भाद्रपद व. अष्टमी
Bhadrapad vadya Ashtami
एक काम्य व्रत. भाद्रपद वद्य अष्टमीला आर्द्रा नक्षत्र असेल त्या दिवशी या व्रताला प्रारंभ करतात. यात उमा-महेश्वराची सुवर्ण मूर्तीला पंचामृताचे स्नान घालून त्यांची पूजा करतात. मग कणकेमध्ये पंचामृत घालून ती मळतात व तिच्यापासून मासा वगैरे प्राण्यांच्या आकाराचे बत्तीस खाद्य पदार्थ करून त्यांचा नैवेद्य दाखवतात. मग त्या सुवर्णमूर्ती व खाद्यपदार्थ एका ब्राह्मणाला दान देतात.
फल- पापनाश; संपत्ती, दीर्घायुष्य व कीर्ती प्राप्ती
* पुत्रीयव्रत
या अष्टमीला प्रात:स्नानादी गोष्टी उरकून वासुदेवाचे पूजन करावे. दूध व खीर यांची आहुती द्यावी आणि ज्या स्त्रिला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तिने पुल्लिंगी नामवाचक फळे - पेरू, वगैरे आणि जिला कन्यारत्नप्राप्तीची इच्छा असेल तिने स्त्रीलिंगी नामवाचक फळे एकदा भक्षण करावी. असे एक वर्षापर्यंत केले असता संतानप्राप्ती होते. याच तिथीला 'जीवत्पुत्रिकाव्रत ही करतात. पुत्राच्या जीवित- रक्षणासाठीही हे व्रत करतात.
.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008
TOP