मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत मानापमान|
किती मजेदार हार ; शिवभययु...

मानापमान - किती मजेदार हार ; शिवभययु...

बालगंधर्वांच्या मानापमान नाटकातील ’भामिनी’ने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते.


किती मजेदार हार; शिवभययुवतिशरण मदन रचि सुमन नानाकार ॥ध्रु०॥

येत हा मदनमित्र रणाला; सैन्य तया अबलाकरमाला ।

फुले फूल; पडे भूल; दानशूर मनीं चूर ।

वसंतसेना सरसावे ही; बैरागी समुदायीं होई हो हाहाःकार ॥१॥

तोडूया मुकुल सकल कुमारि; रास रचू या रुद्रमंदिरीं ।

पहा हार, हारा भार; ज्ञानलोचन झांकी मार ।

नाचे कुसुमायुध आनंदें, पुष्पवती शिवसमाधिसामोरा तोरा फार ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 31, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP