वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
जनी भोजनी नाम वाचे वदावे ।
अति आदरें गद्य घोषें म्हणावे ।
हरि चिंतनी अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥
*
जय जय रघुवीर समर्थ ॥
*
मुखी घास घेता करावा विचार ।
कशासाठी हे अन्न मी सेविणार ।
घडो माझिया हातून देशसेवा ।
म्हणॊनि मिळावी मला शक्ती देवा ॥
ॐ सहनाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥
ॐ शांति: शांति : शांति: ॥
अहं वैश्र्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: ।
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥