कृष्णावेणीपंचगंगासंगमीं । येउनि सुरमुनि वंदिति श्रीदत्तस्वामी । तो करुणासिंधु हृदयीं सांठविला नामी ॥
तद्रूपची होउनिया विचरतासा स्वामी । जयदेव जयदेव पुरुषोत्तममूर्ते ।
जय आनंदमयमूर्ते वासूदेवानंदसरस्वति गुरुकीर्ते । जयदेव जयदेव ॥१॥धृ०॥
सद्विद्या संपादुनि उपनिशदीं रमला । तीर्थें हिंडुनि सर्वा गुरुपदिं रंजविला ।
गुरुचरितादिग्रंथामृत हे पाजविला । यच्छ्रवणें पठणें हरि हरिभवविधि झाला ॥२॥
श्रीमद्दगुरुयश दशदिशिं गाजविलें । जगदेश्वर दत्तगुरु हृदि ज्यांच्या डोले ।
सुरमुनि गंगाकृष्णा रेवास्तुति बोले । तो हा सद्गुरु यत्पदिं मम मानस रमलें ॥३॥
प्रथमानंदवत्सरि देहीसा झाला । अन्यानंदवत्सरि विदेहि हा भरला ।
मध्यें सर्वानंदमयकायचि गमला । तो आनंदमयचि गुरु गुरु मधृदिं गमला ॥४॥
आठराशें छत्तिस शकिं ज्येष्ठीं कुहु तिथीला । अनंद संवत्सरिं स्वानंदीं भरला ।
मंगलदिनिं सवितास्ता ऊर्ध्व दिशा घटिला । ब्रह्मचि होउनि ब्रह्मी गुरुपदिं हा बसला ॥५॥
सद्विद्या देउनिया सन्मार्गीं लावी । द्या तव पदभक्ति जी भवसिंधू नुरवी ।
अघौघहारक नामस्मरण मनीं वसवी । त्वत्पदकमलरसास्पद नृसिंहह्रुत्करवी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP