गोरक्ष प्रवाह - भाग १२

मनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.


३६ चर्पटी नाथ

॥ सत्यश्रवा नामें कोणी ऋषी राही । रानी देखे बाळू । दर्भामाजी ॥३५॥
॥ शंका मनी येई । भीति त्यासी घेरी । नारदांची स्वारी येई तेथें ॥३६॥
॥ पुष्पे वर्षताती । बाळावरी देवू । नारदांचें हाती । नेई बाळु ॥३७॥
॥पत्नीनें तयासी । वाढवीले सोई । विद्याभ्यासे त्यातें । ज्ञानी केलें ॥३८॥
॥ चर्पटी हा नाथू । कथीयेलें नाम । नारदे तयासी । यात्री नेलें ॥३९॥
॥ उपदेशा लाभे । ब्रम्हवाक्य त्यातें । जीव ब्रम्ह जाणा । योगी राजा ॥४०॥
॥ चरपटी यात्रा । संगे विष्णु शिव । दत्त निरंजनु । सर्व - स्थलीं ॥४१॥
॥ व्यवहारी दक्ष । यजमानू-कृत्यी । दक्षिणेच्या पायी । कोपे त्याते ॥४२॥
॥ केदारासी भेटी । मच्छिंद्रू दत्तांसी । अनुग्रही स्वयें अनेकांसी ॥४४॥
॥ देवांसंगे युध्द । खेळे योगीराजा । इंद्रा शिवां सर्वा । पराभवीं ॥४५॥

३७ सोम - याग

॥ इंद्रातें सांगे । बृहस्पती स्वयें । नाथां सर्वां आणी । स्वर्गामाजी ॥४६॥
॥ सोम-याग करी । अग्रपूजा देई । मच्छिंद्रू नाथांसी । तोषवी तूं ॥४७॥
॥ नाध सारे येती । इंद्रातें कथीती । करूं यज्ञ प्रेमें । लंके माजी ॥४८॥
॥ यज्ञ चालू होतां । मीनु नाथा विद्या । मच्छिंदरु देतां इंद्रो घेई ॥४९॥
॥ मोर रूपें क्षी । इन्दू विद्या । क्षमा याची नाथा । विद्या - पायी ॥५०॥
॥ सोम याजी सारे । आपुलाल्या स्थली । पांगुनीया जाती । शुभो होतां ॥५१॥

३८ सारांश
॥ नारायणू सारे । नरु रूपें आले । करणीनें नरू । नारायणू ॥५२॥
॥ नमेउनच्या तीरी । मच्छिंदत जन्मू । भद्रागिरी वरी । समाधीत ॥५३॥
॥ जालधरू तेथें । जान पीरू होई । गहिनीहि तेथें । गैबी पीरू ॥५४॥
॥ गोरक्षुहि तेथें । रेवणु विटयासी । इतर रहाती । गुप्त वेषें ॥५५॥
॥ वायु आकर्षणु । तोची प्राणायामु । विजयाचा मार्गू । देवांवरी ॥५६॥
॥ देहो कर्दमाचा । गोळा चिखलाचा । सुवर्णू तयाचे । तपस्येनें ॥५७॥
॥ देहाची कसोटी । मनाची पारखू । हीच ती किमया । मालू-साक्ष ॥५८॥

३९ भूमिका

॥ द्दढा भक्ति, आत्मशक्ति, मंत्री स्थिति, गुरु प्रसादू, ॥
॥ ईश - कृपा, पंच महती, कार्यकर्ता विजयो यांनी ॥५९॥


४० फल - श्रुति

॥ गोरक्षु सर्व किमयागारु, ग्रंथी गोवियेले साचारू ॥
॥ हर्षतील सश्रद्ध नरू, नाथ लीला अद्‌भुत ॥४६०॥

॥ आतां कथीन फले सारी, सार रूपें इथें आली ॥
॥ शत्रूनाश, समंध-बाधा, शत्रुमोहन, भूत, बाधा-शत्रुच्चाटण, ॥
॥ अग्नि-पीडा, दारिद्रयोच्चाटण, कलह - पीडा, कपट, नाशन, ॥
॥ रोग - पीडा, हरती पठणे - “लीलामृते” ॥६१॥
॥ धन, विद्या, विजय, पुत्र, कारामुक्ति, ॥
॥ कलह - शांति, योगसाधन, मोक्षही ॥६२॥
ॐ नमो जी अवधूता । आद्य श्रीमच्छिंद्रनाथा ।
श्रीगुरुंचा प्रसाद होतां । सर्व कार्ये साधती ॥६३॥
नमुनि गोरक्षनाथासी । नित्य लक्षी उपासनेसी ।
आंस त्याची निश्चयेसी । पुरवी श्रीगुरु सर्वदा ॥६४॥
ऐका दोन मंत्रांची महती । अक्षरें अठरा एका असती ।
पहिला जो ‘दिगंबरा’ इत्यादि । दुसरा ‘द्रां’ दत्तायेय नम: ॥६५॥
अठरा अक्षरी मंत्राचा जप बावीस सहस्त्रांचा ।
तर्पण नेम दशांशाचा । द्विशतवीस हवनार्थ ॥६६॥
दुसरा वज्रकवचांतील । अष्टोत्तरशत जो जपील ।
मंत्र कवचाविना निष्फळ । नित्य कवचाचा पाठ करा ॥६७॥
जो भक्त प्रतिदिवशी । वाची या लीलामृतासी ।
धाऊनि त्याच्या कार्यासी । अष्टसिद्धी पळताती ॥६८॥
नित्यनेम ज्याचा आहे । किमयागिरी काव्यप्रवाहे ।
नवनाथ लीलामृत हे । सर्वसिद्धी ओपीतसे ॥६९॥
जो कोणी भक्तश्रेष्ठ । लीलामृती एकनिष्ठ ।
नाथ त्याचे सर्व कष्ट । हरण करिती तात्काळ ॥७०॥
धरुनिं कांहीं कामनेसी । वाचील काव्यप्रवाहासी ।
वर्षपर्यन्त त्या भक्तासी । नाथ आशीर्वाद लाभेल ॥७१॥
गुरुवारा शुभ पाहुनी । आरंभ करावा यामिनी ।
शद्ब कांहीं पडतां कानी । निर्भय चित्ती वाचावें ॥७२॥
पाठाची जवं सिद्धी होई । ध्वनि ‘अलक्ष’ कानी येई ।
शुभाशुभ सांगती स्वप्नी । नाथ वचन ऐकावें ॥७३॥
कार्यासाठीं निघे साधक । नाथां पुष्प वाहूनि एक ।
आमंत्रुनी जाईल देख । कार्य सफल होतसे ॥७४॥
जरी कांही चेटुक करणी । करील कुणी अद्दश्यपणी ।
नाथकृपेनें त्याचीच झणी । पीडा परस्पर टळतसें ॥७५॥
कार्य कैसेही असो महान । दैवतां घाला नाथांची आण ।
आपुली वचनें आठवून । तात्काळ कार्यार्थ जातील ॥७६॥
कानीफ नाथ गोपीचंदनार्थ । तैसी दैवतें भक्तहितार्थ ।
कार्य साधावया समर्थ । वचनी नाथें गुंतविली ॥७७॥
या ग्रंथाचे पठण सर्वदा । करील त्याच्या सर्व आपदा ।
जाऊनि, त्या मिळती संपदा । अनुभवें सत्य कळेल ॥७८॥

स मा प्त

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP