मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८२ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ८२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४८ अध्याय ८२ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर अपि स्मरथ नः सख्यः स्वानामर्थचिकीर्षया । गतांश्चिरायिताञ्शत्रुपक्षक्षपणचेतसः ॥४१॥स्वमुखें सख्या वो त्यां यदुपति । म्हणे स्मरतां कीं आम्हांप्रति । बहुदिवसांची वियोगप्राप्ति । जाली विस्मृति कीं काय ॥२८५॥सख्या वो स्मरतां कीं आमुतें । आम्ही गुन्तलों स्वजनस्वार्थें । स्वजनां प्रिय तें करावयार्थें । आसक्त चित्तें चिरकाळ ॥८६॥म्हणाल चिरकाळ कां गुन्तलां । तरी शत्रुपक्षाचा क्षय इच्छिला । तत्साधनीं हव्यास चढला । यास्तव क्रमला बहुसमय ॥८७॥ऐसिया आम्हांतें जाणोनी । झणें शंका कराल मनीं । तेचि स्वमुखें चक्रपाणि । वर्णीं कर्णीं तें ऐका ॥८८॥अप्यवध्या यथास्मान्स्विदकृतज्ञाविशङ्कया । नूनं भूतानि भगवान्युनक्ति वियुनक्ति च ॥४२॥हरि म्हणे सख्या वो ऐका । आम्हांप्रति झणें या कळंका । लावूनि हृदयीं मानाल शंका । अकृतज्ञपंका लेपूनी ॥८९॥म्हणाल आमुचे कृतोपकार । सर्व विसरूनियां गिरिधर । आमुचा त्याग करूनि दूर । होऊनि इतर वशिन्नला ॥२९०॥कांहीं एक शंका ऐसी । स्पर्शिली म्हणों तुम्हां मानसीं । तरी आम्हांपासूनि गोष्टी तैसी । दिसोन आली यथार्थ ॥९१॥इये शंकेचा परिहार । ऐका साध्वी हो साचार । दैवाधीन प्राणीमात्र । भगवत्तंत्र वर्ततसे ॥९२॥दैवास्तव श्रीभगवान । करितो एक संयोजन । तैसेंचि एका वियोगें करून । करितो भिन्न दूरतर ॥९३॥तस्मात संयोगवियोग । भगवत्सत्तेचा प्रसंग । दैवाधीन अवघें जग । पावे निलाग धडविघडी ॥९४॥हेंचि उमजे तुम्हांप्रति । तैसी ऐका दृष्टान्तरीति । म्हणे गोपींतें श्रीपति । तें नृपाप्रति शुक सांगे ॥२९५॥वायुर्यथा घनानीकं तृणं तूलं रजांसि च । संयोज्याक्षिपते भूयस्तथा भूतानि भूतकृत् ॥४३॥दैववायु जैसा स्वबळें । वेगळीं करी घनमंडळें । सजळ उचललीं जलदबळें । करी वेगळे तद्बिन्दु ॥९६॥किंवा एके स्थळींचीं तृणें । अनेक स्थळीं त्यां कारणें । गगनीं भवंडूनि टाकी प्लवनें । तेंवि रजःकण भूतळींचे ॥९७॥एके स्थळींचे पांसु उडती । अनेक स्थळीं जाऊनि पडती । दैववायूची हे ख्याती । घडूनि विघडती तद्योगें ॥९८॥तैसा भूतांतें भूतकर्ता । दैवसूत्रें नाचविता । तस्मात दोष भूतां माथां । कोण्या अर्थे स्थापावा ॥९९॥एवं दोष आम्हांवरी । तुम्हीं न ठेविजे निर्धारीं । दैवसूत्र ईश्वरा करीं । चेष्टवी त्या परी जन चेष्टे ॥३००॥असो परिहार हा परता । परंतु तुमची सभाग्यता । जे मद्वियोगें विरह करितां । फावला पुरता मत्प्रेमा ॥१॥मयि भक्तिर्हि भूतानाममृतत्वाय कल्पते । दिष्ट्या यदासीन्मत्स्नेहो भवतीनां मदापनः ॥४४॥निश्चयेंसीं माझी भक्ति । कैवल्यदायिनी भूतांप्रति । त्याहूनि तुम्हांसि विशेष प्राप्ति । जाली निश्चिती मद्विरहें ॥२॥दिष्ट्या म्हणिजे परम कल्याण । संपादलें तुम्हांलागून । जे मद्वियोगविरहें पूर्ण । जालां मन्मन नित्यवें ॥३॥वियोगविरहें मन्मन जालां । तैं मत्प्राप्तीच्या भुवनां आलां । म्हणाल स्नेहें पाविजे तुजला । तो तूं कळला पाहिजेसी ॥४॥तुझी प्राप्ति कोणती कैसी । आम्हीं पूर्वीं रासविलासीं । भोगिल्या नंतर वियोगासी । देऊनि गेलासि चिरकाळ ॥३०५॥तैं काय प्राप्ति जाली नव्हती । पुढें होणार ते कोणती । सगुण निर्गुण कैसे रीती । ऐसें चित्तीं भावाल ॥६॥तरी जें वास्तव स्वरूप माझें । सावध परिसा कथितों ओजें । जेथूनि द्विभुजें चतुर्भुजें । स्वभक्तकाजें धरी रूपें ॥७॥मायावलंबें अवगणी । सुरभूसुरभूपाळगणीं । धरिली जे हे सगुणपणीं । कैवल्यदानी ते भजकां ॥८॥परंतु माझें वास्तव स्वरूप । ऐका सख्या हो कथितों अल्प । तुम्ही जाणोनि तो संक्षेप । सांडा विकल्प अंतरींचा ॥९॥अहं हि सर्वभूतानामादिरंतोऽन्तरं बहिः । भौतिकानां यथा खं वार्भूर्वायुर्ज्योतिरंगनाः ॥४५॥दृष्टान्तद्वारा बोधीन जैसें । वास्तव स्वरूप जाणोनि तैसें । स्वस्थ करावीं निजमानसें । हें जगदीशें बोलूनी ॥३१०॥म्हणे ऐका वो साजणी । सर्व भूतें मजपासूनी । या लागीं आदि मी त्यां लागूनी । अंतःकरणीं हें समजा ॥११॥मजपासूनि भूतें जालीं । होऊनि परतीं कोठें गेलीं । मजमाजीच व्यवहारलीं । यास्तव बोली मध्य मी हे ॥१२॥मान पुरलिया पावती अंत । तैंही मजमाजी होती निवान्त । स्वप्नद्रष्टा जेंवि जागृत । स्वप्न समस्त एकाकी ॥१३॥आदिमध्यान्तबहिरंतरीं । सर्व भूतीं निर्विकारी । यदर्थीं गोपींतें म्हणे हरि । ऐका सुन्दरी दृष्टान्त ॥१४॥जडें भौतिकें शरावादिकें । त्यांमाजि पंचभूतें व्यापकें । साद्यंत सबाह्य जेंवि अचुकें । कदापि पृथकें नव्हती तीं ॥३१५॥पृथ्वी शरावा कारण जाली । नाहीं पृथ्वीपणा मुकली । पृथ्वीमाजि व्यवहारिली । अंतीं मिनली निजरूपा ॥१६॥तरंग जाला जळा पोटीं । तरी काय जळासी पडली तुटी । व्यवहारला जळा पोटीं । जळाचिये पोटीं सांठवला ॥१७॥तेंवि अंडजादि चारी खाणीं । माजि जितुक्या जीवश्रेणी । त्यांमाजि सबाह्य व्यापकपणीं । आदिनिदानीं मी तैसा ॥१८॥तयांमाजि तुम्हांसि प्राप्ति । विरहप्रेमें जाली सती । येथ शंका कराल चित्तीं । जे सर्वभूतीं सम कीं तूं ॥१९॥भोग्यस्थानीं सर्व भूतें । भोक्ता आत्मवें तूं तेथें । विशेष सर्वांहूनि आमुतें । प्राप्ति कोणती म्हणाल ॥३२०॥तरी ऐका वो तुम्हांप्रति । विशेष मत्प्राप्ति कोणती । स्वमुखें सांगे कमलापति । तें येथ श्रोतीं परिसावें ॥२१॥ N/A References : N/A Last Updated : June 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP