करवीर माहात्म्य - खंड ४
करवीरे माहात्म्य पोथीचे पठन केल्याने साक्षात महालक्ष्मीची कृपा होते.
पराशर मुनींनीं केलेली करवीरयात्रा.
अगस्ती मुनीनें सांगितलेलें करवीरमाहात्म्य ऐकून लोपामुद्रेस फार आनंद झाला व अगस्तीस तिनें प्रश्न केला कीं, पराशर मुनीनें करवीरांत राहून तप केलें याचें कारण काय तें मला कथन करा. हें ऐकून अगस्ती ह्मणाले, लोपामुद्रे ! नैमिषारण्यांत पराशर मुनी तप करित असताम त्याम्नीं ऐकिलें कीं, श्रीविष्णूंनी काशीक्षेत्र व करवीरक्षेत्र यांची तुलना केली त्यांत करवीर थोर ठरलें. त्यांच्या मनांत एकदां असा विचार आला कीं, कलियुग सुरु होणार आहे, त्यांत जनास बल व आयुष्य कमी असून ते मंद बुद्धि होतील. वेदाच्या शाखा हजारों आहेत त्यांचा अर्थ लोकांस समजणार नाहीं, तर स्मृति, पुराणें, इतिहास वगैरे करण्यास कोण समर्थ होईल ? हें करण्यास श्रीविष्णूच समर्थ आहेत ! हीं सर्व कार्यें करणारा पुत्र मला प्राप्त व्हावा असा वर मी विष्णूपाशीं मागतों व तो कृपाघन ही माझी इच्छा निश्चयानें पूर्ण करील. तपाशिवाय नारायण वश होणार नाहीं व तप करण्यास करवीरापेक्षां भुक्तिमुक्तिदायक असें अन्य क्षेत्र नाहीं, असें जाणून पराशर मुनी आपल्या पत्नीसह नैमिषारण्यांतून निघून करवीरास आले.
अगस्ती मुनी ह्मणाले, लोपामुद्रे ! त्या करवीरक्षेत्रांत रत्नें व स्फटिकांनीं बांधलेलीं उत्तम देवालयें असून सर्व देव, तीर्थे व रमणीय उपवनें तेथें होतीं. त्या ठिकाणीं असलेल्या पाचेच्या जमिनी व पोंवळ्याच्या पायर्या त्या क्षेत्रास फार शोभा आणत असत. क्षेत्राच्या चारी दिशेस दोन दोन नद्या वहातात. त्यांचीं नांवें सांगतों ती ऐक. उत्तरेस कृष्णा, व वारणा, पूर्वेस कृष्णा व गणिका, दक्षिणेस वेदा, व यक्षा आणि पश्चिमेस शिवा व मयूरी.
चार महाद्वारावर चार लिंगें आहेत तीं :-
पूर्वद्वारीं डोंगरावर रामेश्वर; दक्षिणद्वारीं चक्रेश्वर; पश्चिमेस कलहेश शंकर; **** श्रीगुप्तमल्लिकार्जुनहर.
चार द्वारांच्या दरम्यान देवता आहेत त्या :-
पूर्वेस उज्वलांबा; दक्षिणेस कात्यायनी; पश्चिमेस सिद्धबटुकेश्वर; उत्तरेस केदार.
क्षेत्राच्या आठ दिशेस अष्ट लिंगें आहेत तीं :-
पूर्वेस कृष्णातीरीं अमरेश; अग्नयेस कोपेश; दक्षिणेस वीरभद्र; नैऋत्येस सिद्ध **** ; पश्चिमेस भोगेश; वायव्येस वटेश; उत्तरेस रामेश्वर; ईशान्येस संगमेश्वर.
स्तोत्र
नमाम्यहं देवि परां पवित्रां जगत्कृतिस्थाननिरोधसंभवाम् ॥
भुक्तिप्रदामज्ञकुलस्य सर्वदा मुक्तिप्रदां प्राज्ञकुलस्य सर्वतः ॥१॥
तव प्रभावं सुनिरुपितुं शुभे पराक्रमं वा न हि देववृंदं ॥
अलं प्रसीदेश्वरि सर्वदेहिनां कामप्रदा त्वं भव सर्वकामिनां ॥२॥
नूनं स्थिता त्वं करवीरके पुरे मुक्तिं प्रदातुं खलु सर्वदेहिनां ॥
तथाप याचे भवंतीं सुरार्तिहां मनोरथं सुंदरि पूरयाशु मे ॥३॥
या वैरिणां वितनुते भवती विमुक्तिं सा किं ददाति न हि सज्जनभक्त ॥
सर्वात्मना तव पदाब्जकथासु तृप्ते भृंगे भवच्चरणपंकजवासदक्षे ॥४॥
धन्योऽस्मि कृतकृत्योऽस्मि तव पादाब्जदर्शनात् ॥
संसारभयभीतोऽस्मि पाहि मां सर्वशर्मदे ॥५॥
सुदिनं चाद्य संजातमाप्तं जन्म फलं मया ॥
मातस्त्वद्दर्शनादेव जातः सर्वमनोरथः ॥६॥
न याचे वरमन्यं हि पूर्णचंद्रनिभानने ॥
त्वत्क्षेत्रवसतिं देहि सर्वकामप्रपूरिणीं ॥७॥
(क.म. ८-८)
A
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP