घटस्थापना
आपल्या घरात कुलदेवतेच्या किंवा नित्य पूजेच्या देवांच्या उजव्या बाजूस तांबडया मातीची वेदी तयार करावी.
त्यावर कलश ठेवण्यापूर्वी प्रथम वेदीची प्रार्थना करताना म्हणावे-
ॐ महीद्यौः पृथ्विवचन इमं यज्ञमिमिक्षितां । पिपृर्तानो भरी मभिः॥
कलशात वारुळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती घालावी. म्हणावे-
ॐ स्योना पृथ्वि भवानृक्षरानिवेशवीः । यच्छानःरु शर्मसप्रथ: ॥
नंतर ॐ इमं मे गंगे यमुने सरस्वती। शुतुद्रिस्तोमं सचता परुष्ण्या ।
असिकन्या मरुद वृधे वितस्तयार्जीकिये शृणुह्या सुषोमया॥
हा मंत्र म्हणावा आणि कलशात पाणी घालावे.
ॐ गंधद्वारां दुराधर्षा नित्यपुष्टां करीषिणी । ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपव्हये श्रियम् ॥
हा मंत्र उच्चारुन कलशात गंध घालावे.
ॐ या औषधीः पूर्वाजाता देवभ्यस्त्रियुगं पुरा । मनैनुबभ्रूणामहं शतं धामानि सप्त च ॥
हा मंत्र म्हणावा आणि कलशात हळ्द, आंबेहळद, नागरमोथा इत्यादी औषधी घालावी.
नंतर कलशात दूर्वा घालाव्या. त्या वेळी म्हणावे-
ॐ कांडात् कांडात् प्ररोहंती परुषः परुषस्परि।एवा नो दुर्वे प्रतन्तु सहस्त्रेण शतेन च ॥
दोन सुपार्या कलशात घालून मंत्र म्हणावा-
ॐ याः फलिनीर्या अफला अपुष्पा याश्च पुष्पिणीः । बृहस्पतिप्रसूता स्तानो मुञ्चन्त्वंहसः ॥
कलशात पाच नाणी घालून म्हणावे -
ॐ सहिरत्नानि दाशुषे सुवति सविता भगः । तं भागं चित्रमीमहे ॥
नंतर कलशात रुप्याचे किंवा सोन्याचे नाणे घालावे. म्हणावे-
ॐ हिरण्यरुपः सहिरण्य संहगपान्न्पात्सेदुहिरण्यवर्णः ।
हिरण्ययात् परियोनेर्निषद्या हिरण्यदाददत्यन्नमस्मै ॥
कलशात गंधाक्षता, हळद्कुंकू आणि पंचामृत घालावे. ह्या वेळी म्हणावयाचा मंत्र -
ॐ युवासुवासाः परिवीत आगात्। स उ श्रेयान् भवति जायमानः ॥
तं धीरासः कवय उन्नयंति । स्वाध्योऽऽऽ मनसा देवयंत ॥
पाच पाने असलेली आंब्याच्या पानांची डहाळी कलशावर ठेवावी. म्हणावे -
ॐ अश्वत्थेवो निषदनं पर्णेवोवसतिष्कृता । गोभाजइत्किलासथ यत्सवनथ पुरुषं ॥
पूर्णपात्र म्हणजे ताम्हणात तांदूळ भरुन ते पात्र कलशावर ठेवताना म्हणावे-
ॐ पूर्णा दर्वि परापत सुपूर्णा नुररापत । वस्ने विक्रीणावहा इषमूर्जे शतक्रतो ॥
याप्रमाणे कलशस्थापना करावी. हीच घटस्थापना. पहिल्या दिवशी प्रतिपदेस घटस्थापना करुन तो घट पुढे नऊ दिवस तसाच ठेवायचा असतो.
कलशस्थापनेनंतर कलशावरील ताम्हनातील तांदुळावर कुंकवाने अष्टदल काढावे आणि
'श्रीवरुणाय नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥'
असे म्हणावे. त्या कलशाला गंध, अक्षता, फूल वाहावे. नंतर त्या ताम्हनावर देवीची मूर्ती किंवा आपल्या कुलदेवतेची मूर्ती ठेवावी. म्हणजे देवतास्थापन पूर्ण झाले.
अंकुरारोपण -
घटस्थापना झाल्यावर त्या घटाभोवती तांबडी माती पसरावी. त्या मातीत नवधान्य, भात, गहू, जोंधळे, मका, मूग, हरभरे इत्यादी पेरावे. त्यावर पुनः माती पसरावी आणि म्हणावे -
ॐ स्योना पृथिविभवाभृक्षरानिवेशवी । यच्छानः शर्मसप्रथः ॥१॥
ॐ येनतोकाय तनयाय धान्यं । बीजं वहध्वे आक्षितं । अस्मभ्यं तध्दत्तन यद्वईमहे राधो विश्वायु सौभागम् ॥२॥
ॐ पर्जन्याय प्रगायत दिवस्पुत्राय मीळहुषे । स नोयवसमिच्छ्तु ॥३॥
ॐ वर्षतुते विभावरि दिवो अभ्रस्य् विद्युतः । रोहंतु सर्व बीजान्यव ब्रह्मद्विषो जहि ॥४॥
नंतर त्या धान्यावर पाणी शिंपडावे. अंकुर पिवळ्या रंगाचा यावा यासाठी हळदीचे पाणी करुन त्यावर शिंपावे.
घटप्रार्थना - देवदानवसंवादे मध्यमाने महोदधौ । उत्पन्नोऽसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम्॥
त्वत्तोये सर्व तीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिताः । त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणाः प्रतिष्ठिता ॥
शिवः स्वयं त्वमेवासी विष्णुस्त्वंच प्रजापति: । आदित्या वसवो रुद्रा विश्वेदेवाः सपैतृका ॥
त्वधि तिष्ठन्ति सर्वेऽपि यतः कामफलप्रदाः । त्वत्प्रसादादिमं यज्ञं कर्तुमीहे जलोद्भव ॥
सांनिध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा ॥
आगच्छ वरदे देवि दैत्यदर्पनिषूदनि । पूजां गृहाण सुमुखि नमस्ते शंकरप्रिये ॥
सर्वतीर्थमयं वारि सर्व देव समन्वितम्। इमं घट समागच्छ सांनिध्यमिह कल्पया ॥
दीप स्थापना पूजा
नंदादीप घटाजवळ नऊ दिवसपर्यंत अखंड तेवत ठेवणे हा नवरात्र पूजेतील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे.
ॐ ऐं र्हीं श्रीं वास्तुपुरुषाय नमः । गंधाक्षतापुष्पं समर्पयामि ॥
हा मंत्र म्हणावा व ज्या जागी हा दीप ठेवायचा त्या स्थलाची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करावी.
नंतर समई किंवा नंदादीपाची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करावी व म्हणावे-
ॐ ऐं र्हीं श्रीदीपाय नमः । गंधाक्षत-पुष्पं समर्पयामि ॥
अखंड दीपकं देव्याः प्रीतये नवरात्रकम्। उज्ज्वालये अहोरात्रमेकचित्तो दृढव्रतः ॥
अस्मिन् क्षेत्रे दीपनाथ निर्विघ्नसिध्दिहेतवे । लक्ष्मीयंत्रस्य पूजार्थमनुज्ञां दातुमर्हसि ॥
श्रीमहाकाली-श्रीमहालक्ष्मी-श्रीमहासरस्वती स्थापना
श्रीमहाकाली-श्रीमहालक्ष्मी-श्रीमहासरस्वती या तीन देवींची स्थापना कलशावरील ताम्हनावर तीन सुपार्या ठेवून त्यावर कुंकुमाक्षता वाहून करावी आणि म्हणावे-
खड्गं चक्रगदेषुचापरिधान शूलं भुशुंडी शिरः । शंखं संदधतीं करौ स्त्रिनयनां सर्वांगभूषावृताम्॥
नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकां । यामस्तौत्त्वपिते हरौ कमलजो हंतुं मधु कैटभम् ॥१॥
श्रीमहाकाल्यै नमः । श्रीमहाकाली आवाहयामि-स्थापयामि॥
अश्वस्त्रक्परशु गदेषु कुलिशं पद्म् धनुः कुंडिकां । दंडं शक्तिमसिं च चर्मजलजं घंटां सुराभाजनम्॥
शूलं पाश सुदर्शनेच दधती हस्तैः प्रवालप्रभां । सेवे सौरभमर्दिनीमिह महालक्ष्मी सरोजस्थिताम् ॥२॥
श्री महालक्ष्म्यै नमः।श्रीमहालक्ष्मी आवाहयामि-स्थापयामि॥
घंटाशूल हलानि शंख मुसले चक्रं धनुः सायकं । हस्ताब्जैर्दधतीं धनांतविलसच्छीतांशुतुल्यप्रभां॥
गौरीदेहसमुद्भवां त्रिजगतामाधारभूतां तु महां । पूर्वामत्र सरस्वतीमनुभजे शुंभादिदैत्यार्दिनीम् ॥३॥
श्री महासरस्वत्यै नमः। श्री महासरस्वती आवाहयामि-स्थापयामि॥