उत्तम गुण मज दे रामा

*

पावन भिक्षा दे रामा । दीनद्‍याळा दे रामा ।

अभेदभक्ति दे रामा । अर्थारोहण दे रामा ।

तद्रुपता मज दे रामा । आत्मनिवेदन दे रामा ।

सज्जनसंगति दे रामा । अलिप्तपण मज दे रामा ।

ब्रह्मानुभव मज दे रामा । अनन्य सेवा दे रामा ।

कोमल वाचा दे रामा । विमल करणी दे रामा ।

प्रसंगवोळखी दे रामा । धूर्तकळा मज दे रामा ।

अंतरपारख दे रामा । बहुजनमैत्री दे रामा ।

विद्यावैभव दे रामा । उदासीनता दे रामा ।

मागो नेणे दे रामा । मज न कळे ते दे रामा ।

सावधपणा मज दे रामा । बहु पाठांतर दे रामा ।

दास म्हणे रे गुणधामा । उत्तमगुण मज दे रामा ।

*

ॐ असतो मा सद्‍गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ।

मृत्यो र्मा अमृतं गमय । अभयमस्तु । सिद्धिरस्तु । स्वानुभूतिरस्तु ॥

*

ॐ पश्‍येम शरद: शतम् ॥ जीवेम शरद: शतम् ॥

प्रब्रवाम शरद: शतम् ॥ आदीना: स्याम शरद: शतम: ॥

भूयश्‍च शरद: शतात् ॥

बुद्धेम शरद:शतम् । रोहेम शरद:शतम् ।

भूयसी: शरद:शतम।

नन्दाम शरद: शतम् । मोदाम शरद: शतम् ।

भवाम शरद: शतम् । अजिता: स्याम शरद: शतम् ॥

*

उठा उठा सकळिक , वाचे स्मरावा गजमुख ।

ऋद्धिसिद्धिचा नायक , सुखदायक भक्तांसी ॥१॥

अंगी शेंदुराची उटी , माथा शोभतसे किरीटी ।

केशर कस्तुरी लल्लाटी, कंठी हार साजिरा ॥२॥

कानी कुंडलाची प्रभा , चंद्रसूर्य जैसे नभा ।

माजी नागबंदी शोभा , स्मरता उभा जवळी तो ॥३॥

कांसे पिंताबराची घटी, हाती मोदकाचि वाटी ।

रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो ॥४॥

*

श्री रामाची प्रार्थना

कल्याण करी रामराया । जनहित विवरी ॥धृ॥

तळमळ तळमळ होताचि आहे । हे जन हाति धरी ॥१॥

अपराधी जन चुकतचि गेले । तुझ्या तूचि सावरी ॥२॥

कठीण त्यावारि कठिण आले । आतां न दिसे उरी ॥३॥

कोठे जावे काय करावे । आरंभिली बाहेरी ॥४॥

दास म्हणे आम्ही केले पावलो । दयेसि नाही सरी ॥५॥

*

श्र्लोक

शुकासरिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।

वशिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे ॥

कवी वाल्मिकासारिख मान्य ऎसा ।

नमस्कार माझा सद्‍गुरु रामदासा ॥

जय जय रघुवीर समर्थ ॥

सद्‍गुरु समर्थ रामदासस्वामी महाराजकी जय ।

महारुद्र हनुमानकी जय ।

जय जय रघुवीर समर्थ ॥

*

उपदेश

बरे सत्य बोला । यशातथ्य चाला ।

बहू मानिती लोक येणे तुम्हाला ॥

धरा बुद्धी पोटी विवेकें तुम्ही हो ।

बरा गुण तो अंतरामाजि राहो ॥१॥

सदा दात घासोनि तोंडा धुवावे ।

कळाहीन घाणेरडे वा नसावे ॥

सदा सर्वदा यन्त सांडु नये रे ।

बहुसाल हा खेळ कामा नये रे ॥२॥

दिसामाजि काही तरी ते लिहावे ।

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥

गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करावे ।

बरे बोलणे सत्य जीवी धरावे ॥३॥

बहू खेळ खोटा सदालस्य खोटा ।

समस्तांसि भांडेल तोची करंटा ॥

बहुतां जनालागि जीवी धरावे ।

भल्या संगती न्याय तेथे बसावे ॥४॥

हिशेबी सदा न्याय सांडू नये रे ।

कदाचित अन्याय होता ढका रे ॥

जनी सांडीता न्याय रे दु:ख होते ।

महासौख्य तेही अमस्मात जाते ॥५॥

प्रचीतीविणे बोलणे व्यर्थ वाया ।

विवेकेविणे सर्वहि दंभ जाया ॥

बहू सज्जला नेटका साज केला ।

विचारेविण सर्वही व्यर्थ गेला ॥६॥

वरी चागंला अंतरी गोड नाही ।

तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही ॥

वरी चांगला अंतरी गोड आहे ।

तयालागी कोणीतरी शोधिताहे ॥७॥

सदा अंतरी गोड ते सांडवेना ।

कदा अंतरी ओखटे देखवेना ॥

म्हणुनी भला गूण आधी धरावा ।

महाघोर संसार हा नीरसावा ॥८॥

भला रे भला बोलती ते करावे ।

बहुतां जनांचे मुखे येश घ्यावे ॥

परी शेवटी सर्व सोडुनि द्यावे ।

मरावे परी कीर्ति रुपेउरावे ॥९॥

बरा बोरवटा सर्व संसार झाला ।

अकस्मात येईल रे काळ घाला ॥

म्हणॊनि भले संगती सत्य चाला ।

जनी दास हा बोधिताहे मुलांना ॥१०॥

 

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP