उत्तर खंड - अहिंसायोग
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
आत्मैव सर्वभूतानां भेदाभेदं न पश्यति ॥
स योगी कृपाविष्टो हिंसाकर्म न विद्यते ॥१॥
हा आत्मा जाणोनि प्रवृत्ति । भलें भजावें सर्वभूति । ये भूतदयेपरुती । दशा नाहीं ॥१॥
अंनार्थि भोजन । हे भूतकृपया कारण । जें जीवाचें पोषण । तेंचि भलें ॥२॥
तृप्ततृप्त करणें । ये नोहे चि भूतभजनें । डंबार्थी प्रमाणें । बोलिजतियें ॥३॥
जे दे वांन घे वान । तें येथें न दिसे प्रमाण । आर्तिकां किजे भजन । तेंचि उंच ॥४॥
धर्मुं करी सहस्रवरी । एक अनार्थि अव्हेरी । ये भूतदयेचें भरी । भरुं नये ॥५॥
देखे भूतें समता । धर्मु करी परता । हें दया पाळितां । भलें असे ॥६॥
क्षुधार्थी भोजन । दुर्बला दीजे दान । नज्ञांसी प्रावरण । या चि परी ॥७॥
क्लेशीकाचा केशु हरी । दु:खीतांचे दुख निवारी । भूतकृपा ते घरी । सिध जालि ॥८॥
जळि वनि हुताशनि । राजव्दारि रिपुस्थानि । येथ पिडे तो प्राणि । राखतां भला ॥९॥
नसतां अभिमानु कुसरी । अपरोक्ष हितकरी । तो भूतकृपे माझारी शिरोमणिं ॥१०॥
जैसा भूतभजन नरु । तो देवाचा अवतारु । स्वबळें भव सागरु । तो चि तरे ॥११॥
तो मोक्षाचां कळसी । बैसोनि ईश्वरत्व गीवसी । भृतकृपेचि असी । श्रेष्ठता असे ॥१२॥
॥इति भूतदया ॥
====
यास्तव भूतां हिंसा । ते चुकवावी सहसा । अधर्मु हिंसे सहसा । न पाहतां लाभे ॥१३॥
पाहतां हिंसे परुतें । पापा नाहिं निरुतें । कां जें आत्मरुपें भूतें । पीडा पावती ॥१४॥
सूक्ष्म अथवा स्थूळ । जीव आत्मरुप सकळ । परी असावें केवळ । अहिंसा धर्मीं ॥१५॥
तृण काष्ट आदि करुनि । यांचेंहिं दु:ख मानि मनिं । अथवा जीवश्रध्दा देखोनि । उदासु आंगे होये ॥१६॥
जो पाहोनि पा ऊँ घाली पुढे । उंच न बोले अतिपाडे । करश्वासु उंचवडें । वांगों नेदी ॥१७॥
जीव आदिकरुनि मशक । वनस्पति तृणादिक । याचें दु:ख सकळैक । स्वयें मानि ॥१८॥
सर्वत्र कृपे पाहे । रिपुचाहि कोपु साहे । तेथें विसावली आहें । अहिसा बुधि ॥१९॥
जो परदु:ख स्वयें मानीं । तो अहिंसे गौरवला प्राणि । ना या धर्माचां भूषणीं । तो निर्मळकळसु ॥२०॥
॥इति अहिंसा धर्मु ॥
====
तंव बोले शिष्यमृत्यु । जी हा अहिंसा धर्मु सत्यु । परि ग्रहस्तधर्मिं नित्यु । होये कैसा ॥२१॥
द्ळन कंडन मार्जन । दीपु हुतु ईंधन । गृहधर्मु या वाचुन । चाले कैसा ॥२२॥
जें स्ववर्णिचि कर्में । ते न चलति अहिंसा धर्में । तरि आह्मि कोणे वर्में । असावें जी ॥२३॥
तंव बोले श्रीगुरु । हा वैराग्याचा निर्धारु । गृहधर्मीं वीचारु । असा से ॥२४॥
व्यापारी हिंसा माननें । तैं स्वधर्मासी दूशणें । होम कर्म उद्यापनें । कैचि तेव्हा ॥२५॥
सर्व अहिंसे वर्तने । तरि आधि स्वधर्मु डालणें । पाठिं अधिकारु घेणें । त्या धर्माचा ॥२६॥
सांडीता सर्व हिंसा धर्म । न चले ब्राह्मणाचें कर्म । कां जे पत्र पुष्प फल धानें द्रुर्म । कर्मास्तव ॥२७॥
या चि परि साचार । अहिंसे न चळति वर्णाचार । राजन्य धर्म विचार । असें असति ॥२८॥
क्रूर दुष्ट रिपु तस्कर । यांचें करावें संहार । न करितां पतन थोर । क्षत्र धर्मा ॥२९॥
कृशि वाणिज्या पासुनि । हिंसा चुके कैसेनि । शुद्र ते हिंसे पासुनि । चुकति कैसें ॥३०॥
अन्न धान्य डाळ मूळ । पत्र पुष्प फळ जळ । हें आदिकरुनि सकळ । जीवरुप ॥३१॥
या वाचुनि न सरे । ह्मणौनि स्वधर्माचेंनि आधारें । असावें कीरु चातुरें । समता बुधी ॥३२॥
गृहस्त धर्मि दोशु घडॆ । तो तेथीचे चि धर्में मोडे । विशेषें पुण्यें जोडे । पुण्यपद ॥३३॥
समूळ अहिंसा धर्मु असा । जो सांडी शरीराचि आशा । वर्ते काष्टाचया असा । त्यांसी ते घडॆ ॥३४॥
कां गळित पत्र चळे वातें । तैसा वर्ते परहातें । स्मरु नये तयातें । हिंसा कैसी ॥३५॥
एरीं स्वधर्मि असणें । आरंभिले सिधि नेणें । श्रृतिस्मृतिचें वचनें । मार्गि चालावें ॥३६॥
जें वेदशास्त्रवचन । तें मानावें प्रमाण । न मनितां पतन । थोर असे ॥३७॥
नित्यधर्मि धर्मु ना दोशु । परि नैमितिं आहे विशेषु । किंचित स्वधर्मु चुके तो पुरुशु । पतन पावे ॥३८॥
आलस्यें अशक्तपणें । कां विस्मृति कां विटळे मन । कर्म सांडी तो प्राणि पतनें । चुके कैसा ॥३९॥
येथ अहिंसेचि हे चि मातु । जे दोशावांचुनि दंडु घातु । कार्यानुकर्मे वर्ततु । तो चि निका ॥४०॥
घेतां उंच धर्माचि दशा । मानु नये नीच हिंसा । कार्या वाचुनु तृण काडि सहसा । तोडुं नये ॥४१॥
हिंसारुप जे प्राणी । ते होती बर्हिज्ञानी । ते आणिति पीटोनि । अर्थ असा ॥४२॥
हा आत्मा जालकु सर्वासी । तो आत्मा चि आत्मयातें नाशी । तो दोशादोशु कोणासी । घडे आतां ॥४३॥
मारि मारवी आन । दोषादोशु भोगी कवण । असें अप्रमाणि प्रमाण । आणिति मंद ॥४४॥
तरी गा आपुल्याचि शरीरा । घातु करणें होये नरा । तो दुख वाचुनि दुसरा । भावो नसे ॥४५॥
आणि पार्थ उपदेशीं असें । बोलिले आहे रुशीकेशें । जे आत्मा अविनाशु नासे । देहजात ॥४६॥
आत्मा अभंगु अछेदु । अशेष अदह्य अकेदु । या शरीराचा सन्मधु तया नसे ॥४७॥
तरी पुढीलां कार्या कारणें । हें बोलिलें नारायणें । आणि स्वधर्मुही रक्षणें । असें केलें ॥४९॥
आणि हिंसेचें पाप नाहीं । तरी अश्वमेधें काज काई । आणि ‘न देवचरितं चरेत् ’ हेहिं । प्रमाण असे ॥५०॥
जो अहिंसा धर्माचा तरु । तो इहलोकीं दिसे सुंदरु । आणि परलोकिहि अधीकारु । त्यासी चि असे ॥५१॥
स्वधर्मिची कर्में । जें जें बोलिलिं उत्तमें । तें आचारावीं नेमें । आवडिचें ॥५२॥
पत्रि देवो पूजनें । गवार्थि त्रुण घेणें । समिधा आहुती हवणें । प्रारंभावी ॥५३॥
यागु करीतां गहन । न मनावें पशुचें दूशण । भोजनार्थीं शाख अन्न । वर्जु नये ॥५४॥
दळन कंडनादिक । चालावें गृहकृतें सकळैक । धर्माचारिचें पातक । मानुं नये ॥५५॥
पाळितां गृहस्ताश्रम । तेथ जोडति नाना धर्म । येवं नित्यकृत कर्म । बाधक नव्हे ॥५६॥
ये पंचसुना पातकें असी । नित्यें कर्मीं उरती कैसी । आणि गृहस्त आचरे पासी । क्षाळन होये ॥५७॥
गृहधर्मापासुन । कितेकां जीवाचे पोशन । तिर्थीक याचिक दरुशनें । पाळिजे येहिं ॥५८॥
याचेंनि याग दीप्त । याचेंनि देव त्रुप । पाहातां सत्कर्मिं आप्त । ईश्वरांचें ॥५९॥
याचेंनि गौरवति प्रतिमा । याचेंनि तीर्थासी महिमा । पुराणां आगमां निर्गमा । आधारु हें चि ॥६०॥
देव पितर आदिकरुनि । ईछिति याचें पानि । इत्यादिकां संजीवनि । ग्रहस्त होति ॥६१॥
त्या पासाव सर्व योग । या चि पासाव सर्व योग । या चि पासाव नाना मार्ग । इत्यादि सर्व चांग । उदर्य याचें ॥६२॥
एवं गृहस्तधर्मु चोखाळ । परि हंसा चुकवावि वायाल । जीचे अंगें प्रबळ । पाप जोडे ॥६३॥
जे हिंसा करीतां । मुख्य मुक्ति चि ये हातां । येणें मार्गे वर्त्ततां । भलें असे ॥६४॥
भूतें देवतें प्रतिमां । सुषें पूजावीं उतमां । पूर्ण देखोनि परमात्मा । भजावें सर्वा ॥६५॥
॥इति गृहस्तधर्मु ॥ऽऽ॥
====
जे लोकि गौरवे । ते भलतेनि करावें । ब्रह्मबुध भजावे । सर्वभूतां ॥६६॥
याग कर्म व्रतें दानें । तपें अनुष्टानें उपोशनें । आत्मबुधी आवरणें । सर्वत्र देहीं ॥६७॥
येक ब्रह्म देखावें । तेणें कृतकर्म अनुष्टावें । परि अंतरिचें न चुकावें । पूर्णपणे ॥६८॥
कोठें आहे कोठें नाहिं । असें ब्रह्म नोहे कांहिं । हा ऐक्यभाव देहिं । सांठवावा ॥६९॥
नाना मिसें करुन । करावें आत्मभजन । या वेगळे पावन । असे चि ना ॥७०॥
येथे आणिक येक आहे । जे ब्रह्मा कांहिं नोहे । एवं ब्रह्मबुधि राहे । तो चि भला ॥७१॥
पाठिं सर्वही भजन । सहज होये ब्रह्मार्पण । कां जे दाता भुक्ता आन । असे चि ना ॥७२॥
जें बोलिलें बृहदारणकि । ते चि असे गीताश्लोकी । वेदांति निरुपणि निकी । ते चि बुधी ॥७३॥
आणिकिहि अनकें । शास्त्रें ब्रह्मप्रतिपादकें । निर्धारे मानिति सकळैकें । येकु आत्मा ॥७४॥
पूर्वसाक्षी वाचुन । न करावें युक्तिजल्पन । यास्तव तें चि वचन । बोलिजे आह्मिं ॥७५॥
अश्व गो माहिषी गज । धातु शीळा वृक्ष बिज । समुद्र सरिता कुंज । ब्रह्म सर्व ॥७६॥
गज मशक समान । तैसें चि ब्रह्म नानावर्ण । येथ आचार भिन्नाभिन्न । दीसति तर्हिं ॥७७॥
मधु शर्करा तिल घृत । सुर्वा समिधा इंधन हुत । ब्रह्मीं ब्रह्मार्पण होत । ब्रह्मयागु हा ॥७८॥
तीर्थ क्षेत्र तपोवन । ब्रह्म ब्रह्मा भ्रमण । तपसाधि अनुष्टान । दुजें नाहिं ॥७९॥
वैरागी तापसी गृहस्त । देव भक्त समस्त । हे नव्हे व्यस्त । वाचुनि वस्तु ॥८०॥
ब्रह्म यजमान पाक रस । शाका भूमि पात्र ग्राश । ब्रह्में सुरस । अशन होये ॥८१॥
उदिमाचेंनि भावे । हें ब्रह्म चि घ्यावें द्यावें । वित्त वाणिज्य वस्तु नावें । ब्रह्म चि होये ॥८२॥
एवं सर्वाही सगट । ब्रह्म नांदे येक दाट । तरि त्या भेदाचें तलपट । कैसें नोहे ॥८३॥
जें जें शुभ कारण । तें म्हणावें ब्रह्मार्पण । येर्हवीं ब्रह्मावाचुन । नवचें कोठें ॥८४॥
सव्यासव्यें भलतिकडे । जर्हि हें उदक वावडॆ । तर्हिं सागरावांचुनि कोण्हिकडॆ । जाउं चि नेणें ॥८५॥
तैसें सर्व ब्रह्मीं पावे । तरी ब्रह्मार्पण कां न ह्मणावें जो वर्त्ते येणें भावें । तो चि भला ॥८६॥
तैसें सर्व ब्रह्मा मानि । अपुरें नोहे भर्वसेनि । हें आपुलें अहंते पासुनी । आपुण विकरे ॥८७॥
या ब्रह्मदारुचां देठी । अहंता महुरे फले सृष्टी । किं ब्रह्मघनि अहंता वृष्टी । जीव धारा ॥८८॥
हा ब्रह्मादित्यु साक्षांत । अहंता उदो स्फूरत । सृष्टी कीरणें असंक्षात । उठति तेथें ॥८९॥
तैसें चि अहंता अस्तमानि । सृष्टी किरणाची आटनी । सूष्टी स्छिति संहारणी । हा ची प्रकारु ॥९०॥
किं ब्रह्मांबु अहंता खलाले । सृष्टी बुद्वुदाचे उमाळे । अहंता आर्तेविन जळे । बुब्दुध सोखिजे ॥९१॥
या ब्रह्मोदधीची पूर्णता । उर्मि उठे अहंता । भरीतें येतसे भूता । हे चिं योनि ॥९२॥
अहंता पुससील कीति । तरी भूमीसी जैसी रति । तुकली ब्रह्मिं स्फूरती । मिं इतुकी ॥९३॥
मिं इतुका चि अंकुरु । जाला श्रृष्टिविस्तारु । असा जाणौनि ईश्वरु । भजावें भूतिं ॥९४॥
ये ब्रह्म निधिलागी । दोनिमार्ग चालिले जगि । ते ते वस्तुचां आंगी । देखो येती ॥९५॥
प्रथम मार्गु पीपलिका । तो व्दीभावो ऐशी टीका । येकु संशयार्णवि येका । ब्रह्मस्त कर्म ॥९६॥
जो ब्रह्मनामातेंहि नेणें । कर्मे करी जडपणें । बांधला संशयें बंधनें । तो मंद होये ॥९७॥
ब्रह्म दृश्य नसतां । ब्रह्मी चि श्रधा चित्ता । कर्मे करी तात्पर्यता । तो निका मानें ॥९८॥
जालया ब्रह्मज्ञान । मी ब्रह्म व्दिधा मन । येणें सुखें प्रविण । विहंगमा तो ॥९९॥
पिपीलका कर्मि तात्पर्यता । विहंगमा ब्रह्मज्ञु आईता । हें निवडोनि सांगीतलें सुतां । पूर्वि ची आह्मिं ॥१००॥
या दोहीं पंथी भेद । असे बोले विश्वकंद । शेष पंथु समंध । आहे पुढां ॥१०१॥
मुंगी मार्गु अति जडु । गरुडमार्गु तोहि दुथडु । कां जे मिं ब्रह्म निवाडु । असे तेथें ॥२॥
मुंगी स्वादु साधी चुके । पक्षु फुंजे स्वादादिकें । ह्मणौन घ्यावा कवतुकें । शेषपंथु ॥३॥
तो मार्गु विकटा । सांगणे घडला नीळकंठा । जें सांडोनि दोन्हि वाटा । वस्तु होणें ॥४॥
कर्म पाउलें न साहे । ज्ञान पक्षु तो हि राहे । पादे पक्षेविण आहे । शेष पंथु ॥५॥
जैसा कां शेषनागु । आगेंचि कर्मि मार्गु । ये बुधीचा चांगु । तीजा पंथु ॥६॥
तेवी ब्रह्म जालेयां आंगें । मार्ग सोकोणा लागे । तो ब्रह्मस्थितु येणें योगें । शेषु पंथे ॥७॥
॥ इति पंथ मार्गत्रया ॥ऽऽ॥
====
असें मार्गाचें कथन । शीष्या केलें निरुपण । परि ब्रह्मबुधी भजन । सर्व ही भले ॥८॥
या प्रपंचातिल तीव्हढि । घ्यावी आत्मत्वाची गोडी । या प्रपंचाचें पाडी । पडों नये ॥९॥
जैसा सरोजगर्भीचा थीरु । मकरंदु सेवी भ्रमरु । थुळ बुधीचा कुंजरु । नेणें यातें ॥१०॥
खेदु न करीतां कुमोदा । पैलु सेवी मकरंदा । गजु नेणें या स्वादा । समूळ ग्रासी ॥११॥
तेवी जडबुधीचे प्राणि । घॆति प्रपंच कवलुनि । ब्रह्म स्वादु ब्रह्मज्ञानी । तो चि जाणें ॥१२॥
नाना कष्टाचेंनि पाडॆं । कां मन घालावें बापुडें । जे वीनकष्टें आतुडें । तें चि भलें ॥१३॥
आणि लाधलें तरि असें । जे सर्व ही दाटलें दीसे । भूतग्रामेंसी प्रपंचु असें । जया मध्यें ॥१४॥
जे येकलि चि वस्तु घेतां । अवघें चि विश्व ये हातां । पदाचिहि दुर्बलता । नसे जेथें ॥१५॥
गीवसावी सर्व दीप्ति । तैं दीपुचि घेईजे हाती । किं देखिलें या गभस्ति । सर्व प्रभा ॥१६॥
किं पूर्ण लाहिजें पंधरें । तै कां उणे ये भांगारें । तैसें मूळ घेतां साकारें । हातां येती ॥१७॥
गीवसुनि घ्यावें जळ । तैं तब्दुध येती समूळ । तेवी ब्रह्म घेतां सकळ । आपाइते ॥१८॥
असें ब्रह्म सर्वेसी घ्यावें । तै सर्व चि आपण होवावें । ब्रह्मपदविचे राणिवें । असावें सुखें ॥१९॥
पाठीं त्रैलोकीं साचारु । होये आपला चि अधिकारु । एवं या ब्रह्मीष्ट होउनि थोरु । समर्थु नसे ॥२०॥
आरे ब्रह्म ते सचिदानंद । जगप्रवर्त्ति नाम भेद । परी तें सर्व शुध बुध । सर्वत्रेंसी ॥२१॥
ते चि पुढील कथनी असें । सांगैन सर्व समजे तैसें । समजलया अनारीसें । नवटे कोण्हां ॥२२॥
तें आपुलेनि उल्हासें । आह्मालागी श्रीसिध्देशें । त्रिंबकु ह्मणें हें असे । दीधले वर्म ॥२३॥
इतिश्री चिदादीत्यप्रकाशे श्रीमव्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसान खंडे विवरणे अहिंसायोग नाम सप्तम कथन मिति ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP