भूपाळी दत्ताची - उठि उठि दत्तात्रया, करुणा...

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


उठि उठि दत्तात्रया, करुणासिंधु कृपालया ।
उठवी माता अनसूया, प्रेमें टाळ्या पिटूनिया ॥धृ॥
सप्तपंचम अरुणोदय । जाला स्नानाचा समय ।
भानुप्रकाश होऊं पाहे । रविरश्मि दाटल्या ॥१॥
उठले साधकांचे वृंद । करिति तवनामाचा छंद ।
हृदयीं ध्याती ब्रह्मानंद । प्रेमभावें करूनी ॥२॥
व्यास वाल्मीक नारदमुनि । आदि करोनि सर्व मुनी ।
उभे राहिले आंगणीं । दर्शनासी पातले ॥३॥
गंगायमुना सरस्वती । तुंगभद्रा भागीरथी ।
मनिकर्णिका भीमरथी । स्नान घालूं पातल्या ॥४॥
इंद्रचंद्रादि सुरगण । आले दर्शनालागून ।
करिती स्तोत्र अनुवादन । कीर्ति तुझिया नामाची ॥५॥
ऐकुनि मातेची करुणा । उठला साधकांचा राणा ।
निरंजनाचीये मना । प्रेमानंद दाटला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP