आणीबाणीसंबंधी तरतुदी - कलम ३५७ ते ३५८
भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
अनुच्छेद ३५६ खाली प्रसृत केलेल्या उद्घोषणेअन्वये वैधानिक अधिकारांचा वापर. ३५७.
(१) अनुच्छेद ३५६ च्या खंड (१) खाली प्रसृत केलेल्या उद्घोषणेद्वारे राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार संसदेकडून किंवा तिच्या प्राधिकार्यान्वये वापरण्यात येतील, असे घोषित करण्यात आले असेल त्या बाबतीत.---
(क) संसद, राज्य विधानमंडळाचा कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला प्रदान करण्यास आणि अशा प्रकारे प्रदान केलेला अधिकार. ज्या शर्ती घालणे राष्ट्रपतीला योग्य वाटेल अशा शर्तींना अधीन राहून त्याने त्या संबंधात विनिर्दिष्ट करावयाच्या अन्य कोणत्याही प्राधिकार्याकडे सोपविण्यासाठी त्याला प्राधिकृत करण्यास;
(ख) संसद किंवा राष्ट्रपती किंवा उपखंड (क) खाली असा कायदे करण्याचा अधिकार ज्याच्या ठायी निहित केला आहे. असा अन्य प्राधिकारी. संघराज्याला अथवा त्याच्या अधिकार्यांना किंवा प्राधिकार्यांना अधिकार प्रदान करणारे व त्यांना कर्तव्ये नेमून देणारे अथवा अधिकार प्रदान करण्यास व कर्तव्ये नेमून देण्यास प्राधिकृत करणारे कायदे करण्यास;
(ग) राष्ट्रपती, लोकसभा सत्रासीन नसेल तेव्हा राज्याच्या एकत्रित निधीतून खर्च केला जाण्यास संसदेकडून अशा खर्चास मंजुरी मिळेतोवर प्राधिकार देण्यास.
सक्षम असेल.
(२) संसदेने किंवा राष्ट्रपतीने किंवा खंड (१) च्या उपखंड (क) मध्ये निर्देशिलेल्या अन्य प्राधिकार्याने राज्य विधानमंडळाच्या प्राधिकाराचा वापर करुन केलेला जो कायदा करण्यास संसद, राष्ट्रपती किंवा असा अन्य प्राधिकारी, अनुच्छेद ३५६ खालील उद्घोषणा प्रसृत झाली नसली तर एरव्ही सक्षम झाले नसते. असा कोणताही कायदा हा. ती उद्घोषणा अंमलात असण्याचे बंद झाल्यानंतर. एखादे सक्षम विधानमंडळ किंवा अन्य प्राधिकारी यांच्याकडून तो बदलण्यात अथवा निरसित करण्यात किंवा त्यात सुधारणा करण्यात येईपर्यंत. अंमलात असण्याचे चालू राहील.
आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद १९ च्या तरतुदी निलंबित असणे. ३५८.
(१) भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता युद्धामुळे किंवा परचक्रामुळे धोक्यात आली आहे. असे घोषित करणारी आणीबीणीची उद्घोषण अंमलात असेल त्या कालावधीत अनुच्छेद १९ मधील कोणत्याही गोष्टीमुळे, भाग तीन मध्ये व्याख्या केलेले असे “राज्य” हे. त्या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी नसत्या तर एरव्ही जो कायदा किंवा शासकीय कारवाई करण्यास सक्षम झाले असते. असा कोणताही कायदा किंवा अशी कोणतीही शासकीय कारवाई करण्याच्या राज्याच्या अधिकारावर निर्बंध पडणारा नाही. पण याप्रमाणे केलेला कोणताही कायदा. ती उद्घोषणा अंमलात असण्याचे बंद होताच अक्षमतेच्या व्याप्तीपर्यंत निष्प्रभावी होईल. मात्र. तो कायदा याप्रमाणे निष्प्रभावी होण्यापूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी याला अपवाद असतील:
परंतु. जेव्हा अशी आणीबाणीची उद्घोषणा भारताच्या राज्यक्षेत्राच्या फक्त्त एखाद्याच भागामध्ये अंमलात असेल तेव्हा. भारताच्या राज्यक्षेत्राच्या ज्या भागामध्ये आणीबाणीची उदघोषणा अंमलात असेल तेथील किंवा त्याच्या संबंधातील हालचालींमुळे भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता धोक्यात आली असेल तर आणि तेवढया मर्यादेपर्यंत. ज्यामध्ये किंवा ज्याच्या कोणत्याही भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात नसेल असे कोणतेही राज्य किंवा संघ राज्यक्षेत्र याच्या संबंधात किंवा तेथे या अनुच्छेदाखाली असा कोणताही कायदा करता येईल किंवा अशी कोणतीही शासकीय कारवाई करता येईल.
(२) खंड (१) मधील कोणतीही गोष्ट,---
(क) ज्या कोणत्याही कायद्यामध्ये. तो करण्यात आला त्यावेळी अंमलात असलेल्या आणीबाणीच्या उद्घोषणेसंबंधीचा तो कायदा आहे. अशा आशयाचे कथन अंतर्भूत नसेल त्या कायद्याला. किंवा
(ख) असे कथन अंतर्भूत असलेल्या कायद्याखाली नव्हे तर अन्यथा केलेल्या कोणत्याही शासकीय कारवाईला.
लागू असणार नाही.
N/A
References : N/A
Last Updated : January 14, 2013
TOP