प्रधानहोमः - अग्न आयूंषीति तिसृनां शतं वैखानसा ऋषयः, अग्निः पवमानो देवता, गायत्री छंदः । उपनयनप्रधानाज्यहोमे विनियोगः ।
प्रधानहोम - 'अग्न आयूषि' पासून क्रमाने तीन मंत्राचे शत वैखानस हे ऋषि, पवमान अग्नि ही देवता, गायत्री छन्द, उपनयनकर्मातील प्रधान घृतहोमाकडे उपयोग.
ॐ अग्न आयूषि पवस आसुवोर्जमिषं च नः
आरे बाधस्व दुच्छुनां स्वाहा ॥४॥
अग्नये पवमानायेदं न मम ॥
ॐ अग्निऋषिः पवमानः पाञ्चजन्यःपुरोहितः ।
तमीमहे महागयं स्वाहा ॥५॥
अग्नये पवमानायेदं न मम ॥
ॐ अग्ने पवस्व स्वपा अस्मे वचः सुवीयम् ।
दधद्रयिं मयि पोषं स्वाहा ॥६॥
अग्नये पवमानायेद्म न मम ॥
प्रजापत इत्यस्य हिरण्यगर्भः प्रजापतिस्त्रिष्टुभ् उपनयनप्रधानाज्यहोमे विनियोगः ।
४- अग्न आयूषि'
५- अग्निऋषि'
६- अग्ने पवस्वस्वपा'
हे तीन मंत्र म्हणून तुपाची आहुति छातीस डावा हात लावून प्रत्येक मंत्रानंतर समर्पण करावी. व तीनही वेळा
'अग्नये पवमानायेदं न मम'
म्हणावे, म्हणजे पवमान अग्नीला ही आहुति समर्पण केली आहे. माझा भाग यात नाही.
प्रजापते न त्वदेतान्यन्यो विश्वा जातानि परिता बभूव । यत्कामास्ते जुहमस्तन्नो अस्तु वयं स्याम पतयो रयीणां स्वाहा ॥७॥
प्रजापतय इदं न मम ।
'प्रजपते' ह्या मंत्राचा हिरण्यगर्म ऋषि, प्रजापति देवता, त्रिष्टुभ् छंद, उपनयनातील प्रधान घृतहोमाकडे उपयोग.
ॐ प्रजापते० (७) 'प्रजापतीस हे हवि दिले; माझे नव्हे असे म्हणून घृताची आहुति द्यावी.
(अथाचार्यः उत्तरतोऽग्नेः प्राङ्मुखस्तिष्ठेत् । कुमारोऽप्यग्न्याचार्ययोर्मध्येन गत्वाचार्याभिमुखस्तिष्ठेत् ।)
अञ्जलिक्षारणम् - आचार्य
कुमारस्य शुचित्वसिद्धये सवितृदेवतातृप्तये चाज्जलिक्षारणं करिष्ये । (शुद्धोदकेन शिष्याञ्जलिमापूर्य स्वस्याञ्जलिमन्येन पूरयित्वा तत्सवितुरित्यस्य शावाश्वः सवितानुष्टुभ् अवक्षारणे विनियोगः ।
नंतर अग्नीच्या उत्तरेस तोंड करून आचार्याने उभे रहावे आणि कुमाराने अग्नि व आचार्य यांच्या मधून जाऊन आचार्याकडे तोंड करून उभे रहावे.
आचार्य - कुमाराच्या पवित्रतेसाठी आणि सवितृदेवतेच्या तृप्तीसाठी अञ्जलिक्षारण करतो असा संकल्प करावा.
चांगल्या शुद्ध पाण्याने शिष्याची ओंजळ भरून आपली ओंजळ दुसर्याकडून भरवावी.
'तत्सवितुः' या मंत्राचा श्यावाश्व ऋषि, सविता देवता, अनुष्टुभ् छंद, अवक्षारणकर्माकडे उपयोग.
ॐ तत्सवितुर्वणीमहे वयं देवस्य भोजनम् ।
श्रेष्ठ सर्वधातम तुरं भगस्य धीमहि ॥८॥
अनेन स्वाञ्जल्युदकं शिष्याञ्जलाववक्षार्य तज्जलं कुमाराञ्जलिनैवावक्षारयेत् । ततः शिष्यत्वसिद्ध्यर्थं कुमारस्य दक्षिणे हस्ते साङ्गुष्ठं गृहणीयात् ।
तत्र मन्त्रः
ॐ देवस्य त्वा सवितुः प्रसवेऽश्विनोर्बाहुभ्यां पुष्णो हस्ताभ्या हस्त गृहणामि ॥९॥
अमुकशर्मन्
(पुनः पूर्ववदुदकपूरणादि कृत्वावक्षार्य । द्वितीये मंत्रविशेषः)
'तत्सवितुर्व०'
(८) या मंत्राने आपल्या ओंजळीतले पाणी शिष्याच्या ओंजळीत टाकावे व ते पाणी शिष्याच्या ओंजळीतून खाली बोटांच्या फटीतून सांडवावे, यास अवक्षारण म्हणतात.
नंतर शिष्यपणा सिद्ध होण्याकरिता बटूचा अंगुष्ठासहित हात
'देवस्य त्वा०'
(९) या मंत्रांनी धरावा. अमुक शर्मन् अशा प्रकारे बटूचे संबोधन विभक्तीत नाव घ्यावे आणि पुनः आपल्या हातातून त्याचे हातात व त्यातून खाली असे जलक्षारण करावे.
ॐ सविता ते हस्तमग्रभीत् ॥१०॥
(हस्तं गृहणामि) अमुकशर्मन् । (पुनरपि पूर्ववत्पूरयित्वावक्षार्य ॐ अग्निराचार्यस्तव ॥११॥
(हस्तं गृहणामि) अमुकशर्मन् (इति तृतीये)
(अथाचार्यो ब्रह्मचारिणा सह निष्क्रम्य)
ॐ देवसवितरेष ते ब्रह्मचारो तं गोपाय समामृत ॥१२॥
इत्युक्त्वा संरक्षणार्थं व्रतपतये आदित्याय बटुं ददामीति मनसा स्मरन् ब्रह्मचारिणमादित्यमीक्षयेत् । ततोऽन्यान्याभिमुखो तिष्ठेताम् ।
आचार्यः - कस्य ब्रह्मचार्यासि प्राणस्य ब्रह्मचार्यासि ।
कस्त्वा कमुपनयते काय त्वा परिददामि ॥१३॥
(इति मंत्र जपन् कुमारं प्रजापतये मनसा समर्प्य)
ॐ सविता ते० (१०) हा मंत्र म्हणून पहिल्याप्रमाणे हात धरावा व पूर्वीप्रमाणे अवक्षारण करावे.
'ॐ अग्निराचार्यस्तव, अमुकशर्मन्' हा मंत्र म्हणून तिसर्या वेळ हात धरावा.
मग आचार्याने ब्रह्मचार्यासह बाहेर सूर्य दिसेल अशा ठिकाणी येऊन
'ॐ देवसवितरेष०'
(१२) या मंत्राने व्रतांचा रक्षण करणारा जो आदित्य त्याला हा बटु संरक्षणार्थ मी समर्पण करतो. असे मनात म्हणून ब्रह्मचार्यास सूर्य दाखवावा. पुढे ब्रह्मचारी आणि आचार्य यांनी समोरासमोर उभे रहावे, व आचार्याने
'कस्य ब्रह्मचार्यासि०’
(१३) ह्या मंत्राचा जप करीत कुमाराला प्रजापति देवतेस मनाने समर्पण करावे.
ह्रदयालम्भनम् - युवा सुवासा इत्यस्य कौशिको विश्वामित्रो यूपस्त्रिष्टुभ् । पूर्वार्धचस्य प्रदक्षिणावर्तने, उत्तरार्धर्चस्य पाणिभ्यां बटुह्रदयालम्भने विनियोगः ।
ॐ युवा सुवासाः परिवीत आगात् स उ श्रेयान् भवति जायमानः ॥१४॥
(इति बटुं प्रदक्षिणामावर्तनेन प्राङ्मुखमवस्थाप्य तदंसयोरुपरिस्वपाणी गमयित्वा)
तं धीरासः कवय उन्नयन्ति स्वाध्यो ३ मनसा देवयन्तः ॥१५॥
(इति पाणिभ्यां बटुह्रदयं स्पृशेत् । तत आत्मानमग्निं चान्तरा बटुं नीत्वा प्रत्यगग्नेः स्वयमुपविश्य स्वस्य दक्षिणतः प्राङ्मुख तमुपवेशयेत् )
'युवा सुवासा०' ह्या मंत्राचा कौशिककुलोत्पन्न विश्वमित्र ऋषि, यूप देवता आणि त्रिष्टुभ छन्द होय.
पहिल्या अर्ध्या ऋचेचा बटूस प्रदक्षिण फिरविण्याकडे व दुसर्या अर्ध्या ऋचेचा दोन हातांनी बटूच्या ह्रदयाला स्पर्श करण्याकडे उपयोग.
'युवा सुवासा०' (१४) या मंत्राने बटूस उजवीकडे फिरवून, पूर्वेकडे तोंड करून उभे करावे. नंतर त्याच्या खांद्यावरून स्वतःचे दोन्ही हात लांब पोचवून त्या दोन्ही हातांनी 'तं धीरास०' (१५) हा मंत्राचा भाग म्हणुन एकदम बटूच्या ह्रदयास स्पर्श करून बटूस आपल्या व अग्नीच्या मधून नेऊन आपण पश्चिमेकडे तोंड करून बसल्यावर बटूस पूर्वेकडे तोंड करून बसवावे.
अथ प्रथमाग्निकार्यम् ।
बटुः परिसमुःअनम्, पर्युक्षणभ् । अग्नये समिधमित्यस्य हिरण्यगर्भोऽग्निर्बृहती समिधाधाने विनियोगः ।
ॐ अग्नये समिधमाहार्ष बृहते जातवेदसे ।
तया त्वमग्ने वर्धस्व समिधा ब्रह्मणा वयं स्वाहा ॥१६॥
अग्नय इदं न मम। (दक्षिणं पाणिं प्रक्षाल्याग्नौ प्रताप्य ।
ॐ तेजसा मा समनज्मि ॥१७॥
(इति मुखमवाङ निमृज्य पाणिं प्रक्षाल्येवं पुनर्द्विः । ततः तिष्ठन् प्रणतिमुद्रां कृत्वा)
बटु - परिसमूहन, पर्युक्षण करावे.
'अग्नये समिध०'
(१६) ह्या मंत्राचा हिरण्यगर्भ ऋषि, अग्नि देवता, बृहती छंद, समिधावाहनाकडे उपयोग. हा म्त्र म्हणून समिधा अग्नीत देऊन
'अग्नय इदं न मम'
असे म्हणावे. यानंतर उजवा हात धुवून व अग्नीवर तापवून
'ॐ तेजसा०'
(१७) हा मंत्र म्हणून तो हात वरून खाली असा तोंडावरून फिरवून तोंड धुवावे व पुनः हात धुवावा, असे पुनः दोन वेळ करावे.
अग्न्युपस्थानम् - मयि मेधामिति षण्णां हिरण्यगर्भ ऋषिः पूर्वेषां त्रयानामग्नीद्रसूर्या देवता, उत्तरत्रयानामग्निर्देवता गायत्री छंदः । अग्न्युपस्थाने विनियोगः ।
ॐ मयि मेधां मयि प्रजां मय्यग्निस्तेजो दधातु ।
मयि मेधां मयि प्रजां मयींद्र इंद्रियं दधातु ।
मयि मेधां मयि प्रजां मयि सूर्यो भ्राजो दधातु ॥
यत्ते अग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासम् ।
यत्ते अग्ने वर्चस्तेनाहं वर्चस्वी भूयासम् ।
यत्ते अग्ने हरस्तेनाहं हरस्वी भूयासम् ॥१८॥