-
पु. १ हाताचा आंगठा व तर्जनी यांच्या परस्पर दाबाची पकड ; चिमखुरा ; विचकुरा . २ पदार्थ घट्ट धरण्याकरितां , पिळवटण्याकरितां , उचलण्याकरितां , उपटण्याकरितां , केलेलें सोनार इ० काचें हत्यार . ३ ( ल . ) एकमेकांस मिळणार्या ( परस्परांशीं लघुकोन करणार्या ) दोन नद्यांमधील , दोन रस्त्यांमधील जमीनीचा त्रिकोणाकृति चिंचोळा भाग . ४ ( ल . ) इकडे आड तिकडे विहीर अशा प्रकारची पेंचाची , अडचणीची , संकटाची स्थिति . ५ ( चिमटयानें केस इ० ) उपटणें . [ चिमट ] ( वाप्र . ) चिमटा घेणें - एखाद्यास झोंबेल , बोंचेल असें बोलणें , तशी कृति करणें .
-
वि. कपाळावर दोन भोंवरे असलेला ( घोडा ). - मसाप २ . ५६ .
-
०धरणें न्हाव्याकडून चिमटा करवून , केंस उपटून घेणें . - टयांत सांपडणें - अडचणींत , पेंचांत पडणें , धरलें जाणें .
-
चिमटा घेणें
Site Search
Input language: