Dictionaries | References श शीग Script: Devanagari Meaning Related Words शीग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 śīga f The head, crown, or apex of a measure of corn, or the peaked rising above the level of the measure. 2 Applied laxly to a conical mass of dirt upon a floor, to a mound upon a level ground &c. शीग मोडणें To flatten or lessen the शीग by shaking the measure. शीग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The head, crown of a measure Learned. of corn. शीग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अखेर , अवधी , कळस , मर्यादा , शेवट शीग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun माप भरले असता वरची रास Ex. शीग भरून बेसन घे. शीग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ धान्यानें माप भरलें असतां मापाच्या वर येणारी निमुळती रास . २ जमिनीवर धान्याची अगर इतर पदार्थाची रास केली असतां वर दिसणारा निमूळता भाग . ३ शिखर ; उंचवटा . ४ ( ल . ) अखेर ; शेवट ; मर्यादा ; अवधिं . नेली कृष्णें न्यावी स्वपदाश्रित कामना शिगेला जी । - मोगदा ५ . १७ . ५ सपाट जमिनीवरील उंचवटा . [ सं . शीर्षक ] ( वाप्र . ) शीगमाप देणें - क्रि . १ चांगलें माप घालणें . २ ( ल . ) एखाद्याची चांगली भरपाई करणें . शिगेस चढणें - शिखरास , पूर्णत्वास जाणें . कीं बहु चढला तुजा मद सिगेला । - मोउद्योग १३ . ३३ . सामाशब्द -०लोट ( शिगेच्यावर गेलेलें ) अतिशय समृध्दि , संपन्नता ; गडगंज . शीगलोट पीक - अमदानी - दौलत इ० . - क्रिवि . समृध्दिपूर्ण ; संपन्नतेनें .०लोटां वि. आंतील धान्यादिकांची शीग लोटून सपाट केलेलें ( माप ; पात्र ). शीगवर - क्रिवि . अगदीं शीग लागेल इतक्या प्रमाणांत . अति समृध्दतेनें . शिगोशीग - अ . ( ना . ) अगदीं भरून ; सांडेतोंवर ; तोंडातोंड . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP