Dictionaries | References व विकळ Script: Devanagari See also: विकल , विकला , विकळा , विकळांग Meaning Related Words विकळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vikaḷa, vikaḷā, vikaḷāṅga See in order under विकल. विकळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Impaired; broken; incomplete. विकळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. विकल पहा . दु : खित ; गालितगात्र . परम विकळ मी तूं या स्मृती ही उडाल्या । - वामन , भामाविलास ( नवनीत पृ . ९९ ). विसकटलेला ; अस्ताव्यस्त . विकळ देखोनि दळभार । मागधवीरीं केला मार । - एरुस्व १० . ४२ . अधू ; व्यंग . बाण खोंचला अति निगुती । विकळ गेला दोहीं हातीं । - एरुस्व ११ . ४४ . हीन दशा पावलेला ; हतबुध्द ; असहाय्य . निज मंडपीं शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊन गेला गोपाळ । ऐकोन विकळ पडियेला । - एरुस्व १२ . १ . विव्हळ ; दुःखी . लिंग देखिलें भूमीवर । मनीं विकळ जाहला । - गुच ६ . १८३ . निस्तेज ; निःसत्व . विकळ वरि शिखंडीतें गुरुसुत ... । - मोभीष्म ८ . २१ . उलट ; विपरीत . तंव ग्रह नव्हता सानुकूळ । म्हणोनि तव बुध्दि विकळ । - शनि ३७१ . उणाख ; अपूर्ण . जो साम्यचि परी विकळ । ते दृष्टांत नव्हे निर्मल । - विपू ७ . ३३ . अमेळ ; संबंधशून्य ; विसंगत . आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे । - ज्ञा ५ . ५७ . जड ; अस्पष्ट . ययाती म्हणे वाचा विकळ । सांगो जातां होतसे । - मुआदि २० . १३७ . [ सं . विकल ] विकळणें अक्रि . ( कों . ) बुध्दीची ग्राहकशक्ति जाणें , नष्ट होणें ( वार्धक्य , विकार इ० मुळें ). साधक आळसें विकळे । - एभा २० . २०२ . बारगळणें ; भ्रम होणें ; वेडयासारखे , मूर्खासारखे चाळे करणें ; बडबडणें ( विशेषत : म्हातार्यानें , लहान मुलानें ). तो म्हातारा अलीकडे विकळला , त्याबरोबर तुम्ही कशास बोलतां ! अतिशय विकल , जेर होणें ( उष्णतेनें , श्रमानें ). नासणें व फुटणें ( दूध , ताक , दहीं ). [ विकळ ]०मति, ०ता स्त्री. ( काव्य ) बुध्दिभ्रंश ; भ्रष्टमति . नळाची विकळमति होऊन । तटस्थरूप राहिला । व्याकुलता ; खेद ; दुःख . ऐश्वर्यहानीची विकळता । अळुमाळ नाहीं माझिया चित्ता । - मुआदि २० . ४४ . वि . ज्याच्या बुध्दीला विकळता आली आहे असा . विकळा वि . विवर्ण ; निस्तेज ; फिकट ( वर्ण , चेहरा ). [ वि + कळा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP