या प्रकरणांत अद्वैतानंद ह्मणजे काय व तो विवेकापासून कसा प्राप्त होतो. तें येथें संवादरुपानें सांगतो. शि०- आपण ज्या आत्म्यानंदाचें विवेचन केलें तो आणि योगानंद हे एकच ह्मणता; परंतु मुथ्यात्मा व गौणात्मा असे त्यास प्रतियोगी असल्यामुळें सजातयित्वादि भेद येऊ पाहतो तेव्हा या द्वितीयानंदास ब्रह्मत्व कसे येईल ॥१॥
गू०- हा आत्मानंद अद्वितीयच आहे. कारण तैत्तिरीय श्रुतीमध्ये तस्माद्दा एतस्मात आत्मन आकाश; या वाक्यानें आकाशापासून आमचे देहापर्यंत सर्व जग आमानंदाहुन निराळें नाहीं असें ठरतें त्यावरुन तो अद्वितीय ब्रह्मच म्हटला पाहिजे ॥२॥
शि०- पण ती श्रुति आत्म्याविषयीं आहे आनंदाविषयीं नाही. गू०- अरे आत्म आणि आनंद यांत कांहीं भेद नाही. आनंदाविषयींचेंच प्रमाण पाहिजे तरदुसरें आहे तें तुला सांगतो ह्मणजे झाले. श्रुतीत असेंही म्हटले आहे कीं हें जग आनंदापासून झालें आहे, त्यांतच तें राहते व त्यांतच तें लीन होते म्हणून ते आनंदापासून भिन्न नाही. कारण कार्य हें कारणापसून भिन्न नसते ॥३॥
शि०- कारण कार्यापासून भिन्न नसतें असा जो आपण नियम केला, त्यास अपवाद आहे कुलालापासून घट उप्तन्न होतो म्हणूणकुलाल हा त्याचे कारण झालें पण तो घटापासून भिन्न आहे काय ? गू०- आमचा आनंद घटाचें उपादन कारण जसें माती, तसा जगाला उपादान कारण आहे. कुलालाप्रमाणें निमित्त कारण नव्हे ॥४॥
शि०- कुलालच कां उपादान कारण ह्मणूं नये. गू०- उपादान कांरणाचें लक्षण हेंच कीं तें स्थिति आणि लय या दोहोंस आघात असतें घटाच्या स्थितिलयांस कुलाल आधार होत नसल्यामुळे उपादानात लक्षण त्यास लागू पंडत नाहीं परंतु घटाचे स्थिति लय मातींत होतात. म्हणून माती हे उपादान कारण घटांचे होय त्याचप्रमाणें जगाच्या स्थितिलयांस श्रुतीत सांगितल्याप्रमाणें आनंद हा आधार आहे म्हणून तो जगाचा उपादान म्हटला पाहिजे ॥५॥
शिष्य उपादान करणाचें लक्षण समजले मग पूढें काय ? गू०- हे उपादान कारण तीन प्रकारचें आहे विवर्ति परिणामि आणि आरंभक यांपैकी शेवटच्या दोन प्रकाराला निरवयव वस्तुंत अवकाशच मिळत नाहीं. ॥६॥
शि०- त्या तिन्हीं प्रकाराचें विवरण कृपा करुन सांगा गू०- आरंभवाद्याचें मत असें आहे कीं एका कारणापासून निराळ्याच प्रकारचें कार्य उप्तन्न होतें यास उदारहण तंतुपासून पट उप्तन्न होतो येथें तंतु आणि पट भिन्न आहेत ॥७॥
एका पदार्थाचें जे अवस्थांतर होतें. त्याला परिणाम ह्मणतात दुध दहीं माती घट सूवर्ण कुंडल ॥८॥
आणि वस्तुची पुर्वावस्था न जातां अवस्थांतराचा जो भास होतो तोच विवर्त जसा रज्जूवर सर्पाचा भास होतो. शि०- पण रज्जू सावयव आहे गू०- हा विवर्त सावयाबावर जसा घडतो. तसा निरवयावावरही घडतो. यास उदाहरण आकाशाचे आकाशास वस्तुतः रंग कोनाचाच नसौन तें निळें दिसतें ॥९॥
शि०- मग तुमच्या आनंदाला कोणचा प्रकार लागू पडतो. ? गू०- आनंदास विवर्त लागू पडतो. जसा रज्जूवर सर्प भासतो त्याप्रमाणें आनंदावर हें जग भासत आहे. शि०- तुमचा आनंद अद्वितीय आहे असं म्हणतां त्यावर जगाची कल्पना तरी कशी झाली ? गू०- मायेमुळॆ झाली जसें एसेंजालिक शक्तीला गंधर्वनगरादिकांची कल्पना करितां येते, त्याप्रमाणें मायेमुळें जगाची कल्पना झाली. ॥१०॥
शि०- मायेमुळे जर जगाची कल्पना झाली, तर तुमच्या आनदाखेरीज दुसरी माया ह्मणून एक आहेत तेव्हां अर्थात द्वैत आलें गू०-ज्या पदार्थाचें अमुक निरुपणाच करीतां येत नाहीं. तो मिथ्याच ह्मटला पाहिजे माया ही एक शक्ति आहे ती जर आनंदापासून निराळी समजावी तर शक्त पदार्थापासून शक्ति मुळींच निराळीं नाहीं असा आमचा अनुभव आहे बरें निराळी नाहीं ह्मणवी तर कांही कारणांनी तिचा प्रतिबंध होतो. शक्ति जर निराळी नसेल तर प्रतिबंध कोणाला होईल. ह्मणून ती अनिर्वचनीय आहे. ॥११॥
शि०- शक्ति मुळीं अतीद्रिय पडली मग तिचा प्रतिबंध कसा ओळखावा ? गू०- शक्तीचें अनुमान कार्यावरुन करावयाचें तें कार्य बंद झालें ह्मणजे प्रतिबंध झाला असें समजावे यास उदारहण अग्नीचें आग्निशक्ति तिचें जें कार्य दाहकत्व त्यावरुन समजावयाची तें कार्य नाहीसें झाले ह्मणजे शक्तीस मंत्रादिकांचा प्रतिबंध झाला असें समजावा ॥१२॥
याप्रमाणें याविषयीं उपनिषदांत प्रमाण आहे तें असें कीं मोठंमोठें मुनि परमात्माची शक्ति तिचें कार्यामध्यें झांकलीं असें ध्यान करुन पाहते झाले दुसरें एके ठिकाणी म्हटलें आहे कीं ह्म परमात्मशक्तिचें स्वरुप क्रिया ज्ञान बलरुप आहे. ॥१३॥
योगवाशिष्ठातही असेंच सांगितलें आहे वशिष्ठ म्हणतात हेंरामा, हें परब्रह्म नित्य पुर्ण अद्वितीय असून सर्व शक्ति त्याच्याच आहेत ॥१४॥
त्या शक्तिच्या योगानें जेव्हा तें ब्रह्म प्रफुल्लित होते. तेव्हा हें जग दिसूं लागतें ती शक्ति जीवाचे ठायीं चेतनरुप आहे ॥१५॥
वायुंत चलन रुप आहे. दगडांत दार्ढ्यरुप आहे. उदकांत द्रवरुप आहे. अग्नीत दाहारुप आहे. ॥१६॥
आकाशांत शन्यरुप व विनाशी पदार्थात नाशरुप आहे ज्याप्रमाणे लहानशा अंड्यामध्यें महा सर्प गूप्तरुपानें असतो किंवा एक अलहानश अबीजामध्ये फलपुपाशाखामुलयुक्त वृक्ष असतो त्याप्रमाणें हे सर्व जग ब्रह्मचेठायीं मावलें आहे. ॥१७-१८॥
पृथ्वीच्या ज्या प्रमाणें अमुकच देशांत अमुकच काळीं अमुकच प्रकारशीं धान्य फळें पिकतात त्याप्रमाणें या ब्रह्मवर देशकालाप्रमाणें निरनिराळय़ा शक्ति उप्तन होतात ॥१९॥
हे राम असता जो सर्वव्यापी आत्मा त्यापासून पुर्वी मनन शक्ति जी उप्तन्न झाली त्यास मन असें म्हणतात ॥२०॥