अथ सुमेरुसंज्ञार्थ सूत्रम्
वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें.
समवृत्तस्य ( सैकान् हि ) पादार्णमितकोष्ठान् ।
एकैकोनानूर्ध्वमूर्ध्व यावदेकं विचक्षण: ॥१॥
अध: स्थितानां कोष्ठानां रुपमाद्यन्त्ययोर्लिखेत ।
शेषेषु शून्यमूर्ध्वेषु कोष्ठेष्वेकैककं तथा ॥२॥
एकस्मिन् प्रथमे कोष्ठे वृत्तपादमितं तत: ।
एकैकोनं कर्णगत्या यावव्दयन्त्यमथो कुरु ॥३॥
उर्ध्वाध: स्थितयोर्योगं स्थापयेतत्समीपके ।
तिर्यककोष्ठे भवेदेवं मेरुर्ज्ञेयो विचक्षणै: ॥४॥
एवं पंचाक्षरचरणस्य व्दात्रिंशद्भेदा भवन्ति ।
सुमेरु.
सुमेरुनेंही विशिष्टसंख्या अक्षरात्मक चरणाचे प्रकार किती होतात हे समजते. तो मांडण्याचा प्रकार जोशिबुवा सांगतात. खंडमेरुप्रमणें प्रथम, वृत्ताच्या चरणांत जितकी अक्षरें असतील त्यापेक्षा एक जास्ती, अशीं प्रथम कोष्टकें काढवीत. नंतर एकेक कोष्टक कमी करुन एक कोष्टक होईपर्यंत वर वर कोष्टकें मांडीत जावींत. ही मांडतांना खंडमेरुप्रमाणें एका बाजूची सबंद कोष्टकें न टाकतां दोन्ही बाजूंची अर्धी अर्धी सोडावींत. म्हणजे दोन्हीकडून सारखा कमी भाग करुन कोष्टकें वर चढवीत जावींत. नंतर खालच्या ओळींत पहिल्या व शेवटच्या कोष्टकांत एकाचा आकडा घालावा; वर राहिलेल्या मधल्या कोष्टकांत शून्यें घालावीत. त्याच्या वरील ओळींतील सर्व कोष्टकांत म्हणजे खालून दुसर्या कोष्टकांतील सर्व घरांत एकाचे आकडे टाकावेत. नंतर वरचे पहिले जे कोष्टक त्यांत वृत्ताच्या चरणांतील अक्षराचा आकडा कमी करुन दोहोपर्यंत ते मांडावेत. नंतर खालच्या वरच्या आकडयांची बेरीज करुन ती शेजारच्या मागच्या घरांत मांडावी. याप्रमाणें मांडलें असतां सुमेरु होतो. यांतही डावीकडचीं जी प्रथमची तिरकीं कोष्टकें, त्यांतील आकडयांचि बेरीज केली असतां जी येईल ती त्या पादांच्या भेदांची संख्या होय. उदाहरणार्थ पाच अक्षरी चरणाचा सुमेरु खाली मांडून दाखविला आहे.
पांच अक्षरांचा सुमेरु.
५
१० ४
१० ६ ३
५ ४ ३ २
१ १ १ १ १
१ ० ० ० ० १
------------------
३२
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2018

TOP