अनुज्ञा अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
दोषयुक्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या वस्तूविषयीं, तिच्यांत दिसणार्या एखाद्या ठ्सठशीत गुणाच्या लोभामुळें केलेली जी प्रार्थना तिला अनुज्ञा अलंकार म्हणावें.
उदा० :---
“हे विधात्या ! तुझ्या पाया पडून आणि तुझ्या पुढें हात जोडून, खरोखरी एकच गोष्टीची मी भीक मागतों, ती ही कीं, श्रीकृष्णाच्या चरणरूपी कमळांचें सेवन करणार्या शेतकर्यांच्या सुद्धां कुळांत माझा जन्म होवो.”
ह्या ठिकाणीं श्रीहरीच्या भक्तीच्या लोभानें, शेतकर्यांच्या सुद्ध कुळांत जन्म व्हावा, अशी पार्थना केली आहे (म्हणून येथें अनुज्ञा अलंकार.)
येथें रसगंगाधरांतील अनुज्ञा प्रकरण संपलें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP