बुधवार विठ्ठलाची आरती - जयदेव जयदेव जयरुक्मिणिकां...

आरती म्हणजे हिंदू उपासनेचा एक विधी.


जयदेव जयदेव जयरुक्मिणिकांता । करुनानिधिपदकमला आरति भगवंता ॥धृ०॥
पदि गंगा पीतांबर कटिकर वरदाता । हृदि कौस्तुभ कमलाक्षा दीनजनोद्धर्ता ।
भर्ता जो जगताचा कलिमलभयहर्ता । वंदूं पदकमला जो स्वधामसुखदाता ॥१॥
राधारुक्मिणिरमणा देवा घननीळा । रत्नमुकुट शिरिं शोभे कंठीं वनमाला ।  
प्रियपुंडलीकवरदा धीशा जनपाला । दर्शनमात्रें सुखदा देवा तारि मला ॥२॥
आषाढी कार्तिकी उत्सव जे करिती । त्याते भुक्ती मुक्ति देशी संपत्ति ।
ऐशा तुज देवेशा करितों मी विनति । ठेवीं तव पदिं दासा मज नान्या सुगति ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP