मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|वामन जयंती| ज्ञानदेव तु कैवल्यम वामन जयंती विषय ज्ञानदेव तु कैवल्यम ह्रदिस्थ वामन (आध्यात्मिक) वामनदर्शनाने बुद्धिमोचन वामनबुद्धिप्रवेश व उपनिषदभाव वामन जयंती - ज्ञानदेव तु कैवल्यम श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन ज्ञानदेव तु कैवल्यम Translation - भाषांतर गुरुवार ता. ४-९-१९३०ज्ञानाविण मुक्ति नसे लभ्य जाणा । श्रीगुरुचरणां आश्रयावे ॥१॥कर्माचियायोगं चित्तशुद्धी होत । ज्ञानायोग्य होत चित्त जाणा ॥२॥हिरण्यगर्भाची करितां उपासना । सामर्थ्य ये मना अनिवार ॥३॥वाणीमाजी सिद्धी सर्व प्राप्त होती । ज्ञान त्वरित गति साध्य होई ॥४॥नोहे नोहे नोहे मोक्ष तो कर्माने । हे त्रिविक्रमाने दावीयेले ॥५॥ह्रदाकाशी आहे स्थित जो वामन । करितां त्याचे ध्यान ज्ञानसिद्धी ॥६॥विनायक म्हणे तया वामनसी । भजूं आनंदेसी सार्वकाळ ॥७॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP