|
स्त्री. १ ईर . शक्ति ; जोम ; रग ; ( ल . ) पर्वा ; भीडभाड . मराठे मनुष्य पळूं लागल्यावर कोणाची वीर कोणास नाहींशी होते - भाब ८४ . २ तेज ; गुण ; प्रभाव . ३ श्रेष्ठता ; उत्कृष्टपणा . ( बुध्दिबळें ) अधिकाराचें क्षेत्र , टापू . ३ ( बुध्दिबळें ) राजास बचावण्यासाठीं एखादें मोहरें मध्यें घालणे , मध्यें टाकणें . बुध्दिबळाच्या डावांत राजास शह देणारें मोहरें व राजा यामध्यें मोहरें टाकणें . ईर पहा . पु. योध्दा ; लढवय्या ; शूर पुरुष ; उत्साही मनुष्य ( लढाईत , दुसर्याची आपत्ति दूर करण्यांत किंवा दान करण्यांत ). आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती । - ज्ञा १ . १०२ . २ नवरसांपैकीं एकः - उत्साह , शौर्य , पराक्रम दाखविणारा भाव . ३ ज्याचा कोणी पूर्वज लढाईत मेला असून , जो फाल्गुन वद्य प्रतिपदेचे दिवशीं , योध्दयाच्या समारंभानें देवदर्शनासाठीं जातो असा . ४ वरील मृत मनुष्याचा देवांमध्यें बसविलेला टांक . वीर बैसविला देव्हारां । - दावि ६३ . ५ मोठया मनुष्याची मरणोत्तर दशा . - बदलापूर ४९२ . ६ विशेषनाम , हुद्दा किंवा वर्णनपर नांव यांस जोडून येतो ; त्यावेळीं पुढारी , प्रमुख , श्रेष्ठ असा अर्थ होतो . उदा० रघुवीर ; कुरुवीर ; यदुवीर ; दैत्यवीर ; कपिवीर ; भक्तवीर ; वदान्यवीर इ० तैसा तुका वैष्णववीर । अवीट आवडी त्याची थोर । मोजुनि त्याहि कृष्णवीर । स्वहस्तें चौगुणें घेती वर . ७ एक पदवी . कोणतेही धाडस , उत्साह , औदार्य , परोपकार , जनकल्याण इ० गुणाविषयीं प्रसिध्द असलेल्या पुरुषास लावतात . उदा० वीर नरीमन , वीर वामनराव . - वि . १ शूर ; पराक्रमी . २ वैराग्यशील . [ सं . ] सामाशब्द - ०कंकण न. वीर पुरुषाचा मान म्हणून , पराक्रमाचें द्योतक असें मनगटांत घातलेलें कडें . वीर कंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं । - दा ७ . ९ . १५ ०कन्या स्त्री. ( वीर पुरुषाची मुलगी ) युध्दप्रिय , धाडशी , खंबीर मनाची स्त्री . वीरभार्या , वीरपत्नी , वीर भगिनी हे समधर्मी शब्द होत . [ सं . ] ०कल्लु पु. ( गो . ) वीराचा दगड ; वीरगळ . [ का . कल्लु = दगड ] ०गड पु. घोसाळा किल्ला . - शिदि १५१ . ०गंठी ( महानु . ) वीरगुंठी पहा . विरली रुळती वीरगंठी । - दाव २४४ . ०गर्जना स्त्री. वीराच्या आरोळया ( आव्हान , उत्तेजन देणार्या ). [ सं . ] ०गांठ स्त्री. विशिष्टप्रकारची केसांची गांठ ; वीरगुंठी पहा . बासींगे हीरेयाची जोती मीरबती वीती वीरगांठी । - धवळेपू ६९ . ०गुंठी स्त्री. विशिष्ट प्रकारानें केंस बांधणें ; वीराला शोभण्याससारखी डोक्यावरील केंसाची गांठ . अविरळ कुरळांची मस्तकीं वीरगुंठी । - सारुह ८ . ११८ . सरसावुनी वीरगुंठी । - मुसभा ७ . १७ ; - ह १९ . ३७ . ०घंटा स्त्री. दौंडी पिटण्याचें साधन अशी घंटा ; एकच वाद्य . डौंडीची ढवंस ढोला । वीरघंटा तांबकिया । - शिशु १०२६ . ०घोषणा स्त्री. वीरगर्जना ; योध्दयांना युध्दास निमंत्रण . [ सं . ] ०जननी स्त्री. जिचीं मुलें शूर , पराक्रमी आहेत अशी स्त्री ; वीरमाता . [ सं . ] ०जयंतिका जयंति - स्त्री . युध्दप्रसंगीं किंवा युध्दांत विजय मिळाल्यावर योध्दयांनीं केलेला नाच ; युध्दनृत्य . [ सं . ] ०ठाण न. वीरासन . [ सं . वीरस्थान ] ०दृष्टि स्त्री. ( नृत्य ) डोळे लाल करणें , बुबुळें उंच नेणें ; डोळयाचा मध्यभाग विकासित करणें ( वीररसाचा अभिनय ). ०पट्ट पु. वीराचें ललाटपदक ; शिरताज . ०पत्नी स्त्री. वीराची भार्या , बायको ; वीरकन्या पहा . [ सं . ] ०पाण पान - न . युध्दापूर्वी किंवा युध्द चालत असतांना , जोर येण्यासाठी वीरांनीं नवचैतन्यवर्धक पेय पिणें . [ सं . ] ०पीर वि. १ बोंबल्या ; अरेराव ; रगडमल्ल ; धटिंगण माणूस . २ ( प्रशंसार्थी ) उत्साही , धाडसी माणूस . ०प्रसू स्त्री. शूर अशा पुत्रांना प्रसवणारी स्त्री ; वीरमाता . [ सं . ] ०भगिनी स्त्री. वीराची बहीण . [ सं . ] ०भद्र पु. १ दक्षयज्ञाचा विध्वंस करण्यासाठीं शंकरानीं जटेपासून निर्माण केलेला वीर पुरुष ; अकरा रुद्रांपैकीं एक . २ ( ल . ) उग्र स्वरूपाचा व बिनाशक प्रवृत्तीचा मनुष्य . ३ शिवगणांचा एक वर्ग . ४ लिंगायत लोकांमधील एक विशेष दीक्षा . ५ रागीट , हट्टी व सुधारणार नाहीं अशा मुलास म्हणतात . [ सं . ] ०भाग पु. वीराचा भाग ; शूर पुरुषाची वस्तू . मी तंव तुझेचि अर्धांग । केविं शिशुपाळ शिवेल माझे आंग । तूं शिरावरी असतां श्रीरंग । मी वीरभाग यदुवीरा । - एरुस्व ४ . १६ . ०भार्या स्त्री. वीरपत्नी ; वीराची बायको ; वीरकन्या पहा . [ सं . ] ०भाषण न. वीराची भाषा ; वीराचें वचन . [ सं . ] ०माता स्त्री. शूरांची आई ; वीरजमनी पहा . [ सं . ] ०मुष्टि पु. मद्रासैलाख्यांतील एक भिकार्यांची जात . हे लोक शारीरिक करामतीचे खेळ करून पैसे मिळवितात . हे लिंगायत धर्माचे आहेत . ०रस पु. वीराला युक्त अशी भावना , विकार ; नवरसांपैकीं एक , याचे चार विभाग पडतातः - विद्या , युध्द , दया व दान . वीररसाचें उदा० गर्वोक्ति फाल्गुन वदे जगदेकराया । आहे मशीं कवण तो झगडा कराया । म्यां कालखंज वधिले अतुलप्रतापी । पौलोमही असुर गोसुर विप्रतापी । - वामन , भीष्मप्रतिज्ञा . [ सं . ] ०राणा वि. वीरश्रेष्ठ . पाठीं धरा वाहक वीरराणा । चाले करें वोढुनि चापबाणा । मुरामायण अयोध्दया . ०वाद पु. वीराचें प्रतिपक्षीयास युध्दासाठीं केलेलें आव्हान ; युध्दास निमंत्रण . [ सं . ] ०विलास पु. वीराची क्रीडा . - वि वीरांना ज्यांपासून विलास ( आनंद ) होतो असा ( अर्जुन ). हारपलें दावूनि जैसा । मागु सरे वीरविलासा । ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रसादा । - ज्ञा १५ . ५८६ . ०वृत्ति स्त्री. वीराची प्रकृति - शौर्य , पराक्रम . तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें । - ज्ञा १ . १२७ . ०वैष्णव पु. १ वैष्णवांचें आचार कडकडीत पाळणारा एक वर्ग . याच्याप्रमाणें वीरशैव असा एक वर्ग आहे . २ वैष्णववीर ; कट्टर , थोर वैष्णव . तैसा तुका वैष्णववीर । अवीट आवडी त्याची थोर । [ सं . ] ०शय्या स्त्री. रणभूमि . [ सं . ] ०शैव पु. लिंगायतांचा एक वर्ग . ०श्री स्त्री. १ अंगांत संचरणारें शौर्याचें वारें ; स्फुरण ; वीराचें यश ; अब्रू . २ शौर्य . कीं अतिथीविण भोजन । कीं वीरश्रीविणरण । [ सं . ] ०सभा स्त्री. योध्दयांची सभा . [ सं . ] ०सू स्त्री. वीरमाता ; वीरजननी पहा . [ सं . ] ०हंता वि. वीरांचा पराभव करणारा किंवा त्यांस ठार करणारा . ०क्षेत्र न. बडोदें . वीरक्षेत्रीं महाराज प्रथुत्तम खंडेराव राजे बहादूर । - गापो ११ . ०क्षेत्री पु. क्षत्रीयवीर . वरी विराजे वीर - क्षेत्री । हरिश्चंद्र नृपनाथ । - मुहारिश्चंद्राख्यान नवनीत पृ . १८३ . वीराशंसन - न . युध्दांतील वीरांनां प्रिय अशी जागा ; प्राणावर बेतण्याचा जेथें प्रसंग येतो अशी धोक्याची जागा . [ सं . ] वीरासन - न . १ डावा गुढघा मोडून व उजवा उभा करून , किंवा दोन्ही गुढगे जमीनीस टेंकून बसणें ; आसनाचा एक प्रकार . योध्दयाची बसण्याची रीत ( युध्दांत बाण सोडतांना , दरबारांत किंवा सभेंत बसणें झाल्यास ). ( क्रि० घालणें , धरणें ). २ वीराची बसावयाची जागा , आसन इ० ३ रणभूमि . [ वीर + आसन ] वीरेंवीर - क्रिवि . एकूणएक वीर . वीरेंवीर बुडाला । अवघा हळकल्लोळ जाला । महारुद्र खवळला । ज्ञाते लोक जाणती । - दावि ४९६ . [ वीर + वीर ]
|