* अविघ्नकर व्रत :
एक काम्य व्रत. फाल्गुन शुद्ध चतुर्थीस सुवर्णाच्या गणेश मूर्तीची पूजा, तिलहवन, तिलदान, तिलपदार्थांचे भोजन असा याचा विधी आहे. असे चार महिने प्रत्येक शु. चतुर्थीस करणे. मग मूर्तींचे दान. फल - विघ्ननाश.
* अविघ्नचतुर्थी व्रत
हे व्रत 'व्रत-शिरोमणी भाग १ मध्ये आले आहे, ते पाहावे.
* अविघ्न विनायक
अविघ्नकर व्रताप्रमाणे.
* विनायकव्रत :
एक तिथि व्रत. प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थीला हे नाव आहे. ही मध्यान्ह काल व्यापिनी घेतात. दोन दिवस ही चतुर्थी असल्यास पहिली घेतात. ही तृतीया युक्त असल्यास अधिक चांगली. या दिवशी गणेशपूजा हा प्रधान विधी असतो. मुख्यत: गाणपत्य संप्रदायाचे अनुयायी हे व्रत करतात. चतुर्थीला संपूर्ण उपवास करून दुसर्या दिवशी पारणे करतात.