ब्रह्मानन्दे आत्मानन्द - श्लोक ६१ ते ९०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


याप्रमाणे आत्मा अतिप्रिय आहे असेंसिद्ध जाहलें याविषयीं ज्ञानीं आणि अज्ञानीं यांमध्यें चाललेला वाद श्रुतींत सांगितला आहे त्यावरुनही आत्म्याचें प्रियतमत्व ठरतें. ॥६१॥

तो वाद असाकीं साक्षी हा यावत दृश्य पदार्थापेक्षा फारप्रिय आह असें तत्त्ववेत्याचें ह्मणणें आणि अज्ञानीं असें ह्मणतां कीं पुत्रादिकच प्रियतम आहेत आणि साक्षीं ही केवळत्यांचा भोक्ता आहे. ॥६२॥

अत्म्यावांचून दुसरे पदार्थप्रिय आहेत असें ह्मणणारा मनुष्य एक शिष्य तरी असला पाहिजे किंवा प्रतिवादी तरी असला पाहिजे ह्मणून त्याजवर तत्त्ववेत्यानेम दिलेलें जें उत्तर तें शिष्यपक्षीं बोधपर आणि प्रतिवादिपक्षीशापपर असें दोन प्रकारानीं घेतलें पाहिजे. ॥६३॥

तें उत्तर असें कीं " अरें हें प्रिय प्रिय ह्मणतीस दोष आहे असें शिष्य विवेकांनें समजतो. आणि प्रतिवाद्याच्या वांटणीस शापच होतो. प्रिय ह्मणण्यामध्यें रडविण्याचा दोष आहे असं जे ह्मटले त्य दोषाचा तो असा विचार करितो. ॥६४॥

उदाहरणार्थ पुत्रच घे ह्मणजे झालें हा पुत्र मनुष्यासजो इतका प्रिय झाला आहे. तो जन्मास येण्यापुर्वीपासूनच मनुष्यास कसें रडवितो तें पहा. तो झाला नाहीं तरी आईबापांस दुःख आहेच बरे झाला तरी गर्भपाताची भीति त्यांतुन सूटला तर प्रसवाचें दुःख. ॥६५॥

त्यातुनही सूटुन उदराबाहेर आला तर ग्रहांची वरोगांचे पीडा व त्यातुनही सूटुन मोठा झालातर खुळा होण्याची चिंता बरे शाहणा झाला मुंज झाली तरी त्यास विद्या कशीं येईल ही चिंता आहेच कदाचितविद्याही चांगली झाली तर त्यांचें लग्न कसें होईल हीं चिंता. ॥६६॥

सूदैवेंकरुन मुलगी चांगली मिळुन लग्नही झालें तरी चिंता कोठें गेली. त्याला एकादें माहेर छंदाचें व्यसन लागेल बरें व्यसन नाहीं तर मुलें फार होऊन त्यांचे पोटाची पंचाईत पडेल तीही कदाचित पंचाईत गेली ह्मणा. संतति संपत्ति, विद्या, सद्रुण इत्यादिक गोष्ट सर्व प्राप्त झाल्या तरी शेवटी त्याच्या मरणाविषयीं काळजी आहेत. याप्रमाणें आईबापाच्य दुःखास अंतच नाही. ॥६७॥

असा विचार करुन पुत्रादिकांवरची प्रीति सोडुन देऊन परम प्रीति कायती आत्म्यावरच आहे असानिश्चय करुन रात्रंदिवस आत्म्याचेंच तो अनुअसंधान करितो. ॥६८॥

वर आम्हीं ह्मटलें आहे कीं, ही प्रीति तुला रडवील असा तत्त्ववेत्यानें प्रतिवाद्यास शाप दिलातो असा कीं आग्रहानें होईल व जन्न्मजन्मांतरी दुःख होईल असं सांगितलें. ॥६९॥

खरेंच आहे कीं ब्रह्मवेता हा केवळ ब्रह्मच असल्यामुळे त्याला इश्वरत्वही सहजच आले. तो शिष्यास किंवा प्रतिवाद्यास शाप किंवा आशीर्वाद रुपानें जें जें बोलेल तें तें खरेंच होईल यांत नवल तें काय ? ॥७०॥

जो पुरुष साक्षी जो सर्वांत उत्तम प्रिय असा आत्मा त्याचे अनुसंधान करितो त्याला तो अतिप्रिय आह आणि त्याला पुत्रादिकांप्रमाणें नाशही नाहीं ॥७१॥

आत्मा परप्रेमास्पद आहे ह्मणून तो परमानंदरुपही आहे सार्वभौमादि पदांपासून हिरण्यगर्भापर्यंत जसजशी प्रीतीची वृद्धि होते तसतशी सूखाचीही वृद्धि होते. असें बृहदारण्यकांत सांगितलें आहे. ॥७२॥

शि०- तुह्मीं ह्मणता कीं आनंदरुपता हा आत्म्याचा स्वभावच आहे पण चैतन्य जसें त्याचा स्वभाव ह्मणतां येईल. तसेंसूख हा त्याचा स्वभावच ह्मणतां येत नाही. कारण तसें जर असतें तर सर्व बुद्धिवृत्तीच्या ठायीं चैतन्यप्रमाणें सूखाचीही व्याप्ति असती पण तशी कांहीं दृष्टींस पडत नाही. हें कसें ? ॥७३॥

गू०- याला तुल एक दृष्टांत देतां ह्मणजे चांगलें समजेल. दिव्याचा स्वभाव दोन प्रकारचा. एक उष्णता आणि दुसरा प्रकाश प्रंतु सर्व घरांत प्रकाशाची जशी व्याप्ति असते. तशी उष्णतेची नसते. ह्मणून काय तेथें उष्णता नाहीं ह्मणतां येईल काय ? त्याप्रमाणें बुद्धिवृत्तीच्याठायीं चैतन्याचीच व्याप्ति असून कोठें सूखाची असते. ॥७४॥

शिष्य - चैतन्य आणि आनंद यादोन्हींचा जर अभेद आहे तर चैतन्य प्रकाश करणारी जी ही वृत्ति तीच आनदलाही व्यक्त करील गूरु - तसा कांहीं नियम नाहीं. कल्पना कर कें ज्यामद्यें गंध, रुप, रस, स्पर्श असे चारीही गूण आसलेला एक पदार्थ आहे उदाहरणार्थ आंबाच कां घेईनास आतां या आंब्यांचे ज्ञान होण्यास एकाच इंद्रियानें भागत नाही. तर त्याचा गंधादिक प्रत्येक गूण समजण्यास घ्राणादिक निराळी इंद्रियेंच पाहिजेत एक गूणदुसर्‍या इंद्रियानें घेतां येतच नाही. ॥७५॥

शि०- खरे परंतु हा दृष्टांत बरोबर जूळत नाहींसे वाटतें. कारण गंधादिक गूणांमध्यें जसा परस्पर भेद आहे. तसा चैतन्य अणि आनंद यांत मुळींच नाही. गू०- चैतन्य आणि आनंद या दोन्हींचा अभेद जो तुं ह्मणतोस तो काय साक्षीच्या ठिकाणीं कीं दुसर्‍या ठिकाणीं तें सांग. ॥७६॥

साक्षीचें ठायीं जर ह्मणशील तर चैतन्य आणि आनंद यांचा जसा अभेद आहे तसा आंब्यामध्यें किंवा पुष्पामध्येंही गंधाहि गूणांचा अभेद आहे. आणि दुसर्‍या ठिकाणीं जर ह्मणशील तरी आमचा दृष्टांत तसाच जळतो. इंद्रियें भिन्न भिन्न असल्यामुळे गंधादि गूणही भिन्न झाले त्याप्रमणें वृत्ति भेदानेंचैतन्य आणि आनंदयांत भेद आला. ॥७७॥

शि०- मग चिदानंदाचें ऐक्य तरी कोठें दृष्टीस पडतें ? गू०- बुद्धीची जी सात्विक वृत्ति तींत चिदानंदाचें ऐक्य स्पष्ट भासतें कारण तो वृत्ति स्वच्छ आहे परंतु राजस वृत्ति मलीन असल्यामुळें तिजमध्ये सूखाशांचा लोप होतो. ॥७८॥

यास दृष्टांत चिंचेमध्यें मीठ घातलें असतां त्याचा आंबटपणा जसा कमी होतो. त्याप्रमाणें वृत्तीमध्यें रजोगूण मिळाल्यानें तिचा आनंद लोपुन जातो ॥७९॥

शि०-आत्मा प्रियतम असल्यामुळे तो परमानंदरुप आहे असें विचाराअंतीं ठरलें परंतु योगावांचून काय होणार ? ॥८०॥

गू०- जें योगानें होतें तेंच योगावांचूनही होतें असें आह्मीं ह्मणतों शि०- तुमचा अभिप्राय समजला नाहीं. गू०- जें योगानें होतें तेंच योगावांचूनहीं होतें. अरे ज्ञानसिद्धिकरितां जसा आह्मी मागील प्रकरणीं योग सांगितला तसें विवेकापासूनहीं ज्ञान होतें असं आह्मीं म्हणतो. ॥८१॥

याविषयीं गीतेंत प्रमाणही आहे जें स्थानसांख्यानें मिळतें तेंच योगानेंही मिळतें असें योगी आणि विवेकी या दोघांनांही ज्ञानाद्वारा मोक्षरुपी फळ मिळतें तेंच योगानेंही मिळतें असें योगी आणि विवेका या दोघांनाही ज्ञानद्वारा मोक्षरुपी फळ मिळतें. ॥८२॥

शि०- दोन्हींही मार्गाचें फल एकच असल्यानंतर शास्त्रानें दोन मार्ग कां सांगितलें ? गू०- कित्याकांना योग साध्य होतो. आणि कित्येकांच विवेक करणेंच सोपें वाटते. अशा अभिप्रायानें भगवंतानें दोन मार्ग सांगितलें. ॥८३॥

शि०- तथापि मला योग आणि विवेक दोन्हीं भिन्न आहेत असें वाटतें गू०- असें तुला कां वाटते दोघांला ज्ञान सारखेंच हें तर तुं कबुल करतोस ना ? शि०- पण योग्याला राग द्वेष मुळींच नसतात गूरु ते विवेक्यालाही नसतात. ॥८४॥

अरे ज्याला आत्माच सर्वामध्यें प्रिय झाला त्याची प्रीति विषयावर कशी जाईल ? विषय अप्रिय झाल्यावर मग अर्थातच त्याला कोणचीही गोष्ट प्रतिकुल नाही. मग राग द्वेष तरी कोठुन येनार ? ॥८५॥

शि०- विवेक्याला देहादिकांस ज्या प्रतिकुल वस्तु असतात त्याविषयीं द्वेष असतो. गू०- तसा योग्यालाही असतो. शि०- तसा द्वेश करीत असताना तो योगीच नव्हें. गू०- तशा वेळीं तो विवेकीही नव्हें. ॥८६॥

शि०- पण तुमच्या विवेक्याला द्वैताचें भान असतें. गू०- भान असतें परंतु तें व्यवहाराकालीं कीं विवेककालीं ? शि०- व्यवहारकालीं. गू०- तश वेळीं योग्यालाही द्वैतभान आहे. शि०- पण समाधीमध्यें कुठें आहे. गू०- त्याप्रमाणें विवेक्यालाही विवेकदर्शेंत द्वैत दर्शन नाहीं. ॥८७॥

यांचें प्रतिपादन पुढील प्रकरणीं ह्मणजे पुढील अद्वैतानंद नामक तिसर्‍या अध्यायांत आह्मी करुं. ॥८८॥

शि०- तुमच्या विवेक्याला जागाचें भान मुळींच नसून सर्वदा निजानंदनच जर भासला तर तो योगीच म्हटला पाहिजे विवेकी कसला ? गू०- तसें म्हणतो काण ? आमच्या मतें योगी अणि विवेकी एकच. तें तुझ्या समजूतीस पक्कें यावें असें आमच्या मनांत होतें तसें झालें स्वस्थ ऐस. ॥८९॥

याप्रमाणें आह्मीं ब्रह्मनंद प्रकरणाच्या या दुसर्‍या अध्यायीं मंदबुद्धीच्या लोकांकरितां आत्मानंदाचें विवेचन करुन हें प्रकरण आटपतों. ॥९०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP