मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|निरंजन स्वामीकृत भूपाळ्या| उठि उठि कृष्णाबाई । स्वरू... निरंजन स्वामीकृत भूपाळ्या उठि उठि दत्तात्रया, करुणा... उठि उठि दिगंबरा । स्वामि ... उठाउठारे लौकरि । सत्वर या... उठि उठि कृष्णाबाई । स्वरू... उठि उठि वो बलभीमा स्वामिस... उठोनिया प्रात: काळीं । वद... उठि उठि नरहरिराया प्रगटे ... भूपाळी - उठि उठि कृष्णाबाई । स्वरू... वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथभूपाळीमराठी भूपाळी Translation - भाषांतर उठि उठि कृष्णाबाई । स्वरूपसुंदर कान्हाई । काशीं पान्हा भरोनि तुजला हुंबरती गाई ॥धृ॥रथारूढ रविभास्कर उदया आला तमारी । सरली चारी प्रहर रात्र गेली आंधारी ॥ उठोनिया गोकुळिचे जन अनुसरले संसारीं । गोपवृंद दधिमंथन करिती उठली घुमारी ॥१॥ रावे अविसाळिं या वृक्षाअरुते किलबिलती । मधुवनाचे ठायीं कोकिळ सुस्वरें गाती ॥कमळदळाच्या भोवते भोवते मधुकर रुंजती । मयूर पिच्छें उचलुनि टाहो उच्चस्वरें करिती ॥२॥चिमणालीं वासुरे पुच्छ उचलोनी धावती । त्याची माई त्याला तुजवीण न पेऊं देती ॥उंची माना करुनि गाई भोवताल्या पहाती । हंबरडे फोडुनि सखया तुजला बाहाती ॥३॥ चिमणाल्या घोंगड्या चिमण्या वेताट पहाती । चिमणाले गोपाळ आले तुझे सांगाती ॥वडजे आणि वाकडे नाचत नाचत येती । बोबडिया शब्दानें सखया तुजला बाहाती ॥४॥द्वारिं येउनि उभी राधा सुंदर वेल्हाळी । ऐकुनिया शब्दासि जागा जाला वनमाळी ॥नंदयशोदा प्रेमें हसोनि पीटीली टाळी । निरंजन आरती घेउनि भावें ओवाळी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP