गणेश गीता - अध्याय ८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

वंदुन गजाननासी, वदतों राजा वरेण्य तें काय ।

मजला नारद यांनीं, कथिल्या विभुती बहूत ये ठाय ॥१॥

त्या सार्‍या विभुतींना, जाणतसें मी प्रभू-वरा देवा ।

१.

आणखि कांहीं असती, माहित नसती तयांस त्या देवा ॥२॥

आपण सार्‍या विभुती, जाणतसां त्या कथा मला प्रभुजी ।

२.

त्यांतिल सर्वव्यापक, विभुती ती दाखवा मशीं प्रभुजी ॥३॥

गणपति वदे नृपाला, माझे ठायीं चराचरा पाहें ।

पूर्वीं न पाहिलेले, दिव्य चमत्कार दृश्य तें पाहें ॥४॥

नानाविध भरित असें, उत्तमसें विश्वरुप दाखवितों ।

३.

पाहें नृपाळ माझें, रुप कसें तें पहा असें म्हणतों ॥५॥

आहेत चर्मचक्षू, त्यांनीं न दिसे मदीय ती विभुती ।

४.

ज्ञानाच्या चक्षूंनीं, पाहें म्हणजे दिसेल ती विभुती ॥६॥

ब्रह्मा म्हणे मुनींना, ज्ञानाच्या चक्षुंनीं बघें गणेशास ।

५.

पाहें वरेण्य भूपति, कैसें तें विश्वरुप तो खास ॥७॥

वदनें असंख्य असती, कर असती ते असंख्यही ज्यास ।

अंगीं सुगंध-लेपन, भूषण वसनें असंख्य हीं ज्यास ॥८॥

कंठीं असंख्य माळा, नेत्र तसे तेज कोटि सूर्याचे ।

६।७.

असती असंख्य अयुधें, लोकहि तीनी रुपांत ते साचे ॥९॥

ऐशा रुपास पाहुन, भूपति वदतो प्रभूस हे ईशा ।

८.

त्वद्देहीं बघतों मी, देव ऋषी पितरवृंद जगदीशा ॥१०॥

नानाविध अर्थांनीं, युक्‍त असे सप्त ते मुनी पाहें ।

९.

तितकेच गिरि नीरधी, पाताळें नी द्विपांस मी पाहें ॥११॥

पृथ्वी अकाश स्वर्ग नि, मानव राक्षस तसेच उरगांस ।

१०.

ब्रह्मा विष्णू शिवही, पाहे सुर इंद्र आणि प्राण्यांस ॥१२॥

शिर-भुज-अनंत युक्‍तचि, अग्नी इव प्रखर तेज असें ।

११.

ईशा अनादि आदी, अगण्य रुपीं अशीं मला भासे ॥१३॥

कुंडल किरीटधारक, वक्षस्थल स्थूल-रुप आनंदी ।

१२.

बघतां भय वाटे कीं, श्रेष्ठ असें रुप पाहिलें नगदी ॥१४॥

सुरवर विद्याधर नी, मुनि मानव यक्ष आणि गंधर्व ।

१३.

नर्तकि किन्नर आदी, सेवेति अपुल्या रुपास ते सर्व ॥१५॥

वसु रुद्र रवी अयंची, तत्गणवृंदीं नि सिद्ध साध्य असे ।

१४.

सेविति पाहति मोदें, ऐशा रुपास मीहि पाहतसें ॥१६॥

ज्ञाता अक्षर वेद्यहि, रक्षक पालक असेच धर्माचे ।

१५.

पृथ्वी दिशा नि स्वर्गा, पाताळें व्याप्‍त असुन शेष रुपांचे ॥१७॥

दर्शन घडलें मजला, आणिक दिसलें पुढें मला काय ।

कथितों प्रभूवरा मी, ऐकावें रुपवर्णना काय ॥१८॥

दाढा अनेक असती, अनेक विद्या निपूण रुप असें ।

१६.

पाहुन समस्त लोकहि, भ्याले नी त्यापरीच भीत असे ॥१९॥

प्रलयाच्या अग्नी इव, तेजस्वी तें त्वदीय मुख आहे ।

शिर हें जटील ऐसें, आकाशा लागलें असें पाहें ॥२०॥

पाहुन भ्रमीत झालों, आणखि पाहें नगादि सुर नाग ।

तैसे खल तव उदरीं, राहुनि योनीं अनेक तव आंग ॥२१॥

यापरि अंतीं लीनचि, होती सारे त्वदीय ठायातें ।

१७-१८.

जलिं जल मिळतां होतें, लीन तसें कीं समस्तसें तूंतें ॥२२॥

अग्नी यम इंद्रादी, निऋति वायू वरुण त्वद्रूपें ।

१९.

तैशीं कुबेर रवि शशि, जग सारें ईशनादि त्वद्रूपें ।

यास्तव नमितों देवा, प्रसाद करणें सुदान मज द्या हें ।

२०.

अपुल्या इच्छा लीला, कळण्याविषयीं समर्थ नच आहे ॥२४॥

आतां विराटरुपा, गुप्त करुनी धरा प्रथम रुप ।

यास्तव त्वच्चरणांसी, लीन असा मी सुदास हा भूप ॥२५॥

भूपति वरेण्य म्हणतो, ईशा मज ज्ञानचक्षु हे दिधले ।

२१-२२.

त्याच्या योगें उग्रस, रुप असें हें खरोखरी दिसलें ॥२६॥

सनकादिक नारद हे, बघते झाले कृपाप्रसादेंच ।

२३.

गणपति म्हणे वरेण्या, माझें हें विश्वरुप पूर्वीच ॥२७॥

असती अयोगि जन जे, त्यांना माझें दिसे न रुप असें ।

पुढती ऐकें राया, कथितों त्यांनींहि पाहिलें ऐसें ॥२८॥

होते दाते तपिनी, आणिक ते वेदशास्त्रकूशलही ।

२४.

दिसलें नाहीं त्यांना, जाणें हें भक्त राजसा तूंही ॥२९॥

भक्तीनें मम रुपा, बघणें नी जाणणेंच शक्य असे ।

२५.

यास्तव मग साध्य असे, रुप बघे भक्त-राव भूप असें ॥३०॥

माझा भक्‍त असूनी, संगरहितसा त्यजीत क्रोधासी ।

कर्म करुनियां माते, अर्पी सर्वत्रसा मदिय वासी ॥३१॥

जो सार्‍या भूतांना, समदृष्टीनें बघे सदा खास ।

माझेसंनिध येतो, त्याला घडतो सदैव मम वास ॥३२॥

अष्टाध्यायीं कथिलें, माझें हें विश्वरुपदर्शन हें ।

२६.

ऐकें राया पुढती, क्षेत्रज्ञाचें कथानका तूं हें ॥३३॥

मोरेश्वसुत वेंची, कवनें सुमनें करुन कुसुमांसी ।

अर्पी अपुले शिरसीं, आवडिनें तीं रुचोत अपणांसी ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP