे ; पकडणे ( एखादा प्रदेश , प्रांत ) बुद्धीते सांडोनि ज्ञान । भेणे वळघले । - ज्ञा ११ ; ६६४ .
भटकणे ; हिंडणे ; भ्रमणे ; फिरणे . मग हिंडणे ; वळगत वासुदेव । - भज १९ .
वळणे ; ओढणे . पाकळ्या पसरुं लागल्या म्हणजे त्यांचे शेंडे पहिल्याने अंतर्गोल म्हणजे आंतल्या बाजूने वळंगलेले असून ... - मराठी ६ वे पु ( १८७५ ) पृ . २४० . - अक्रि .
पोंचणे ; जाणे . जयजयकार त्रिलोक करी । नाद वळघला सत्य शिरी । - निमा १ ( निर्वोष्ट राघव ४१ ).
चिकटून राहणे ; लोंबणे . अचिंत्या अनंतशक्ति । श्रीहरीते वळंगती ।
वरचढणे ; भोगणे ( घोडी - गाढवीला घोडा - गाढव यांनी ). [ सं . अव + लग ? प्रा . वलग्ग = चढण ; गु . वळगवुं ] वळगा - घा - पु . विळखा मिठी . सागरलहरी किनार्‍यास घे वळघे आलिंगाया । - केक १२५ . वळघी - स्त्री . चाल ; हल्ला . साहे बोलाचे वळघी । ऐसी अविद्या असे जगी । - अमृ ६ . २७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP