श्री मुक्तेश्वरी पोथी - प्रार्थना व आरती
श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.
ओंम् तत् सत्
। सद्गुरुनाथ महाराज की जय ।
॥ॐ श्रीगुरुदेव ॥ जय गुरुदेव ॥
आरती अवधूता जय जय आरती गुरुनाथा ॥ध्रु०॥
ज्ञान-दान देउनि भक्ता ।
सुख देसी नित्या ॥ जय जय आरती गुरुनाथा ॥१॥
मी-तूंपणाचे भाव हरपुनी ।
समता दे चित्ता ॥ जय जय आरती गुरुनाथा ॥२॥
नित्यानंद तूंचि द्त्त ।
हरिहर जगत्राता ॥ जय जय आरती गुरुनाथा ॥३॥
मुक्तानंद म्हणे श्रीगुरुदेवा ।
तूंचि मातापिता । जय जय आरती गुरुनाथा ॥४॥
श्रीसद्गुरुनाथ महाराज की जय ।
ॐ श्रीगुरुदेव
गुरुदेव मुक्तानंदांची आरती
आरती मुक्तानंदा । गुरु प्रेमानन्द कन्दा ॥ध्रु०॥
नित्यानंद कृपाधारा । वाही जगद्गुरुद्वारा ।
वर्षें जगदुद्धारा । दे परमानन्दा ॥१॥
गणेशपुरीं राहुनी । भक्तगणा जमवुनी ।
ध्यानातें सर्वां लावुनी । पात्र करी योगानंदा ॥२॥
श्रीगुरुदेवाश्रम । प्रसिद्ध योग धाम ।
शक्तिपात क्रियाक्रम । प्रगटवी ह्रदयानंदा ॥३॥
कुंडलिनीचा उन्मेष । निजगुरुशक्तिविशेष ।
नांदतसे युगपुरुष । देण्या सदा आनंदा ॥४॥
गाऊनि गुरुगाथा । चरणीं ठेऊनि माथा ॥
कुसुमेश्वरी लीन सर्वथा । मागे शुभाशीर्वादा ॥५॥
। सद्नुरुनाथ महाराज की जय ।
॥ ॐ श्रीगुरुदेव ॥
गुरुभक्तिदेवी श्रीमुक्तेश्वरीची आरती
गुरुभक्तीदेवी गुरुभक्तीदेवी । जय श्रीमुक्तेश्वरी ।
आरती ओवाळूं तुज । मुक्तेश्वरमंदिरीं ॥ध्रु०॥
नित्यानंदांची कृपा । मुक्तानंदांची मुक्तेश्वरी ।
नित्यपठणें जी । सर्वांना तारी ॥१॥
नित्य वास तुझा । पवित्र गणेशपुरीं ।
गुरुभक्ति शिकवूनी । भक्तांना उद्धारी ॥२॥
लिहुनी घेतलीस ।’ श्रीग्रुरुगीतार्थेश्वरी’ ।
विवाहास योग्य । केलीस ’ कुंडलेश्वरी ’ ॥३॥
मुक्तानंद प्रसाद । ओवीबद्ध ’ मुक्तेश्वरी ’ ।
’ चित्-शक्ति-विलास ’ । विलसे घरोघरीं ॥४॥
मागोमाग प्रगटे । ’ एकाध्यायी ज्ञानेश्वरी ’ ।
अशीच गुरुकृपापात्र । होऊं दे कुसुमेश्वरी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : July 01, 2011
TOP