या ज्या एका मागुन एक वृत्ती निघतात त्यांमधील संधी आणि त्या लीन झाल्यावर त्यांच अभाव ज्या निर्विकार चैतन्याचे योगानें समजतात. त्याला कुटस्थ असें म्हणतात ॥२१॥
ज्या प्रमाणें बाहेर घटाचेठायीं एक घट मात्र समजविणारे चिदाभास ज्ञान आणिदुसरें घटाची ज्ञातता समजविणारें ब्रह्मज्ञान अशीं दोन ज्ञानें आहेत. त्याप्रमाणें शरींराचें आंतल्या बाजुमही बाजुमही दोन चैतन्यें आहेत; म्हणजे एक कुटस्थ ज्ञान आणि दुसरें चिदाभास ज्ञान त्यामुळे मधील संधीपेक्षां वृत्ती अधिक स्पष्ट भासतात ॥२२॥
आतां घटाचेठायीं एकदां अज्ञातता आणि एकदा ज्ञाताता या जशा संभवतात तशा वृत्तीनेठायीं मात्र त्या संभवत नाहींत कारण त्या स्वप्नकाशक असल्यामुळें तेथें ज्ञानव्याप्तिची गरजच नाहीं. आणी जेथें ज्ञान व्याप्तीची गरज नाहीं तेथें अज्ञानाचाही संभव नाहीं ॥२३॥
हीं जीं देहाच्या आंतील दोन चैतन्येआं सांगितली तीं दोनही जरी स्वप्रकाश असलीं तरी त्यापैकी एकास जन्मनाश आहेत असा अनुभव असल्यमुळेअं तें कुटस्थ नव्हे आणि दुसरें अविकारी असें प्रत्यक्ष समजल्यामुळे तें कुटस्थ होय ॥२४॥
हें सांगणें आमचे पदरचें नव्हें अंतःकरण तदवृत्ति साक्षी चैतन्य विग्रह इत्यादि वचनांहींकरुन पुर्वाचार्यानीं कुटस्थाचा निवाडा असाच केला आहे. ॥२५॥
ज्याप्रमाणें मुख, आरसा व त्यांत पडलेंले प्रतिबिंब या तीन वस्तु जगांत दाष्टीस पडतात, त्याप्रमाणें कुटस्थ चिदाभास आणि बुद्धिया तीन वस्तु देहांत समजाव्या अशा रीतीनें वर्णन चिदाभासाचेंही केलें आहे ॥२६॥
आतां असा एक पुर्व पक्ष आहे कीं जसें घटद्वारा घटावच्छिन्न आकाशास जाणें येणें संभवतें. तसा बुत्ध्यावच्छित्न कुटस्थालाही लोकांतरीं जाणे संभवते. मग आणखी चिदाभासाचे निराळी कल्पना कशाला पाहिजे ॥२७॥
याजवर आमचें असें उत्तर आहे कीं केवळ परीच्छेदानेंच हा असंग कुटस्थ जीव होऊं शकत नाहीं. कारण तसें जर होईल तर काष्टा पाषाणांहीकरुन आच्छादिलेला कुटस्थ सर्वत्र असल्यामुळे सर्व जड पदार्थास असलेल्या कुटस्थास जीव ह्माणावें लागेल ॥२८॥
तर आतां याजवरही अशी एक कोटी आहे की, बुद्धि ही लकलकीत आहे पण भींत तशी नाहीं. म्हणुन भीत बुद्धी एकच ह्मणणे बरोबर नाहीं. याजवर आमचें असें उत्तर कीं. स्वच्छत्वाच्या संबंधाने त्या दोहोमध्यें जरीं भेद आहे, तरी परिच्छेदाच्या संबधानें ती दोन्हींही एकच आहेत ॥२९॥
यास दृष्टांत धान्य मोजण्याची दान मापें आहेत एक लांकडांचें व दुसरें कांशाचें या दोन्हीं मापांनीं तंदुलादिक धान्यें मोजलीं असतां या मापामुळें धान्यांत मुलीच फरक नाहीं ॥३०॥
तर कांशाच्या मापानें मापांत जरी फेर पडला नाहीं तई तें लकलकीत असल्यामुळे चिदाभासही तिजबरोबर असलाच पाहिजे ॥३१॥
प्रतिबिंब आणि आभास हे दोन्हीं एकच आहेत. कारण आभास ह्मणजे नसुन कांहीं वेळ भासणें आणि प्रतिबिंब ह्मणजें जें बिंबलक्षणरहित असुन बिंबासारखे भासतें ॥३२॥
हे लक्षण चिदाभासास बरोबर लागु पडतें चिदाभास संसंग आणी विकारी असल्यामुळें बिंब जे ब्रह्मा त्याच्या लक्षणाच एथें अभाव झाला आणि चिदाभास स्फुरणरुप असल्यामुळें तें त्याचें बिंबाप्रमाणें भासणें होय. ॥३३॥
येथवर चिदाभास अव्श्य आहे इतकें सिद्ध झालें आतां कोणी ह्मणेल बुद्धीच्या कल्पनेवर त्यांची कल्पना जर अवलंबुन आहे तर बुद्धी पासुन चिदाभास निरळा घेण्याचें कारण नाहीं: तर त्यास असें ह्मणतो कीं इतक्यावरच कां थांबावे ? त्या दृष्टीनें पाहिलें असतां देहापासुनही बुद्धि निराळी नाहीं असें ह्माणावें लागेल ॥३४॥
यावर प्रतिवाद्यांचें उत्तर येवढेच कीं देह नष्त झाला तरी बुद्धी मागें राहतें असें शास्त्रांत प्रमाण आहे, तसें बुद्धिपासुन चिदाभास निराळा आहे अशाविषयींही प्रवेश श्रुतींत प्रमाण आहे. ॥३५॥
हा जो चिदाभासाचा प्रवेश श्रुतीमध्यें सांगितला आहे. तो बुद्धिसहित प्रवेश अशी कोणी शंका घेण्याचें कारण नाहीं. कारण ऐतरेय श्रुतींत बुद्धिपासुन निराळा असा जो आत्मा तो प्रवेश करता झाला . असें स्पष्ट सांगितलें आहे. ॥३६॥
त्या प्रवेश श्रुतीचा अर्थ असा आहे कीं देहेंद्रियांसहवर्तमान हें जडजात मजवाजुन कसं टिकेल असा विचार मनांत आणुन हा जीवात्मा कपालत्रयाचा मध्यभाग चुरुन आंत प्रविष्ट होऊन संसार करितो ॥३७॥
आतां परमात्मा असंग असुन त्याणें प्रवेश कसा केला अशी कोणाची शंका असेल तर त्यास आम्हीं असें विचारतों कीं त्याणें सृष्टीं तरी कशी केली ? त्याणें सृष्टीं मायेचे योगानें केली तर प्रवेश तसाच केला असं ह्माणण्यास कोणती हरकत आहे? दोन्हीं गोष्टिस मायिकत्व आणि नाश हीं समानच आहेत ॥३८॥
औपाधिक रुपाला नाश आहे एतद्विषयीं श्रुतीमध्यें याज्ञवल्क्यांनेवें मैत्रेयीस स्पष्ट सांगितलें आहे. तें असं कीं परमात्मा या पंचभुतात्मक शरीरापासुन निघुन जाऊन त्याबरोबरच नाश पावतो ॥३९॥
त्याप्रमाणेंच हा आत्मा अविनाशी आहे . त्याचा देहादिकांशी मुळींच संसर्ग नाहीं असें कुटस्थाचें वर्णन श्रुतींमध्यें केलें आहे ॥४०॥