|
पु. १ एक श्रेष्ठ पशु ; मृगराज . २ ( समासांत उत्तरपदीं ) श्रेष्ठ ; वरिष्ठ व्यक्ति . उदा० पुरुषसिंह , पंडितसिंह . ३ ( ज्यो . ) बारा राशींतील पांचवी रास . [ सं . ] ०कटी स्त्री. सिंहाप्रमाणें बारीक कमर असलेली स्त्री . बारीक कमर हें सौंदर्याचें एक लक्षण आहे . ०कंपित कंपिकरण - न . ( नृत्य ) पाय सरपटत पाठीमागचे बाजूस नेऊन दोन्ही हात आकुंचित करणें . ०केशर पु. १ सिंहाची आयाळ . २ एक वनस्पति . ०तल पु. पसरून जोडलेले दोन हात . ०द्वार न. मुख्य दरवाजा , प्रवेशद्वार ( राजवाडा , किल्ला इ० चें ); दिल्लीदरवाजा . ०नाद पु. १ सिंहाचें ओरडणें . २ ( ल . ) युध्दाची आरोळी ; युध्दाचें आव्हान . सिंहनाद केला वीरी । उपराउपरी धाविन्नले । - एरुस्व ८ . २० . ३ मोठा , भयंकर आवाज ; ओरडा ; गर्जना . विजय जाणोनि तदा केले बहु सिंहनाद हर्षानें । - मोकर्ण ४७ . ३५ . ४ देवळांत निर्मानुष स्थितींतहि , एखादे वेळीं आंतून निघणारा गंभीर , खोल आवाज . ०विक्रीडित विक्रीडिकरण - न . उजवा पाय पुढल्या बाजूस अलात करून , डावा पाय मागच्या बाजूस वळवून कनिष्ठिकेच्या बाजूनें मंडल करून टांचेवर टेंकविणें . ०स्थ पु. गुरू सिंहराशीस येण्याचा काल . हा काल सुमारें १२ महिन्यांचा असतो . हा बारा वर्षांनीं एकदां येतो . ही पर्वणी शुभ , पुण्यप्रद मानली जाते . कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतें गंगे आंतु । जे अर्जुन सिंहस्थु । जाला म्हणौनि । - ज्ञा १८ . १६७५ ; - तुगा २७७५ . सिंहल , सिंहलद्वीप - न . लंका ; सिलोन . सिंहाडा - पु . मोठा , भयंकर सिंह . न समाती दरीमाजीं सिंहाडे । तैसें दांत दिसती रागीट । - ज्ञा ११ . ३४४ . सिंहावतार - पु . ( सिंहासारखा उग्र अवतार ). १ ( ल . ) अतिशय रागावलेली स्थिति ; भयंकर क्रोध . ( क्रि० धरणें ; घेणें ). २ ( चुकीनें नरसिंहअवतार ). सिंहावलोकन - न . ( सिंहाप्रमाणें वारंवार मागें दृष्टि टाकणें ). १ मागचा इतिहास पाहाणें , पूर्ववृत्त लक्ष्यांत घेणें , त्याचा विचार करणें , ( उत्तरोत्तर प्रगति होत असतां ). सिंहावलोकनें करून । पहा मागील अनुसंधान । - ह २५ . ४७ . २ एक न्याय . समालोचन पध्दति . [ सिंह + अवलोकन ] सिंहासन - न . १ देव , राजा इ० चें बसावयाचें आसन , पीठ , गादी ; तक्त . ( अशा सोन्याच्या किंवा मौल्यवान पदार्थांच्या आसनाखालीं सिंह असत म्हणून हें नांव ). - एभा १० . ६०६ . २ राजधानीचा प्रांत , परगणा . रायबाग सिंहासन - भोजताम्रपट शके ४१० . ३ एक योगासन . - संयोग ३२१ . [ सिंह + आसन ] सिंहिका - स्त्री . राहूची माता ; एक राक्षसी . तो सिंहिकेनें वदन पसरिलें । छायासूत्र साधिलें । - रावि १९३९ . सिंही , सिंहीण - स्त्री . सिंहाची मादी .
|