|
न. सूत ; धागा , तंतु ; दोरा . कळसूत्री बाहुलीची दोरी , तार , ( यावरुन ) एकाद्या यंत्रांतील किंवा भानगडीच्या धंद्या - उद्योगांतील मख्खी . चावी , किल्ली , युक्ति , संधान , फिरकी ; तसेच त्या रचनेची युक्ति , पूर्वी करुन ठेवलेली योजना ; यंत्राच्या कृतीची पद्धत , रीत उ० मनसूत्र म्हणजे मनाचा कल , इच्छा , आवाड . नियम , कायदा , तत्त्व ; सूचना , शिकवण यांची ठरीव पद्धत , ठराविक रीत . व्याकरण , तर्क इ० शास्त्रांतील नियम , शास्त्रप्रवर्तक आचार्यांनी त्या त्या शास्त्रावर लिहिलेले मूलग्रंथ ; त्यांतील सुटी वाक्ये . ( कायदा ) हुकूमनामा ; निर्णायक मत . जानवे . ओळंबा . वात ( कापसादिकाची ) ( ल . ) सरळ ओळ ; रांग . तैसे दिसे सैन्यसूत्र । - एरुस्व ६ . ५५ . ( ल . ) मैत्री ; संधान . [ सं . ] ०जमणे गट्टी जमणे . सामाशब्द - ०क वि. बिनचूक ; सरळ ; सुतामध्ये ; निश्चित ; बरोबर . सरळ ; एका रेषेत , लंबरेषेत , समपातळीत असलेला ( रस्ता , भिंत , काठी , खांब ). बरोबर ; नियमित ; ( त्यावरुन ) नीटनेटका , छानदार . ०जंत पु. एक प्रकारचा बारीक जंताचा किडा . ०धार पु. नाटकाध्यक्ष ; नाटकासंबंधी माहिती करुन देणारे मुख पात्र . कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात , ज्याच्या हातांत बाहुल्यांच्या दोर्या असतात तो माणूस . मंडळ , समाज , संघ इ० चा मुख्य चालक . ०धारी पु. सूत्रधार अर्थ २ , ३ पहा . ०प्राय क्रिवि . थोडक्यांत ; संक्षेपाने . सूत्रात्मा पु . हिरण्यगर्भ . [ सं . ] सूत्रा त्री वि . सूत्रक पहा . शहाणा ; तरबेज ; चतुर ; चलाख , निष्णात ; धूर्त ; तीक्ष्ण बुद्धीचा . व्यासु सहजे सूत्री वळी । - ज्ञा २८ . ३५ . [ सं . ]
|