अग्न्युपस्थान -
नंतर हात जोडून उभे रहावे. व
'ॐ मयि मेधां'
(१८) मंत्रानी प्रार्थना करावी.
विभूतिग्रहणम् -
मानस्तोके इति कुत्सो रुद्रो जगती । विभूति ग्रहणे विनियोगः ।
ॐ मा नस्तोके तनये मा न आयौ मा नो गोष मा नो अश्वेषु रीरिषः ।
वीरान् मा नो रुद्र भामितो वधीर्हविष्मन्तः स दमित्वा हवामहे ॥१९॥
विभूतिग्रहण -
'मानस्तोके०'
(१९) ह्या मंत्राचा कुत्स ऋषि, रुद्र देवता व जगती छंद होय. भस्मग्रहणाकडे उपयोग.
'ॐ मानस्तोके०'
(१९) ह्या मंत्राने भस्म पळीला घ्यावे.
भस्म आदाय
त्र्यायुषं जमदग्नेरिति ललाटे ।
कश्यपस्य त्र्यायुषमिति कण्ठे ।
अगस्त्यस्य त्र्यायुषमिति दक्षिणस्कंधे ।
तन्मे अस्तु त्र्यायुषमिति वामस्कंधे ।
सर्वमस्तु शतायुषमिति शिरसि ॥२०॥
परिसमूहनम् । पर्युक्षणम् ।
प्रार्थना - ॐ च मे स्वरश्च मे यज्ञोप च ते नमश्च ।
यत्ते न्यूनं तस्मै त उपयत्तेऽतिरिक्तं तस्मै ते नमः ॥२१॥
अग्नये नमः । ॐ स्वस्ति ।
श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम ।
आयुष्य तेज आरोग्यं देहि मे हव्यवाहन ॥२२॥
प्रथमाग्निकार्यं समाप्तम् ।
अभिवादनम् -
अग्नेरुत्तरतो गत्वा प्रत्यङमुखीभूय आचार्याभिमुखो भूत्वा, दक्षिणं जानु भूतले निधाय, पाणिभ्यां यथासव्यदक्षिणं श्रोत्रे संस्पृश्य, व्यस्तपाणिराचार्यस्य दक्षिणपाद्म स्वदक्षिनहस्तेन, सव्यं च सव्यहस्तेन जानुप्रभृति पादपर्यन्तं स्पृष्ट्वा
'त्र्यायुषं०'
ह्या मंत्राने कपाळी,
'कश्यपस्य० ’
ह्या मंत्राने गळ्यास,
'अगस्त्यस्य०'
ह्या मंत्राने नाभीस,
यद्देवानां०'
ह्या मंत्राने उजव्या खांद्यास,
'तन्मे अस्तु०'
ह्या मंत्राने डाव्या खांद्यास आणि सर्वमस्तु०' (२०) ह्या मंत्राने मस्तकास विभूति लावून पुनः परिसमूहन, पर्युक्षण केल्यावर हात, जोडून
१९. हे रुद्रा, आमची मुले, नातू, आमचे संबंधी लोक, गाई आदि पशु व घोडे यांना मारू नकोस. आणि हे रुद्रा, आमच्या शूर लोकांना रागावून वधू नकोस. आम्ही हविर्भाग देऊन तुला नेहमी बोलावीत जाऊ.
(ऋ. १.११४.८)
२०. तीनवेळा जमदग्नीचे अपमृत्यु टाळणारे हे भस्म मी कपाळावर धारण करितो. हे भस्म जमदग्नीप्रमाणे माझेही अपमृत्यु टाळो.
कश्यपाचे तीनदा अपमृत्यु टाळणारे भस्म मी गळ्याचे ठिकाणी धारण करतो.
अगस्तीचे तीनदा अपमृत्यु टाळणारे भस्म मी नाभीचे ठिकाणी धारण करतो.
ज्याने देवांना तीनदा अपमृत्यूतून तारिले ते भस्म माझ्या उजव्या खांद्याचे ठिकाणी असो.
(मला अपम्रुत्यु न येता) पूर्ण शंभर वर्षे आयुष्य असो, म्हणून हे भस्म मी मस्तकावर धारण करितो. (शु. य. अ. ३)
उभे रहावे, व पुढील मंत्र म्हणावेत.
'ॐ च मे'
(२१) इत्यादि मंत्रांनी स्तुति केल्यावर अग्नीच्या उत्तरेकडे जाऊन पश्चिमेकडे तोंड करून आचार्यांसमोर व्हावे. मग खाली बसून उजवा गुडघा जमिनीवर टेकून, उजव्या व डाव्या हातांनी दोन्ही कानास स्पर्श करून, आचार्यांच्या उजव्या पायास आपल्या उजव्या हाताने, आणि डाव्यास डाव्या हाताने, स्पर्श करता येईल असे हात करून गुडघ्यापासून पावलापर्यंत स्पर्श करावा.
कुमारः- अमुकगोत्रोऽमुकशर्माऽहं भो गुरो अभिवादये (गुरुं नमस्कुर्यात् ।)
बटु- अमुक गोत्राचा व अमुक नावाचा मी, हे गुरो, प्रणाम करतो असे म्हणून नमस्कार करावा.
आचार्यः - आयुष्मान् भव सौम्य देवदत्त । (इत्याशीर्वादः) ।
आचार्य - हे देवदत्ता, दीर्घायुषी हो.
कुमारः- (सावित्र्युपदेशं वाञ्छन् ) अधीहि भोः सावित्रीं भो अनुब्रूहि ।
इत्याचार्यमुक्त्वा स्ववामपानिमुत्तानीकृत्य दक्षिणं पाणिं न्यङमुखोकृत्य संधाय पाणिपृष्ठमंगुलींश्चांगुष्ठौ च दृढीकृत्य कृतब्रह्माञ्जलिं दक्षिणाङके निधाय आचार्यान्तिक आसीत्
आचार्यः- तदञ्जलिं तत्परिधानीयवाससाच्छाद्य स्वपाणिभ्यां तदंजलिं परिगृह्य
प्रणवस्य परब्रह्म ऋषिः । परमात्मा देवता । दैवी गायत्री छन्दः । व्याह्रतीनां परमेष्ठी प्रजापतिः प्रजापतिर्बृहती । गायत्र्या विश्वामित्र ऋषिः । सविता देवता गायत्री छन्दः । उपनयनोपदेशे विनियोगः ।
ॐ भूर्भुवः स्वः । ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥२३॥
प्रणवव्याह्रतिपूर्विका गायत्रीं पच्छोर्धेर्चशः सर्वा अशक्तौ यथाशक्ति वा त्रिवारं स्वयमुक्त्वा वाचयेत् ।
बटु - (मनात गायत्री उपदेशाची इच्छा धरून) हे गुरो, अगोदर आपण गायत्रीमंत्र म्हणा व नंतर मला सांगा.
मग आपला डावा हात उताणा करून व उजवा पालथा करून त्याच्याशी जोडावा; आणि दोनही हातांचे अग्रभाग बोटांनी घट्ट दाबावे व दोन्ही आंगठे परस्पर दृढ करावे. यासच ब्रह्माञ्जलि म्हणतात. ही ब्रह्माञ्जलि उजव्या मांडीवर ठेवून आचार्यांजवळ बसवे. मग आचार्यानेती ओंजळ त्याच्याच पांघरलेल्या वस्त्राने झांकून, आपल्या दोन्ही हातांनी धरून उपदेशास आरंभ करावा.
मंत्रोपदेश - प्रणवाचा परब्रह्म ऋषि, परमात्मा देवता, दैवी गायत्री छंद. व्याह्रतीचा परमेष्ठी प्रजापति ऋषि, प्रजापति देवता, बृहती छंद. गायत्री मंत्राचा विश्वामित्र ऋषि, सविता देवता व गायत्री छंद, उपनयनसंस्कारातील उपदेशाकडे विनियोग.
प्रणव व व्याह्रति अगोदर सांगून, नंतर प्रथम चरण, मग अर्ध व नंतर सगळा गायत्री मंत्र सांगावा. याप्रमाणे म्हणण्यास बटु असमर्थ असला तर त्यास जसा म्हणता येईल तसा स्वतः तीनदा म्हणून त्याजकडूनही तसाच म्हणवावा.