अनुलोम प्राणायाम

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


अनु म्हणजे बरोबर, सह किंवा संबंधित; तसेच योग्य क्रमाने. अनुलोम म्हणजे नियमित टप्प्याटप्प्याने, केसाच्या दिशेने, योग्य क्रमाने. (लोम=केस) अनुलोम प्राणायामात पूरक दोन्ही नाकपुडयांमधून घेतला जातो आणि रेचक आळीपाळीने एकेका नाकपुडीतून सोडला जातो.

पध्दती
१. पद्मासन (चित्र क्र.१०४), सिध्दासन (चित्र क्र.८४) किंवा वीरासन (चित्र क्र.८९) यासारख्या सुखकर आसनात बसा.
२. पाठ ताठ व सरळ ठेवा. डोके धडाकडे न्या आणि गळपट्टीच्या हाडांमध्ये व उरोस्थीवरील खोबणीत हनुवटी टेका. (हा झाला जालंधरबंध)
३. उज्जायीतल्याप्रमाणे दोन्ही नाकपुडयांमधून दीर्घ श्वास घ्या व फुफ्फुसे पूर्णपणे भरा.
४. मूलबंधासह (पाहा पृ.२४९) शक्यतेप्रमाणे ५ ते १० सेकंद आंतरकुंभक करा.
५. सूर्यभेदन प्राणायामात वर्णन केल्याप्रमाणे उजवा हात नाकावर ठेवा. मूलबंध मुक्त करा. डावी नाकपुडी पूणपणे बंद ठेवून अर्धवट उघडया उजव्या नाकपुडीमधून संथपणे श्वास सोडा. फुफ्फुसे पूर्णपणे रिकामी करा व नाकावरचा हात खाली न्या.
६. परिच्छेद क्र. ३ प्रमाणे दोन्ही नाकपुडयांमधून श्वास घ्या.
७. मूलबंधासह शक्यतेप्रमाणे ५ ते १० सेकंद आंतरकुंभक करा. परिच्छेद क्र.४ मध्ये वर्णिलेला आंतरकुंभक आणि हा आंतरकुंभक हे समान अवधीचे असावेत.
८. पुन्हा उजवा हात नाकावर ठेवा. मूलबंध सोडा आणि उजवी नाकपुडी पूर्णपणे बंद करा. आता डावी नाकपुडी अर्धवट उघडी ठेवा आणि संथ व दीर्घ रेचक करुन फुफ्फुसे पूर्णपणे रिकामी करा.
९. येथे अनुलोम प्राणायामाचे एक आवर्तन पूर्ण होते.
१०. सलगपणे ५ ते ८ आवर्तने करा.
११. नंतर शवासनात पडून राहा. (चित्र क्र.५९२)

परिणाम
या प्राणायामापासून उज्जायी, नाडीशोधन व सूर्यभेदन यांच्यासारखाच लाभ मिळतो.

इशारा
१. अनुलोम प्राणायामात पूरकापेक्षा रेचकाला अधिक अवधी दिला जातो. त्यामुळे श्वसनाच्या लयीत फेर पडतो. हा फेरफार कठीण असतो, त्यामुळे प्रगत अभ्यासकांनीच हा प्राणायाम करावा.
२. रक्तदाब, हृदयविकार किंवा मज्जेचे विकार असलेल्या व्यक्तींनी हा प्रकार करु नये, कारण त्याचे परिणाम हानिकारक होतील.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP