पाण्यासंबंधी तंटे - कलम २६२
भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदीखोर्यांतील पाण्यासंबंधीच्या तंटयांचा अभिनिर्णय. २६२.
(१) संददेला कायद्याद्वारे कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या किंवा नदीखोर्यातील पाण्याचा वापर. वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंटयाच्या किंवा तक्रारीच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येईल.
(२) या संविधानात काहीही असले तरी. संसदेस कायद्याद्वारे. खंड (१) मध्ये उल्लेखिलेल्या अशा कोणत्याही तंटयाच्या किंवा तक्ररीच्या बाबतीत. सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही. अशी तरतूद करता येईल.
N/A
References : N/A
Last Updated : January 13, 2013
TOP