अध्याय ८९ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
ब्राह्मण उवाच - संकर्षणो वासुदेवः प्रद्युम्नो धन्विनां वरः । अनिरुद्धोऽप्रतिरथो न त्रातु शन्कुवन्ति यत् ॥३१॥
ब्राह्मण म्हणे रे अविचक्षणा । बोलसी गोष्टी अप्रमाणा । पाहूनि आप्ली संभावना । चतुरें वचना बोलावें ॥८६॥
जें भास्वता तम अलोट । तेथ खद्योता कें हुटहुट । अमृतें जो गद नव्हे नष्ट । त्या ओषधि पालट काय करी ॥८७॥
तेंवि संकर्षण ईशावतार । श्रीकॄष्ण साक्षात् परमेश्वर । धनुर्धारांचा जो महेन्द्र । त्रिजगीं वीर प्रद्युम्न ॥८८॥
अनिरुद्धहि अप्रतिरथ । ज्या सम कैसा सुभट समर्थ । ऋक्षीं अप्रतिम निशानाथ । शौर्यें तद्वत आगळा ॥८९॥
हे जे न शक्ती रक्षण करूं । क्तेथ तूं कोठें सामान्य नरू । बोलसी तितुकें बालिशपर । तेंहि सादर अवधारीं ॥३९०॥
तत्कथं नु भवान्कर्म दुष्कर जगदीश्वरैः । चिकीर्षसि त्वं बालिश्यात्तन्न श्रद्दध्महे वयम् ॥३२॥
राम वासुदेव पद्युम्न । अनिरुद्ध ऐश्वर्यपूर्ण । सर्व जगाचें ईश्वर जाण । स्थितिभवनिधनकारक हे ॥९१॥
ययांचेनि जें दुष्कर परम । यांसिं जे घडे अत्यंत विषम । तें तूं करूं इच्छिसी कैसें कर्म । प्रायशा भ्रम तुज जाला ॥९२॥
बाळक जैसें बुद्धिरहित । चंद्रबिम्बा धरूं धांवत । तेंव मूर्खत्वें विचाररहित । बोलसी पुष्पवत् विहायसीं ॥९३॥
गरुडा न घडे अतिक्रमण । तेथ कुक्कुटा कवण मान । विश्वास तव वाक्यीं म्हणोन । सर्वथा जाण मज नये ॥९४॥
बोलतां अधिकारानुसार । विश्वासती तेथ चतुर । प्रतीतिगत हा वाग्व्यापार । नव्हे असार आम्हांसी ॥३९५॥
ईश्वरा दुष्कर जे कर्मसिद्धी । ते करूं म्हणसी बालिशबुद्धीं । तेथ न विश्वासूं आम्ही कधीं । मूर्खावादीं निश्चयेंसीं ॥९६॥
यापरी तेजोभंगकर । ब्राह्मणाचीं वाक्यें उखर । ऐकूनि बोले सुभद्रावर । तें परिसें क्षितिधरशिरोमणि ॥९७॥
अर्जुन उवाच - नाहं संकर्षणो ब्रह्मन्नकृष्णः कार्ष्णिरेव च । अहं वा अर्जुनो नाम अस्य वै गाण्डिवं धनुः ॥३३॥
म्हणे रे ब्राह्मणा नासाबोंडी । धरूनि बुटबुटावें तांतोडीं । तुज काय कळे सुभटप्रौढी । शोकें वेढी तव बुद्धि ॥९८॥
नेणोनि माझा पराक्रम । तूं वल्गना करिसी विषम । जाणसी घडतां परिणाम । पूर्ण काम जैं होसी ॥९९॥
मी नव्हें सहसा संकर्षण । जो पळाला मागधा भेण । किंवा नव्हे रुक्मिणीरमण । कालयवनभयभीरु ॥४००॥
कीं मी न होय तो प्रद्युम्न । शिवें जाळिला प्रक्षोभूत । कामुकीं ग्राम्यीं संचरून । युवति पुन करी कलुषी ॥१॥
ना मी निश्चयें अनिरुद्ध । जो बाणासुरें केला बद्ध । मी अर्जुननामा वीर प्रसिद्ध । ज्याचें धनुष्य विजयद गाग्डीव ॥२॥
मावमंस्था मम ब्रह्मन्वोर्यं त्र्यम्बकतोषणम् । मृत्युं विजित्य प्रवने आनेष्ये ते प्रजां प्रभो ॥३४॥
म्यां शंकरेंसीं करूनि समर । जिंकिलें त्यातें प्रतिज्ञापर । तेणें तोषला तो मजवर । कृपा अपार करूनियां ॥३॥
तें त्र्यंबकतोषणकर मम वीर्य । नको अवमानूं सांडोनि धैर्य । अवश्य करीन तुझें कार्य । जेणें आर्य मानवती ॥४॥
अंतक जिंकूनि रणाङ्गणीं । तव प्रजा आणीन सत्य मानीं । तुझे हृद्भूवरी सुखलावणी । करीन जनीं भो द्विजवरा ॥४०५॥
एवं विश्रंभितो विप्रः फाल्गुनेने परंतप । जगाम स्वगृहं प्रीथ पार्थवीर्यं निशामयन् ॥३५॥
राया परंतपा भगवन्निष्ठा । एवं फाल्गुनें ब्राह्मणाभीष्टा । प्रौढ बोलूनि स्वप्रतिष्ठा । ब्राह्मणीं निष्ठा प्रकटिली ॥६॥
यदुपुङ्गचां निराकरून । स्वपराक्रमा अभिवादून । विश्वासविला सुब्राह्मण । प्रजारक्षण आकाङ्क्षु ॥७॥
मग तो पार्थवीर उद्दाम । ऐकत होत्साता तपोधाम । पार्थें होऊनि प्रीतिकाम । गेला सत्तम निजसदना ॥८॥
यावरी पुढें उत्तरातनया । यथाकाळें ब्राह्मणजाया । पूर्ववत गुर्विणी जालिया । वर्तली चर्या ते ऐक ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP