नृसिंह जयंती - अदितीची गर्भधारणा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


अदितीचे पुत्र स्वर्गाते भोगिती । म्हणुनी मानी खंती दैत्यमाता ॥१॥
प्रार्थि कश्यपासी आपुले मुलांस्तव । तयां राज्यवैभव प्राप्त व्हावे ॥२॥
बळी पुत्र व्हावे म्हणे आपणासी । म्हणोनि व्रतासी योजीतसे ॥३॥
व्रतपूर्ण होतां कामोद्भव मनी । होय जाणा झणी दितीलागी ॥४॥
कश्यपाचा धरी पदर लोभाने । विह्वल कामाने होवोनियां ॥५॥
संध्यासमय तेव्हा घोर रौद्र वेळा । परी ती अबला न सोडीच ॥६॥
परोपरी केली तिची समजावणी । परी अंत:करणी उमगेना ॥७॥
विवेक न होय अधीर झाली नारी । भोग दिला तरी कश्यपाने ॥८॥
मग पश्चात्तापे शरण जहाली । चरणांसी भली स्वभर्त्याच्या ॥९॥
घोर पुत्र तुझे होतील दयिते । ऐशिया वाणीते पति सांगती ॥१०॥
हरिचीया हाती त्यांसी मृत्यु यावा । ऐसा वर द्यावा दिती म्हणे ॥११॥
कश्यपानी दिला तिज आशीर्वाद । श्रीहरीवरद होतील की ॥१२॥
विनायक म्हणे जावळेतनय । प्रसिद्ध दैतेय तीस झाले ॥१३॥


N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP