श्रीचरण शिकवि सकल ज्ञान सेवकां सदा ।
कविसम याचि पदा वरण्यातें विद्या,--मुखमल हरि,
कच नव धरि, रव मधु करि,--रिघत तोषदा ॥धृ०॥
कवि तापसी, ज्ञान त्यांसी शंभु तो देई ॥
न तप केलें, ज्ञान उदेलें; या देहीं सहज संपदा ॥१॥
राग भूप, ताल दादरा.
("श्रीगुरुसि नमन" या चालीवर.)