सात वारांचीं पदें - बुधवार
श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.
ते जाणावे निजसंत । वृत्ती ज्यांची निवांत ॥
अखंड स्वरूपीं एकांत । नेणती द्वैताची मात ॥१॥
भाग्य ज्यांचे वैराग्य । शांती शोभे सर्वांग ॥
अंतर बाहेर नि:संग । जिंकियले षडवर्ग ॥२॥
संग ज्यांचा सुखकारी । दर्शनमात्रें अघहारी ॥
अगाध वर्णितां थोरी । सरी न पवेचि दुसरी ॥३॥
ज्यांचे वंदितां पाय । भवभय निरसुनी जाय ॥
अवघा आनंद होय । दावित निजपद सोय ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP