मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|अखंडादि काव्यरचना|विभाग ३| म्हस्के यांस पत्न विभाग ३ बळी राजा मानव महंमद संस्थान बडोदें यांना पत्न जगन्नाथ यांना पत्न उत्तर म्हस्के यांस पत्न काव्यरचना - म्हस्के यांस पत्न महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली. Tags : mahatma jyotiba phuleकाव्यमहात्मा ज्योतिबा फुले मे. रावसाहेब गंगाराम भाऊ म्हस्के यांस पत्न पाठविलें, त्यासंबंधीं Translation - भाषांतर ॥अखंड॥आजारी शत्नूच्या जाई खबरीस ॥ साह्यकारी त्यास ॥ खरा शूर ॥१॥झालें गेलें सर्व आणूं नये मनीं ॥ सूड कारस्थानी ॥ वर्तू नये ॥२॥नीट झाल्यावर त्यास उभा करी ॥ कुस्तीगीरापरी ॥ त्याशीं लढे ॥३॥सत्याआचरणीं यश मिळवावें ॥ जगा दाखवावें ॥ जोती म्हणे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP