-
निधि n. सुख देवों में से एक ।
-
निधिः [nidhiḥ] [नि-धा-आधारे कि]
-
न. १ कुबेराचा खजीना ; द्रव्यसंग्रह ; भांडार . हे नऊ आहेत - पद्म , महापद्म , शंख , मकर , कच्छप , मुकुंद , नंद , नील , खर्व . त्यास नऊ निधि व अष्टमहासिद्धि अनुकूल आहेत . २ ( सामा . ) ठेवा ; सांठा ; संग्रह ; भांडार . की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे । - ज्ञा २ . १९१ . ३ खनि ; खाण . ४ पुरलेले , गुप्त धन ; ठेवा . की लोटले या विवसी । देखे निधानु जेवी । ५ पात्र ; भाजन ; आधार , आश्रयस्थान ; ठिकाण . ( समासांत ) गुण - दया - विद्या - करुणा - पाप - निधान - विधि . जेथ राहोनि असती अमर । ते निधान मी । - ज्ञा ९ . २९५ . विद्वत्ता म्हणजे सर्व गुणांचे निधान . - नि ३९ . [ सं . ] म्ह ० धान्य तेथे घुशी निधान तेथे विवशी . निधिनिक्षेप - पु . जमीनीत पुरलेले धन , ठेवा ; भूमिगत द्रव्य . मूळचे हे दोन शब्द असून त्यांचा अर्थ निधी = खाणी , व निक्षेप = पुरलेले द्रव्य असा आहे . ( हा जोडशब्द जुन्या सनदा - कागदपत्रांतून तृण , काष्ठ , पाषाण , निधि व निक्षेप या सर्व हक्कांसह जमीन दिल्या - विकल्याच्या खुलाशाबाबत येतो ). निधिनिक्षेपासहित म्हणजे पुरलेल्या सर्व द्रव्यासह . निक्षेप पहा . [ सं . ]
-
स्त्री. अतिशय वेगाने भ्रमण , फिरणे . पै भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । - ज्ञा १५ . १३६ . निधा पहा .
Site Search
Input language: