-
स्त्री. १ पध्दत ; चाल ; रीत ; तर्हा ; आचरण . रोजगार लागल्यापासून अलीकडेस त्याची चर्या पालटली . २ मुद्रा ; चेहरा ; रूप ; तोंडवळा ; तोंडाची घडण ; ( रोगी किंवा निरोगी ) चेहेर्यावर किंवा मुद्रेवर जी कळा , छटा , चिन्ह , तेज असतें ती . दुखण्यानें त्याचे तोंडाची चर्या फिरली . हा ब्राह्मण आहे असें म्हणतां परंतु यावर ब्राह्मणाची चर्या दिसत नाहीं . ३ विहित कर्मांचें , रूढीचें सतत आचरण , पाळणूक . व्रताची हे चर्या त्वरित फळ देईल सबळा । ४ रचना ; बांधणी . उभारिली दुर्गे दारवंटे फांजी । कोटी चर्या माजीं शोभलिया । - तुगा १०० . ५ संचार ; गमन . ६ लीला ; पराक्रम . हें असो दासाची अगाध चर्या । - दावि ४६७ . ७ युक्ति ; मसलत . अवघ्या मानली हे चर्या । म्हणती प्रगट बोलूं नका । - पांप्र ८ . ९७ . ८ वहिवाट ; व्यवहार . चर्या हे नुमजे त्या मतिमंदा । - दावि ४६७ [ सं . ]
-
०पालटणें बदलणें - चेहेर्यावर टवटवी येणें , तजेला दिसूं लागणें ( आजारपणानंतर ). चेहेर्यावरील विकार बदलणें ; काळवंडणे ( अपराधाच्या भयाच्या जाणिवेमुळें ).
-
ना. आचरण , ( नित्याचे ) चाल , चालचालणूक , तर्हा , पद्धत , रीत , रूढी ;
-
ना. चेहरा , तोंडवळा , मुद्रा , रूप ;
Site Search
Input language: