* अनंत तृतीया
एक व्रत. भाद्रपद, वैशाख किंवा मार्गशीर्ष या मासांच्या चतुर्थीपासून एक वर्षपर्यंत व्रतकाल. व्रताची देवता गौरी असून प्रत्येक मासी वेगवेगळ्या फुलांनी तिची पूजा करतात.
* संकष्टी
ही गजाननाची चतुर्थी आहे. या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्री चंद्रोदयानंतर दहीयुक्त भोजन करावे. ब्राह्मणास भोजन घालून त्यास दक्षिणा द्यावी. त्यामुळे सर्व विघ्नांचा नाश होऊन त्याच्या भजनामुळे पापे नष्ट होतील आणि गणेशलोक प्राप्त होईल. या चतुर्थीला 'बहुला चतुर्थी' म्हणतात.
या दिवशी श्राद्धतिथी असेल तर ब्राह्मणभोजन घालून स्वत: भोजन हुंगून ते गाईस घालावे. रात्री चंद्रोदय झाल्यावर आपण जेवावे.