काव्यरचना - जगन्नाथ यांना पत्न
महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.
॥अखंड॥
आर्यांच्या इराणीं नाहीं भेदाभेद ॥ घ्यावा हाच शोध ॥ वेदामध्यें ॥१॥
गोंड भिल्ल क्षेत्नी होते मुळ धनी ॥ इरानी मागुनी ॥ आले येथें ॥२॥
धिंगाणा मांडिला आर्य भटोबांनीं ॥ स्वदेशाभिमानी ॥ रक्षूं गेले ॥३॥
यज्ञभंग केले झोडीले लुटीले ॥ दस्यू नांव दिलें ॥ ब्राह्मणांनीं ॥४॥
दस्यूचा अपभ्रंश "दुष्ट" दुर्गूणी ॥ शब्द आर्यजनीं ॥ देई साक्ष ॥५॥
दस्युची गलती दोस्त दुष्मन ॥ निघे अनुमान म्लेंच्छवाणी ॥६॥
आर्यभटोबाचें वर्चस्व झालें ॥ क्षत्नीय दास केले ॥ म्हणे क्षुद्र ॥७॥
क्षुद्राचा अपभ्रंश शुद्र बा झाला ॥ प्रचारांत आला ॥ अखेरीस ॥८॥
गर्भीणी स्त्नीयांस धुंडून काढील्या ॥ जप्तीस ठेवील्या ॥ अटकेंत ॥९॥
पोर्टी पुत्न होतां परशुरामानें ॥ वधीर्ली शस्त्नानें ॥ तान्हीं बाळें ॥१०॥
वध केला साच रेणुकामातेचा ॥ लाडका पित्याचा ॥ देव दैचा ॥११॥
वैरभावें दिलीं दुर्जी नावें तुच्छ ॥ राक्षस पिशाच्य ॥ महा अरी ॥१२॥
पोटापुर्ते देई त्यांचे कष्टांतून ॥ घेई हिसकून ॥ बाकी सर्व ॥१३॥
पशुपेक्षां नीच शिक्षेचा बा ठोका ॥ मार्गे अमेरिका ॥ जगामार्जी ॥१४॥
सर्वोपरी छळ नित्य विटंबना ॥ केली निर्भत्सना ॥ सर्वकाळ ॥१५॥
जाच नाना परी विद्या बंद केली ॥ दया नाहीं आली ॥ क्षणमात्न ॥१६॥
मेली होती काय त्यांची क्षमा दया ? ॥ काढीं मनुराया ॥ मनु तुझें ॥१७॥
सार्वजनिक सभा स्त्नी विटाळशी ॥ वाकडी म्हाराशीं ॥ मर्धी का रे ॥१८॥
विर्ध्वांचे परी न्याशनल कांग्रेस ॥ पळे बंगाल्यास ॥ नाच करी ॥१९॥
ॐ नमो तो नाहीं मांगम्हारास ॥ सिवील सर्व्हीस ॥ कोणासाठीं ? ॥२०॥
सावली न घेती मांगमहाराची ॥ प्रित बंधुत्वाची ॥ जोडे कैसी ॥२१॥
सार्वजनिक सभा बोधी सरकारास ॥ सर्व वम् फुस ॥ ब्रह्मकुट ॥२२॥
नवल करीजे नटवयाचे परि ॥ शुद्र राजे घेरी ॥ अल्लडसे ॥२३॥
वकीलाचा थाट शिष्टाई करीती ॥ लिबार्नरा देती ॥ हूल थापा ॥२४॥
आर्याजींची नीति अति अमंगळ ॥ कथीली गोपाळ ॥ देशमूर्खे ॥२५॥
नॅशनल सभा इंग्रजा कां बोधी ॥ सत्य वर्ता आर्धी ॥ एकीसाठीं ॥२६॥
आर्य भटासाठीं सिवील सर्विस ॥ धोका हा देशास ॥ भीक माझी ॥२७॥
नित्य किती सांगू विनवून ॥ खरे हे पाषाण ॥ मूर्तीमंत ॥२८॥
लीवार्नर साचा निर्मळ बुद्धीचा ॥ कैवारी शुद्रांचा ॥ दीनबंधु ॥२९॥
विद्वान शुद्रांनों जावे कां रे व्हाना ॥ तपासोनी पहाना ॥ ब्रह्मघोळ ॥३०॥
अज्ञानी स्त्नियांचे नाच की नाचाल ॥ सर्वस्वी नाडाल ॥ संततीला ॥३१॥
पशूच्या चर्माचे जोडे कीं रे होती ॥ तुमची फजीती ॥ क्लेश सर्वां ॥३२॥
देवापाशी तुम्हीं जाब काय द्याल ॥ गोंधळीं पडाल ॥ सर्वसाक्षी ॥३३॥
मेल्यामार्गे तुमची छी थू कीं होईल ॥ स्तीया लाजतील ॥ चौघांमध्यें ॥३४॥
पशू नव्हे तुम्ही मानव कमाल ॥ देणगी अक्कल ॥ विध्वा केली ॥३५॥
अज्ञानांचे राजे श्रीमंत कां झालां ॥ जन्मत: नाहीं मेलां ॥ एक दु:ख ॥३६॥
इंग्रजांचे श्रम पहा डोळेभरी ॥ होऊनी आभारी ॥ माना त्यास ॥३७॥
कृतघ्न पेशवे होऊं नका मनीं ॥ मागतसों दानीं ॥ एवढेंच ॥३८॥
मानवपदाची जरा लाज धरा ॥ विद्वान तीं करा ॥ मुलीमुलें ॥३९॥
गिर्वाणी शिकतां कळिले तुम्हाला ॥ आठवाल बोला ॥ माझ्या तुम्ही ॥४०॥
ऐकूं दिलें नाहीं एकहि शब्दाला ॥ वेदबखरीला ॥ लपविलें ॥४१॥
द्विजकूट तुम्ही आणावें मैदानी ॥ आली ही पर्वणी ॥ जोती सांगे ॥४२॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP