अमृतानुभव - नमन
अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.
जे अजन्म, अक्षर, आनंद मूर्त । स्वयंपूर्ण, वर्णनातीत ।
श्रीनिवृत्तिनाथनामें विख्यात । त्या दैवता मी शरण ॥१॥
जय जय विद्या साक्षात शांकर । जिला गुरु म्हणे जनसागर ।
त्या ब्रह्मविद्येसि दयार्द्र । निरंतर नमितसे ॥२॥
शिव-शक्ति समरूप संलग्न । कोणे सार्ध केला अर्ध कवण ।
हे नित्याचा द्वैताभास न- । जाणों दे ॥३॥
परस्पर अद्वैत अतीव । हे दर्शविती आपुले तत्त्व ।
तेचि आकळण्यास्तव । वंदी मी त्यां जगताद्यां ॥४॥
विश्वाचे आदि-मध्य-अंता । आदिमध्यअंतमूर्ता ।
अंतआदिमध्यरहिता । नमो पूर्ण शंभूसि त्या ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP