उत्तर खंड - निर्धारयोगो

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


भरतोहि यथा नित्यं वर्णयत्यात्मन स्तनू: ।
नामरुपाणि कुर्वाणो तथात्मा कर्मजास्तनू: ॥१॥
हा आत्मा सर्व होए । भेदा लेशु न साहे । परि देह कर्माचें उपाये । भिन्न दिसे ॥१॥
परि साच चि गा प्रबुधां । हें ब्रह्म चि आलें सर्व भेदा । हे मि मिथ्या तरि उपनिषदा । पुस जाये ॥२॥
अथवा वेदांताचेनि हातें । तु जाणसी हें निरुतें । विशेषे तुझा बोधु तुतें । प्रत्यक्षु असे ॥३॥
विश्व ब्रह्म या मता । तु ठाइं होउनि आइता । परि मिं जालों ग्रंथकर्त्ता । निर्धारास्तव ॥४॥
मागीलें सर्व कथनें । तुज जाली प्रमाणें । निवालासी पूर्णपणें । आह्मि देखो ॥५॥
पदव्दयाचा विचारु । डोळां दीसे साचारु । येकपणें निर्धारु । करुं याचा ॥६॥
जे जीव अविद्याजनीत । ते ‘त्व’ पद साक्षांत । येथ जड तें निभ्रांत । सबळ होये ॥७॥
तथा चि ‘तत्‍ ’ पदार्थु । माया भुतु समर्थु । आकारला अद्भुतु । सबळु तो चि ॥८॥
यां दो पदार्थी दिसे साचु । याते बोलीजे प्रपंचु । माये अविद्येचा देखे वेचु । तो हे नेणे ॥९॥
यास्तव तत्वार्थु । शोधावा सर्व पदार्थु । एर्‍हविं न शोधिता परमार्थु । चुकला काये ॥१०॥
माया शबळ आदिदेवा । अविद्या सबल साच जीवा । गरुडाचा दिठिवा । देखाव्या दोन्हि ॥११॥
धरुनि यांचा पदरु । प्रपंच दिसे साचारु । छायामंडपी परीवारु । चाले तैसा ॥१२॥
माया अविद्या मृगजलिं । प्रपंच तरंगाच्या उमाळीं । हे कापुराचि काजळिं । विस्तारलि ॥१३।
या प्रक्रुतिचा उभारा । होये प्रपंचाचा विखोरा । या प्रत्यक्षवांझेच्या वरा । विस्तारल्या ॥१४॥
हें ब्रह्म चि प्रकृति आकारें । उठलें प्रपंचविकारें । जेवि कलोळु कीजे सागरें । आपुलां पोटीं ॥१५॥
काय हो घृताचि बाहाळि । मध्यें दीसे रवाळी । मां तेवि माया प्रपंचाची रोळी । वस्तुचां ठाइं ॥१६॥
सुवर्ण हे लेणें नोहे । हा बोल कोठे राहे । तैसें तें विस्तारले आहे । दृश्याकारें ॥१७॥
दृश्ये चित्राचे ठसे । उठती आनंदभूमी असें । व्दैत कोंभैले आपैसें । ते च बीजीं ॥१८॥
प्रपंचु परवस्तु चि समूळ । याचां निराशीं हें च फळ । जैसें सींधुमुखें सकळ। गंगोदक ॥१९॥
असें या दृशातें धरी । कां पडे निरसनाचे भरी । त्यासी विवर्त्तली दोरी । साच जाली ॥२०॥
ज्यासी दोराचा डंखु भरे । त्यासी दृशाचे अडकुरें । तो ची स्वप्री चेंनि ज्वरें । नासला प्राणि ॥२१॥
जो व्दैत दे निवडोनि । कां निवडलें संगमा आणि । तो चि कंठि मिरवील लेनि । तरंगमाळिकाचि ॥२२॥
असा कोण्हि होईल साचा । जो फेडील नभाची त्वचा । तो चि या व्दैतप्रपंचा । आणिल नेमा ॥२३॥
जो प्रपंचविशई प्रमाणें । करी बोलाचि आभरणें । तो सुखे सेवील चांदिणे । माध्यान्हकाळिं ॥२४॥
तो बांधो रस्मांचि मोळी । सुखें गलां दोहों सेली । तो डोलांचि पुतली । वेगलि करो ॥२५॥
तो गगनगंगेचा ओघु वाळो । छाया पुरुषाचि अंगे जाळों । तो वेगळि करुनि कवलों । आंधारि छाया ॥२६॥
कि तो गगनगंगेहि थीर । सुखें चि धरो विढार । तो दिगांबराचे अंबर । जाये आणो ॥२७॥
तो मृगजळिचि जळचरें । सुखें गालो स्वकरें । तो चि चित्रीचें परिवारें । राज्य करों ॥२८॥
तो नभीचा तरु तोंडो । आणि ससयाचें सिंग मोडों । तो वेचुनि अरलें फेडो । दिपपुष्पाचि ॥२९॥
तो इंद्रकोदंडासी तळावो । इंद्रजालि गजु गोवो । त्रो वंध्यातनय लेववो । अलंकार नाना ॥३०॥
तो वारयाचे तंतु विनो । तो त्रिमिरझुलका गनो । तो गांधीले झांडोनि आनो । मधाचे घट ॥३१॥
तो विरजो कासविच्या क्षिरा । घालों उदकावरि चिर । तो कल्पोनि घृणाक्षरा । वाचों सुखे ॥३२॥
तो कीटतेजें निशि नाशो । गंधर्वग्रामि सुखें वसो । तो क्रिविलासीरी गीवसों । माहामणि ॥३३॥
तो दिवसा खद्योदे लाहो । चांदिनां मृगतृष्णा पाहो । तो मनाचा जेवणि राहो डरु देतु ॥३४॥
तो आणो पवलवळिचि पानें । तलवांगि वसो गंगावनें । ना तो नागवलिचेंनि कणें । गर्त्ता भरे ॥३५॥
तो आकाशिं प्रतिबिंबे धरो । बागुल धरुनि मारो । तो नपुंसकसुतेंसी करों । मैत्री सुखें ॥३६॥
जो मध्यरात्री गगनि । भ्रगु देखे नयनी । तो दृशातें घेउनी । न बैसे कैसा ॥३७।
ते वया दृशाचें टवाळें । हें निरर्थक अर्थिं फळें । जैसे मयोरपत्रीचे डोळे । अर्थहीण ॥३८॥
यास्तव सर्व निर्धारें । हे वस्तु चिं नांदे आकारें । मायाचा निरसुंनि अंकुरें । दुजें ते काई ॥३९॥
मूळि चि हे दृश नसे । तरि प्रपंची कहि वावसे । हे काष्टसूत्रि जैसें । बाहोलें खेळे ॥४०॥
यास्तव दृश नव्हे साचे । तरि दर्शन काये कोणाचें । मां द्रष्टा भेदु वाचे । येईल कैचा ॥४१॥
तर्‍हिं नाना प्रकारिं । इश्वरु सर्व साकारिं । प्रपंच भाशा दुसरी । असे चि ना ॥४२॥
असा हा पूर्ण ईश्वरु । सर्व अर्थि साचारु । येथ भेदाचा अंकुरु । असे चि ना ॥४३॥
जैसा कां स्वबुधिं । येशकारीं घॆतला सोसपादिं । तैसा वर्ते देहसन्मंधी । आत्मराजु ॥४४॥
नां तरी उदकाचा स्वादु जैसा । मील्लनि जाये सर्व रसा । ह परमात्मा तैसा जीवाकारें ॥४५॥
परी गा प्रपंचनिरासी । आत्मदशा उरे असी । जेवी कर्पुरांचा ग्राशी । हुताशनु ॥४६॥
जो जाणे या ईश्वरा । तो प्रपंचु नेदखे दुसरा । हेमग्राहिकु अलंकारा । न मानि तैसा ॥४७॥
ज्यासी अमृत सेवनें । तो कां आणिल अनुपानें । चिंतामणिचें संधानें । उदिम तैसे ॥४८॥
जो बैसेल भानुचे बोतपलि । तो दीपु कासया उजळि । ते ईश्वरुप्राप्ति ट्वाळि । सरति सर्वे ॥४९॥
ते ईश्वरप्राप्ति कारणें । उठलि ये नाना ज्ञानें । ते कीतियेकें प्रमाणें । परिस सांगो ॥५०॥
ये प्राप्तिस्त्व हव्यासु । येकां मानें उपदेशु । नाना प्रकारिं अभ्यासु । माने येकां ॥५१॥
सावयेव साकार ज्ञान । हें चि येकसी प्रमाण । एक निरसीति त्रिगुण । या चि स्तव ॥५२॥
येक शून्यातें गालुनि घेति । येक तें सून्यही निरसीति । एक गुणांचा अंति । सुखि होत ॥५३॥
लिळा भोग आनंदु । येकां याचा चि संवादु । येक मानिति विषादु । भवसुखाचा ॥५४॥
एका दृश्यदृष्टीभावो । एका याचा हि अभावो । आस्ति नास्ति अतित देवो । येक ह्मणती ॥५५॥
एक मानिति स्वानंदबोधु । एक भेदी येकां अभेदु । विधि वेधु निशेदानिशेदु । माने येकां ॥५६॥
येक लाविति काष्टी । येक बैसविति दृष्टी । येक पडती संकष्टी । षडांगाचा ॥५७॥
येक भेदिति सप्तयंत्रे । येक निवालें अजपा मंत्रें । दशदेहें पवित्रें । मानती येकां ॥५८॥
अष्टदळविवरणि । थिर होति येक प्राणि । लिंग देहिं कारणिं । निवाले येक ॥५९॥
येक मानिति बुबुळ । ते चक्षु ज्ञानि केवळ । येक घेताती मूळ । रसनास्वादु ॥६०॥
एक मन चि आत्मा मानिति । येक प्राणातें चि घेति । येक ह्मणती । आत्मा हंसु ॥६१॥
अनुहात नादध्वनि । येक लक्षिती श्रवणि। गीत वाद्य वाणि । माने येकां ॥६२॥
सुरतसुख सुरसु । येकां कामतत्विं विळासु । काळवंचनें विश्वासु । येकां पुरुषां ॥६३॥
तन्मात्राचें कारण । येकां पुरुषां हें चि ज्ञान । चंद्रसूर्यो प्रमाण । येकां नरां ॥६४॥
‘सोहं ब्रह्मं’ साक्षांत । एक ‘मि ब्रह्म ’ मानित । एक तें वर्त्तत । मिथ्या संतोशें ॥६५॥
जें शुधात्म अक्षर । ते ऊँ कारिं येक थीर । मात्रा विवरण विकार । मानें तया ॥६६॥
गुणत्रयी भरलें येक । एकां महब्रह्म संतिक । येक मानिति व्यापक । सर्व वस्तु ॥६७॥
येक नभातें लक्षिति । एक नेत्र दाटोनि पाहाति । येक नेत्रझुळका घेती । जीव ह्मणौनि ॥६८॥
जीव हंसु नवाळी । येक पाहाति इंद्रजाळि । एक पाहाति मंडळी । हीरण्यगर्भु ॥६९॥
उग्र तप दारुण । एका प्रिये देहदमन । एका लुंचन एका मुंडन । या चि स्तव ॥७०॥
एक धरिति जटाजूट । एक मौन्य एक वाजट । एक पाठक एक शुभट । शास्त्र विषयिं ॥७१॥
एका मंत्र अनुष्टानें । येक नज्ञ येक प्रावरणें । एका चर्में परिधानें । उदास येक ॥७२॥
भस्मलेपनि जलस्नानि । एक नानातीर्ह्तगमनि । येक यागहूवनि । दानशील एक ॥७३॥
येका जीवजात अहिंसा । भूतकृपा नेमु असा । ज्ञानि धर्मि भर्वसा । मानिला एकीं ॥७४॥
एका थावर जंगम मुर्त्ति नेम । एक जनापवादें सुगम । एक दक्षिणाचारें उत्तम । एक वामाचारिं ॥७५॥
एकीं धरिले गंगोदर । एक सेविति विवर । एक टाळिति विकार । इंद्रियाचें ॥७६॥
एक मर्दिती मना । एक सांडिती विषयवासना । नातळति अशनपाना । निवार्णि एक ॥७७॥
नृत्यें वाद्यें गायन । एकां हें चि प्रमाण । एक सेविती स्मशान । अघॆरि एक ॥७८॥
एक अरण्यें गिरिकंदरीं । एक ग्रहस्त ग्रामपुरी । मनें मुक्त असंसारी । होती एक ॥७९॥
एक आश्रमदरुशणि । एक पदव्याकरणि । एक काळनियमज्ञानि । होउनि ठाति ॥८०॥
एक स्मार्त्त एक शांभव । एक वैष्णव एक शैव । नाना परी देवी देव । सेविति एक ॥८१॥
एक भ्रुमध्यें लक्षीति । एक मनालयो करिती । एक समाधि बैसति । एकाग्रता एकां ॥८२॥
वेदांति प्रवर्त्तले येक । पाशुपति मिमांसीक । नपध्यें कर्मे नैयायीक । असें वर्त्तती ॥८३॥
असया मताच्या कोटी । घेउनि धावती पाठोवाटी । ऐकें ईश्वरप्राप्ती साटीं । फुटी पडली ॥८४॥
तो ईश्वरु हाता मिळे । फीटति भ्रांतिचे पटळें । उकलति ज्ञानें बुबुळें । जेणें प्रसंगे ॥८५॥
अज्ञानतमाचा लेशु फाटॆ । वारीती मोक्षाचि कपाटें । जेंथ पदाची पायेवटें । सगरें होती ॥८६॥
या दृश्याचें आभाळ तुटें । भवाब्धीचा डोहो आटे । वासनादेवी उपाटॆ । समूळ स्वागें ॥८७॥
ज्या ज्ञानाचा संघ्रष्टीं । बोधा येईल सर्व श्रृष्टी । पूर्णानंदि बैसेल दृष्टी । हे चि आपुली ॥८८॥
जालियाचेंनि जालेंपणें । इंद्रियांसगट ब्रह्म होणें । येणें प्रकारें कथनें । चालति पुढां ॥८९॥
मागांहि आदि होनि । या ग्रंथाचि उभारणि । हें निर्धारा वाचुनी । चालिलि नाहिं ॥९०॥
प्रमाणु पासुनि ब्रह्मगोळ । हें आत्में व्यापीलें सकळ । यां सकळां अतुं मूळ । हा चि प्रभु ॥९१॥
या देवा वाचुनि कांहि । कोठें वासस्थान नाहिं । या सर्वांचें सूत्र तेंहीं । हा चि असे ॥९२॥
हा शुध्द बुध्द नित्य मुक्त । सत्यु आणि शाश्वतु । एवं षडगुणि सदोदितु । सर्वात्मा हा ॥९३॥
तुं ऐसे ह्मणसी । हे एवढि वस्तु पूर्ण असी । ते या जना कैसी । आगम्य जालि ॥९४॥
तरि गा शास्त्रें सकळै कें । ए नव्हती ब्रह्मप्रतिपादके । कां जें आछादिलिवस्तु तितुकें । रुप आहे ॥९५॥
जेवी गाभारां देउला दाटणि । प्रती देव हरु शणि । प्रत्यक्ष उदैला तरणि । न मनें सर्वा ॥९६॥
तेवि ब्रह्म सर्व हि बोलते । तै कर्म धर्म लोपते । महत्व मागां पडते । सर्वा देवाचे ॥९७॥
आणि ये वस्तुसि अति आर्ते । सांग कोण गीवसों येते । तरी सर्व वक्ते बोलते । यातें चि नेमें ॥९८॥
कदाचिद्‍ द्रवे घनु मोती । तें आदरें नें सुरपती । त्या मोतीयाची वृष्टी होति सर्व क्षीति । तैं कोण पुसते ॥९९॥
समयिं वैरागरि पाडें । निपजला हिरा मोला चढे । जैं ये भूमीचें पीक तें सर्व ही खरे । तैं मोल कैचें ॥१००॥
विदेसी हेममृतिका । ह्मणौनि पावे मोल टीका । सुवर्णमय असती सर्व भूमिका । तैं कोण घेतें ॥१॥
दिवसु चि असतां निरंतरु । तैं कोण मानितें भास्करु । अमृते भरता सागरु । तैं दुर्लभु कोणा ॥२॥
समस्तहि वनस्पती कल्पिली फळें प्रसवती । तै कल्पतरु चि प्रिति । कोण धरिते ॥३॥
घरोघरी चिंतामणि । असते सर्वमेदिनी । तैं सांग पां कोणा चिंतवणी । पडती त्या ॥४॥
तेवी वेद शास्त्रें अनेकें । समूळ होति ब्रह्मपादकें । तैं ब्रह्मज्ञानाचे इतुकें । सांकडें कां पडे तें ॥५॥
यास्तव पूर्वाचरी भलें । तेहीं यव्दिषयीं मौन्यें धरीलें । सेंवटि निश्चयपूर्वक बोलिलें । ते चि हे वस्त ॥६॥
शुक वाम वसिष्ट मुनि । हें चि बोलति गर्जुनी । हरिहर आदि करुनि । नेमिति हे वस्तु ॥७॥
शास्त्रीं उभारले वेदांत । वेदिं उपनिषद गर्जत । तेणें आधारें बोलिजत । ते चि आह्मिं ॥८॥
पहि या निर्धारा वाचुनि । सुगम नाहि त्रीभुवनी । आणि संशयाचा संहारणी । दुजें नसे ॥९॥
ये भवयातने चीरा । आणिकु नेदखुन शीष्यवरा । माहासुखाचा वोवरा । हा चि असे ॥११०॥
हा निश्चयो होए जेणें । तें चि आरंभलि कथनें । त्रींबकु ह्मणें हें बोलणें । श्री सिध्देशाचॆं ॥११॥
इतिश्री चिदादित्ये प्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडे निर्धारयोगोनाम तृतीय कथन मिति ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP