Dictionaries | References स संघष्टन Script: Devanagari See also: संघटटन , संघटण , संघटणें , संघटन , संघष्टण , संघृष्टन Meaning Related Words संघष्टन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ निकट संबंध ; सलगीचे वर्तन . तुका म्हणे जिणें । भलें संत संघटणें । आमचे त्यांचे संघष्टण विशेष असेल नाही ? - भाबे ४ . २ भेट ; मीलन ; एकत्र येणें ; संयोग ; जुळणी ; स्पर्श . तुका म्हणे जरी अग्नि झाला साधु । तरी पडे बाधु संघष्टणें । - तुगा ६५२ . ३ घटट मिठी ( मल्लांची कुस्तीमध्ये , प्रियजनांची अलिंगनांत ); भीड ; विळखा ; बिलगणें . ४ संघर्षण ; घांसाघास . [ सं . सम् + घट् ] संघटणें - अक्रि . भिडणें ; भेटणें ; एकत्र येणे ; बिलगणें . हृदयीं हाणितल्या चरणें । बळें संघटे पादसंधी । - मुआदि ९ . ५१ . जैसी परिव्राजकावरी । राजदासी संघटे । - मुरंशु २३५ . रथाजवळी रामरूप संघटले । - रावि ३२ . १२० . २ मावणे ; सामावणें . हे देखोनि दुर्योधना । परमानंद न संघटे । - मुआदि ३१ . ११६ . संघटना - स्त्री . जमाव ; जुळणी ; एकत्रीकरण ; संयोग . संघटट - पु . घर्षण . मंदरभ्रमणी तरुसंघट्टे । वन्हि पेटला धडधडाटें । - मुआदि ४ . १०८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP