अमृतानुभव - ज्ञानअभेदकथन
अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.
आता मारोनि अज्ञान । अभेदें वावरे ज्ञान । जैसी निद्रेसि नाशून । जागृति नांदे ॥१॥
दर्पण जाता उरला । जो ऐक्यबोध पहिला । तो मुख भोगी, आपुला- । आपणचि ॥२॥
ज्ञान ज्या त्या प्रकारें पकारें परोपरी । जगीं आत्मैक्य करी । ते सुरीने स्वतःत खोचावी सुरी । तैसे होय ॥३॥
आत जाऊनि लावी खोपट । किडा नाशी सर्व आपणासकट । चोरल्या वस्तूंसह मोट- । चोर बांधी आपुली; ॥४॥
अग्नीने कापुराचे मिषें । आपणासचि जाळिले जैसे । ज्ञान-अज्ञाननाशें । जाहले तैसे ॥५॥
अज्ञानाचा टेकू नसे । तेव्हा ज्ञान बहु फाकतसे । जेव्हा ते नाश करितसे । आपुलाचि ॥६॥
वात विझता विझता जैसे । मोठी होतांना दिसे ॥ ती केवळ नाशास्तव असे । दीपाचे जैसी; ॥७॥
उठणे की पडणे । कुचभाराचे कोण जाणे ? । वा उमलणे की सुकणे । जाईचेही ? ॥८॥
तरंगांचे रूपा येणे । तयासीचि नाव निमणे । वा विजेचे उदयणे- । तोचि अस्त; ॥९॥
तैसे पिऊनि अज्ञान । तेथवरी वाढे ज्ञान । जेथ ते आपुले निधन । निःशेष साधे ॥१०॥
कल्पांतींची भरती जैसी । स्थळा-जळा दोहींसी । बुडविता ऐल-पैलही । राहोचि न जाणे; ॥११॥
की विश्वालाहि गिळुनि सकळ । वाढे जर सूर्यमंडळ । तर तेज-तम सकळ । तेचि होय; ॥१२॥
निद्रा जाय अथवा । गाढ निद्रेसि हिरावुनिया । जागणे ठाके, होऊनिया- । जागृतीचि; ॥१३॥
तैसे अज्ञान आटोनि । ज्ञान ये उदया । ज्ञानही अज्ञाना गिळूनिया । ज्ञानचि होई ॥१४॥
न पुनवेसी भरे । न असवसेसी सरे । ती चंद्राची उरे । सतरावी कला जैसी ॥१५॥
अन्य तेजें न निस्तेज होई । कोणें तमें न झाकोळेही । त्या ब्रह्मवस्तूचे उपमेठायी । सूर्यचि योग्य ॥१६॥
म्हणोनि ज्ञानें जे उजळे । अथवा अज्ञानें मळे । तैसे नव्हे, जे निर्वाळले । ज्ञानमात्रचि ॥१७॥
परि आपणचि ज्ञानमात्र ते । हे काय तया कळते ? । काय बुबुळ देखते- । बुबुळासीचि ? ॥१८॥
आकाश स्वतःत रिघे ?- । आग स्वतःसीचि लागे ? । काय कोणी आश्रय घे- । आपुल्याचि माथ्यावरी ? ॥१९॥
दिठी आपणासी देखे ? । स्वाद आपणासी चाखे ? । नाद आपुलेचि ऐके- । नादपण ? ॥२०॥
सूर्य काय सूर्यासी उजळे ? । फळ स्वतःसी फळे ? । काय परिमळ परिमळें- । हुंगिला जाय ? ॥२१॥
तैसे आपणासि आपण । ते न जाणे हे जाण । म्हणोनि ज्ञानपणाविण । ज्ञानमात्र ब्रह्म जे ॥२२॥
आणि ज्ञान ऐसे संबोधन । ज्ञानपणेंही करी सहन । तर ज्ञानपणेंचि अज्ञान । न होते काय ? ॥२३॥
तैसे तेज जे आहे । ते अंधार खचित नव्हे । मग तेज म्हणुनि जाणवे । तेजासी काय ? ॥२४॥
तैसे असणे आणि नसणेही । हे नाही जयाठायी । आता ते मिथ्या ऐसे वाटेलही- । जर या बोलें; ॥२५॥
तर काही नाही सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था । तरी नाही ही कथा । अनुभवील कोण ? ॥२६॥
ब्रह्म शून्य हा बोध । कोणाच्या सत्तेने होय सिद्ध ? । हा नसताचि लोकापवाद । ब्रह्मवस्तूसी ॥२७।
मालविता दिवे । मालविता जर मालवे । तर दीप नाही हे अनुभवे- । कोण तेथ ? ॥२८॥
अथवा निद्रेचे आलेपणें । निजलेला जाय प्राणें । तर निद्रा भली हे कोणें- । कोणा सांगावे ? ॥२९॥
घट घटपणें आभासे । भंगता भंगलेपणहि दिसे । सर्वथा काहीचि नसता, घट नसे- । ऐसे कोणी म्हणावे ? ॥३०॥
म्हणोनि काहीनाहीपणा । देखत नसे आपणा । न होऊनि असण्याविना । असणे जे ॥३१॥
परि आणिका आपणा वा । न पुरे विषय व्हावया । म्हणोनि नसावया । कारण होय ॥३२॥
जो निर्जन रात्रीं निजला । तो आणिकांनी नच देखिला । आपुलाही निमाला । आठव तया; ॥३३॥
परि तो जीवें नसे ऐसे नव्हे । तैसे ते विशुद्ध असणे आहे । म्हणोनि आत्मा बोलणे न साहे । आहेनाहीचे ॥३४॥
दिठी स्वतःकडे मुरडुनि पाही । तेव्हा मोडे दिठीपणही । परि असे-नसे काय पुढे हेही । जाणेचि ती; ॥३५॥
काळा काळोखीं आपणा- । वा आणिका कोणा- । न दिसे, तरि बाळगी बाणा- । ‘हा मी’ ऐसा; ॥३६॥
तैसे आहे की नाही । हे काही न होई । काही नसूनि जे असेही । ठायी ठायी ॥३७॥
निर्मळपणें आपुल्याच । आकाशाचा विरला संच । तो स्वयें असेच । पाहणार्या जरि काही नसे ॥३८॥
विहीर न खणता कोणी- । पाहू न शके पाणी । परि ते अंगचेचि निर्मळपणीं । आहेचि पूर्णत्वें ॥३९॥
ब्रह्मासी जैसे । असणे हेचि असे । तो आहे-नाही या भाषे- । त्यागुनीचि होय ॥४०॥
निद्रेचे नाहीपण । सरता जे ये जागेपण । तैसे असण्या-नसण्याचे भान । विरोनि जे असणे; ॥४१॥
वा भूमीवरी सुगडे ठेविली काढिली । ती सुगडा सहित-रहित जाहली । परि हे म्हणणे वृथाचि मुळी । भूमी, सुगड मृत्तिकाचि केवळ ॥४२॥
परि हे धर्म दोन्ही । न शिवती भूमीचे अंगा रोमाही । त्यावेळी भूमी ऐसे ठायीठायी । चोख जे असणे ॥४३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP