एकादश स्कंध - अध्याय पहिला
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । भवभवाचादाता । भवभवाचाजनिता । भवभवाचाकर्ता । भवहर्ताभवाचा ॥१॥
भवभवानीचापती । भवभवाचीगती । भवभवाचीमूर्ति । भवभूतीभवाची ॥२॥
भवभवाध्वदीपिका । भवभवाभवाब्धीचीनौका । भवभवजालाचीमूषिका । भवपटाचीकात्रीभव ॥३॥
भवधर्माचारक्षक । भव अधर्मभक्षक । भव अर्थाचादायक । अनर्थनाशभवमूर्ति ॥४॥
भवकामाचादाता । भवकामाचाधक्षिता । भवमोक्षांचाविता । मोक्षरुपसाक्षात्भव ॥५॥
भवदेवाचेसार । भवशास्त्राचाविचार । भवस्मृतीचानिर्धार । भवतत्वपुराणाचे ॥६॥
भवक्रियेचापती । भवहाचिअहंकृती । भव इंद्रियांतर्ज्योती । भवदेवसर्वभोक्ता ॥७॥
भवहाचतुरानन । शिवनामेंनारायण । हरनामेंरुद्र आपण । सांबनामेंहाशक्ति ॥८॥
भर्गनामेंहाचिसविता । गणेशहाविश्वेशम्हणता । भीमनामेंभयदाता । भयहर्ताशंकर ॥९॥
शिवासरिसेंदैवत । नाहींनाहींजगांत । आशुतोष उमानाथ । भोळाभंडारीदेवहा ॥१०॥
नाहींपूजेचीचाड । नकोसत्राकाबाड । भक्तांचेपुरवीलाड । जळेंकेवळबिल्वदळें ॥११॥
शिव ऐसेंयेतांवाचे । पापनासेंसमूळसाचें । हरम्हणतांजन्ममृत्यूचे । हरितोभयसहजची ॥१२॥
शिवाऐसाशीतळ । शिवाऐसानिर्मळ । शिवाऐसादयाळ । शिवचिएकसाजिरा ॥१३॥
उपमंन्यूसाक्ष आहे । शिवदयेचीप्रत्यक्षहे । मार्कंडेयदुजाआहे । दयाळदेवसांगाया ॥१४॥
इंद्राठाउकनिर्मळ । किंवाजाणेंशिळादबाळ । विषप्राशनींशीतळ । देवासुरजाणती ॥१५॥
शिवविष्णुगणपती । सूर्य आणिमहाशक्ति । पांचदेवएकमूर्ति । शिवशब्दबोधकहा ॥१६॥
शिवहेचिजगत्सूत्र । शिवहाचिजगन्मित्र । शिवावांचूनिअन्यत्र । नाहींकांहींवेदम्हणे ॥१७॥
शिवभवभर्गहर । सांबरुद्रशंकर । भीमशर्वविश्वेश्वर । उमावल्लभवाचेस्टा ॥१८॥
सहजसाधेलकाज । नासेलस्वयेंअकाज । ऐसीनसेदुजीमौज । विसरुंनकागड्यानो ॥१९॥
कलीवर्ततसेघोर । शिवस्मरावारंवार । सोडूनकासदाचार । पारपडायुक्तीनें ॥२०॥
धर्माचरणहीयुक्ती । भागवतपहाहेंभक्ती । विषयांकराविरक्ती । तारणमार्गहाच असे ॥२१॥
नारदम्हणेहोभगवंता । हेभूतभव्यभविष्यनाथा । वदलासीदेवीगाथा । चित्रचरित्र ऐकिले ॥२२॥
भक्तांचेकरायारक्षण । जीच्याअवताराचेंकारण । दयासागरातीपरीपूर्ण । सच्चिदानंदविग्रहा ॥२३॥
ऐसीजीपरंज्योती । जेणेंहोयतिचिप्रीति । तोधर्मसांगमजप्रती । धर्ममूर्तेनारायणा ॥२४॥
श्रीनारायणबोलिले । नारदासर्वत्वांजाणिलें । परीउगानेणीवधरिले । लोकहितार्थविचारिसी ॥२५॥
तरीऐकसादर । जेणेंअंबादेईवर । मुमुक्षुविप्रेंनिर्धार । केवींवर्तावेंसांगतो ॥२६॥
उदयापासूनजोंवरीअस्त । अस्तापास्रून उदयपर्यंत । काळजाईलसुकृत । नित्यनैमित्तिकतेविऐक ॥२७॥
धर्मावांचूनमातापिता । बंधुभगिनीमित्रकांता । साह्यनहोतीतत्वता । कन्यासुतपरलोकी ॥२८॥
स्वयेंजेंकेलेंधर्माचरण । तेंचउपयुक्तहोयजाण । याकरितांकरुनयत्न । धर्मसाधावासर्वदा ॥२९॥
धर्मेंचनासेव्याधी । धर्मेंचसर्वसिद्धी । धर्मेंतुटेउपाधी । धर्मेंसुखस्वर्गमोक्ष ॥३०॥
पहिलाधर्म आचार । श्रुतिस्मृतिआज्ञानुसार । अन्न आयुधनागार । सुतादिकतेणेंलाभे ॥३१॥
आचारेंवाढेंज्ञान । आचारेंचिथोरपण । सदाचारांपरीसाधन । अन्यनसेनारदा ॥३२॥
जोवर्ते आचारहीन । तोनव्हेब्राम्हण । शुद्रापरीनिरसन । त्याचेकरावेंविप्रांनी ॥३३॥
तोद्विविध आचार । शास्त्रीय आणिलोकाचार । दोनीकरावेसादर । नोल्लंघावेंकदापि ॥३४॥
जातिधर्मकुलधर्म । देशधर्मग्रामधर्म । टाकितांहोय अधर्म । अवश्यतेंआचारावें ॥३५॥
केवळजेंअर्थकाम । पडलेंतयाआचारनाम । नाचरावेंऐसेंकर्म । धर्मयुक्तनसोडावें ॥३६॥
धर्मम्हणवेंलोकींजरी । परीद्वेषदुःखकामकारी । त्यजावातोनिर्धारी । धर्मतयानम्हणावें ॥३७॥
श्रुतीस्मृतिधर्मनयन । ह्रदयवर्णिलेंपुराण । चौथेंधर्माचेंस्थान । नाहींकोठेंनारदा ॥३८॥
श्रुत्युक्तजेंधर्मद्वैत । दोनितेधर्मनिश्चित । आचारावेंयेथेंप्सित । उभयत्रदोषनसे ॥३९॥
जेथेंहोयस्मृतिद्वैत । तेथेंघ्यावेंवेदमत । अथवाघ्यावेंबहुमत । वेदबाह्यनसावें ॥४०॥
पुराणाचेंहोतांद्वैत । स्मृतितेथेंबळवंत । पुराणस्मृतिआणिश्रौत । एकहोतांउत्तमतो ॥४१॥
वेदासीजेंसंमत । तेंचिजाणकर्मविहित । इतरसर्वगर्हित । मुख्यत्वेंजाणनारदा ॥४२॥
वेदमार्गसोडून । अन्यथाकरितींआचरण । तयांसाठींनिर्माण । कुंडेंकेलीईश्वरें ॥४३॥
वरीपायडोकेखालीं । करुनीदूततयांबळीं । नरकांमाजीबुचकळी । दंडींप्रहारतयांच्या ॥४४॥
पाशुपत आणिकामाचार । तप्तमुद्रांकितलिंगधर । नर्कगामीसर्वनिर्धार । वेदबाह्यागतीकैची ॥४५॥
वेदोक्तसदांआचरावें । सदांजागृत असावें । पापकदांनाचरावें । विचारावेंमनासीं ॥४६॥
एकयामराहतांरंजनी । जागेंव्हावेंब्राम्हणानीं । बैसोनियाकमलासनीं । ब्रम्हध्यानकरावें ॥४७॥
प्राणायामेंकरुन । षडदलाचेंकीजेंध्यान । ब्रम्हरंध्रींबैसोन । एकाग्रव्हावेंयोगबलें ॥४८॥
मीचदेवीमहादेव । ऐसाशुद्धकीजेभाव । घ्यावातेथेंब्रम्हानुभव । विप्रेंतेथेंबुद्धियोगें ॥४९॥
सूर्योदयापासून । घटिजातांपंचावन । उषःकालतोचिजाण । अरुणोदयसप्तपंच ॥५०॥
पूर्णघटिकासत्तावन । सूर्योदयजाणतेथून । एवंकालीउठुन । ध्यानकीजेंगुरुचे ॥५१॥
करुनियाशौचादिक । स्मृतिविहितसम्यक । आचमनकरुनदेख । स्नानकीजेंविधीनें ॥५२॥
वस्त्रकरुनिपरिधान । बसावेंआसनीयेऊन । पुन्हाकरुन आचमन । भस्मधारणकरावें ॥५३॥
रुद्राक्षमाळाघालून । करावेंसंध्यावंदन । सहस्त्रगायत्रीजपून । उपस्थानसूर्योदईं ॥५४॥
मगकीजेंऔपासन । एवंनित्य आटपून । करावामगब्रम्हयज्ञ । नैमित्तिककरावें ॥५५॥
जरीकेलेंवेदाध्यन । वागेसदाआचारहीन । मरणसमईंतयाटाकून । जातीवेदपक्ष्यापरी ॥५६॥
नटाकितांआचार । देवीतुष्टेतयावर । भोगमोक्ष इहपर । सर्वदेततयाशी ॥५७॥
एक्याणवश्लोकसार । वर्णनकेलाआचार । एवंवागतांनिरंतर । कलीतयानबाधे ॥५८॥
श्रीदेवीविजयेएकादशस्कंदे । आचारप्रशंसावर्णनन्नामप्रथमोध्यायः ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP