अलंकारदर्श - अलंकारांचें वर्गीकरण.
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
१ काव्यास ज्याचे योगानें येत त्यास अलंकार असे ह्मणतात.
२ शब्द व अर्थ यांचे आश्रयानें अलंकार राहतात आणि यामुळें अलंकाराचे दोन भेद झाले आहेत.
१ शब्दालंकार.
२ अर्थालंकार.
३ शब्दालंकारांत जे अलंकार येतात त्यांची नांवे.
१ छेकानुप्रास.
२ वृत्यनुप्रास.
३ यमक.
४ पुनरुक्तवदा भास.
५ लाटानुप्रास.
६ चित्र.
४ अर्थालंकारांत जे अलंकार येतात त्यांचे चार भेद कल्पिले आहेत.
(अ) कित्येक अलंकारांत फक्त वस्तुज्ञान प्रतिपादिलें असतें. ते अलंकार येणेप्रमाणें.
१ समासोक्ति.
२ पर्यायोक्ति.
३ आक्षेप.
४ व्याजस्तुति.
५ उपमेयोपमा.
६ अनन्वय.
७ अतिशयोक्ति.
८ परिकर
९ अप्रस्तुतप्रशंसा.
१० अनुक्त.
११ निमित्त.
१२ विशेषोक्ति.
(ब) ज्या अलंकारांत उपमा दखविली असते; ते अलंकार येणेंप्रमाणें.
१ रुपक.
२ परिणाम.
३ संदेह.
४ भ्रांति.
५ उल्लेख.
६ अपन्हव.
७ उत्प्रेक्षा.
८ स्मृति.
९ तुल्ययोगिता.
१० दीपक.
११ प्रतिवस्तूपमा.
१२ दृष्टांत.
१३ सहोक्ति.
१४ व्यतिरेक.
१५ निदर्शना.
१६ श्लेष.
(क) ज्या अलंकारांत रसभाव दाखविले असतात, ते अलंकार येणें प्रमाणें.
१ रसवत्.
२ प्रेय.
३ ऊर्जस्वित्.
४ समाहित.
५ भावोदय.
६ भावसंधि.
७ भावशबलता.
(ड) ज्या अलंकारांत अस्पष्टोक्ति असते, ते अलंकार येणेंप्रमाणें.
१ उपमा.
२ विनोक्ति.
३ अर्थांतरन्यास.
४ विरोध.
५ विभावना.
६ उक्तगुण.
७ निमित्त.
८ विशेषोक्ति.
९ सम.
१० विषम.
११ चित्र.
१२ अधिक.
१३ अन्योन्य.
१४ कारणमाला.
१५ एकावली.
१६ व्याघात.
१७ मालादीपक.
१८ काव्यलिंग.
१९ अनुमान.
२० सार.
२१ यथासंख्य.
२२ अर्थापत्ति.
२३ पर्याय.
२४ परिवृत्ति.
२५ परिसंख्या.
२६ विकल्प.
२७ समुच्चय.
२८ समाधि.
२९ प्रत्यनीक.
३० प्रतीप.
३१ विशेष.
३२ मलिन.
३३ सामान्य.
३४ असंगति.
३५ तद्रुण.
३६ अतद्रुण.
३७ व्याजोक्ति.
३८ वक्रोक्ति.
३९ स्वभावोक्ति.
४० भाविक.
४१ उदात्त.
५ याशिवाय वरील अलंकारांचे निराळे रीतीनें वर्ग केले आहेत.
ते येणेप्रमाणें.
(अ) साधर्म्यावरुन.
भेदप्रधानसाधर्म्य.
१ दीपक.
२ तुल्ययोगिता.
३ दृष्टांत.
४ निदर्शना.
५ प्रतिवस्तूपमा.
६ सहोक्ति.
७ प्रतीप.
८ व्यतिरेक.
अभेदप्रधानसाधर्म्य.
१ रुपक.
२ परिणाम.
३ संदेह.
४ भ्रांतिमत्.
५ उल्लेख.
६ अपन्हव.
भेदाभेदप्रधानसाधर्म्य.
१ उपमा.
२ अनन्वय.
३ उपमेयोपमा.
४ स्मृति.
(ब) अध्यवसायावरुन.
१ उत्प्रेक्षा.
२ अतिशयोक्ति.
(क) विरोधावरुन.
१ विभावना.
२ विशेषोक्ति.
३ विषम.
४ चित्र.
५ असंगति.
६ अन्योन्य.
७ व्याघात.
८ अतद्गुण.
९ भाविक.
१० विशेष.
(ड) वाक्यन्यायावरुन.
१ यथासंख्य.
२ परिसंख्य.
३ अर्थापत्ति.
४ विकल्प.
५ समुच्चय.
(इ) लोकव्यवहारावरुन.
१ परिवृत्ति.
२ प्रत्यनीक.
३ तद्रुण.
४ समाधि.
५ सम
६ स्वभावोक्ति.
७ उदात्त.
८ विनोक्ति.
(फ) तर्कन्यायावरुन.
१ काव्यलिंग.
२ अनुमान.
३ अर्थांतरन्यास.
(ग) शृंखलावैचित्र्यावरुन.
१ कारणमाला.
२ एकावली.
३ मालादीपक.
४ सार.
(घ) अपन्हवाररुन.
१ व्याजोक्ति.
२ वक्रोक्ति.
३ मीलन.
(ड) विशेषणवैचित्र्यावरुन.
१ समासोक्ति.
२ परिकर.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP